• Happening City,  Marathi City

  ‘बुलबुल’ …

  #film_spoiler #bulbul भूत प्रेताला मानता का? चांगलय! मी पण नव्हते मानत. मला आजपासून मानावसं मनापासून वाटतं. पण ते भुत बुलबुल असेल तरच… !बुलबुलची पहिली झलक मला फिल्ममध्ये दाखवण्याआधी पोस्टरवर झाली. काहींंनी याला फेमिनिस्ट हॉरर म्हटलं,काहींना अतिशयोक्त्ती वाटली. फेमिनिस्ट हॉरर ऐकुन चेहऱ्यावर वेगळे भाव उमटले. कारण यापूर्वी फेमिनिझम हा पुरुषांसारखं वागण्यात आहे, अशी अफवा वाढत चालली होती. इथे स्त्री आणि पुरुष यांची तुलना केलीच नाहीये. शिवाय पुरुषाला पुरुषाच्या जागेवर ठेऊन स्त्रीने कस असायला हवं हे सांगण्याचा स्पष्ट प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न एकदमच इतक्या वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे भारतातील स्त्री यावेळी हॉरर व्यक्तिमत्त्वात दाखवणे वास्तविकतेशी जोडत होते. अनुष्का शर्माच्या वादग्रस्त पाताल लोकसारख्या दमदार वेबसिरिजनंतर ‘बुलबुल’ ही दुसरी लक्षवेधक फिल्मसुद्धा सामाजिक विषयावर भाष्य…

 • Marathi City

  त्या रात्री पाऊस होता…

  दिवा माजघरात लावला होता, प्रकाश त्या पारावर पडत होता…त्या पारावरच्या ओट्यावर ते हात तिचे अस्थिर होत होते. त्याचा हात तिच्या हाताच्या एका इंचापासून दूर होता… नव्या नव्या लग्नाचा नि अरेंज लग्नाचा हा अडखळताना होणारा प्रवास होतो. अहोंची जोड काय ग? एवढ्या पर्यंतच त्यांची ओळख होती… मुलाला दत्तक घेऊन आल्यानंतर ते मुल आणि त्या घरातले लोक जसे सैरभैर होतात, तसा हा वळणाचा नि शेवटाला कुठे घेऊन जाईल याचा थांगपत्ता नसलेला रिवाज होता… ती घरात येते तेव्हा अशीच दत्तक मुलीसारखी लाजरी पण अडखलेली असते, पाय घुटमळत असतात, नव्या जमिनीवर, भिंतीत, घरातल्या माणसांच्या बघण्यात नि कैकदा नवऱ्याच्या हालचालींत… पण त्या रात्री पाऊस होता, रात्र अडखळणारी असली तरी बाहेर पडणाऱ्या पावसाच्या थेंबानी ऊब पाखडलेल…

 • Marathi City

  प्रियकरातला बाप!

  बापाची कहाणी ही केवळ जन्मदात्या बापाएवढी मर्यादित नसते..बाप कुणातही भेटू शकतो… प्रियकरात/ नवऱ्यात जेव्हा बाप दिसतो, तेव्हा ती म्हणते… “काय आहेस तू?… तू माझ्यासाठी कोण आहेस?…” मी कित्येकदा विचारलं की तुला. पण तरीही ना तुझ्याकडून समाधानकारक उत्तर आलं ना माझ्या डोक्यात ‘तू कोण आहे?’ याची स्पष्ट अशी व्याख्या मिळाली. मी मैत्री म्हणूं की लोकांसारखे प्रेमाचं लेबल लावू? मैत्री अन् प्रेम हे सगळ्या भावनांना पूर्ण करतात म्हणे. तुला मी कोणत्या नात्याच्या अतूट दोर्यात बांधू? पण तू तसा नाहियेस. तुला बांधून ठेवावं असा. तू नेहमीच ‘आहे” मला हवा तिथे हवा तसा. जसा ना कोंबाला रोपटं चिकटून यावं ना तसा. तुला मी ‘बाप’ म्हणूं का रे? हा सगळ्यात विक धागा माझ्या आयुष्यातला. “ज्याच्या…

 • Marathi City

  बाप आई तू…

  हा लेख त्या सगळ्या आई वर्गाला समर्पित, ज्या स्वतंत्र पालक आहे. Single mother म्हणून आपल्या मुलाला धाडसाने वाढवतात. त्यांच्या धैर्याला सामोरं जाणाऱ्या मुलीची कहाणी… “वडील (?)कोण आहे हा व्यक्ती ?शब्द नवा नाहीये पण माझ्यासाठी कोण आहे … ?त्याची माझ्या आयुष्यातली भूमिका काय आहे..?”समाजातल्या कित्येक बापांना ओळखतेय मी, पण मला माहित नाही बाप कोण आणि काय असतो. सगळं केवढं वेगळं आहे हे … पुरुषप्रधान जगात मला बाप माहित नाही.मला या शब्दाचा त्रास होतोय हो …!   ज़रा शांत बसाल तुम्ही? नका विचारू मला असले पाया नसलेले प्रश्न ….  इतके दिवस त्रास नव्हता होत. मी बोथट झाले होते, पण आज अचानक शरीरातून सळसळती वीज जावी, दुखत्या भागावर घणाघाती आघात व्हावा तसं अंग आतून युद्ध…

 • Hindi City,  Marathi City

  पडद्याचा खेळ!

  पर्दों की बुनाई छूटती जा रहीं हैं,उस कमरें में हूई मोहब्बत बूढ़ी हो रही हैं। वो दोनों अभी भी साथ रहते होंगे ना? उस मुकम्मल मोहब्बत का घर देखना हैं मुझे, अंदर से। असं म्हणत मी कल्पना करू लागते, त्या पडद्याची ज्याने हे सुख पाहिलं असेल… “उसकी लहराती उंगलियां उन पर्दों से गुजरती हैं, मुझे उन्हें लिपटने का मन करता है।” त्या पडद्यांच वाहवत जाणं इतकं सुखद असतं, ज्यात जिवंतपणा नि मखमली इश्काचा आभास व्हावा, तो होत रहावा म्हणत तो पडद्याला त्याच्या इश्काची निशाणी बनवत नेतो… पडद्यात इश्क सापडणं कित्ती बालिश आहे, पण त्याला छेडू नका तो त्याचा इश्क आहे. पुढे तो त्याच्या शर्टाची इन करत तिच्याकडे बघतो तिथे, एकत्र…

 • Happening City,  Marathi City

  निरोगी मन🌼🌿

  निरोगी मन🌼🌿 एक पर्याय नेहमी असतो’च’सगळे दरवाजे बंद झाले तरी एक पर्याय नेहमी असतो. तुम्ही स्वतः पुढाकार घेण्याचा पर्याय! तुमचा एकही श्वास थांबला तर तुम्ही थांबणार, हे लक्षात ठेवलं की सोप्प होईल. उमेदीचे तसचं असतं, एकदा तुम्ही कंटाळून थांबला की तुम्हाला रोज थांबावं वाटेल. तो तुमचा शेवट असतो. त्यामुळेच म्हणतात, जो थांबला तो संपला! काहीतरी करत रहा… ‘ये जवानी है दिवानी’मध्ये जसं बनी म्हणतो, “मैं उड़ना चाहता हूं, दौड़ना चाहता हूं। गिरना भी चाहता हूं, बस रुकना नहीं चाहता।” इतके जिवंत राहायचे. मी शक्यतो प्रयत्न करते की निगेटीव्ह लोक, विचार यांच्यापासून दूर राहायचे. कारण मला माहीत आहे, ही फेज सगळ्यांच्या आयुष्यात येते. ‘आयुष्य सुंदर आहे’ यावर मी आजही ठाम आहे.…

 • Happening City,  Marathi City

  प्रयत्न स्व हत्येचा !

  एकटेपणाचा मोह असतो, ते व्यसन करू नका… नाहीतर एक दिवस स्वतःच स्वतःचा इतका तिरस्कार करू लागाल की स्वतःचाच जीव घ्याल ! सुचत नाही कधी कधी… सुन्न व्हायला होतं. सगळं आयुष्य रुक्ष वाटू लागतं. जेव्हा डोकं ‘डिप्रेशन ‘ नावाच्या राक्षसाच्या तोंडात जाऊ लागते. मन हात वर करून त्या खोलात जाणाऱ्या ‘ स्वतःला ‘ बाहेर ओढत असते, पण डोक्यातल्या डिप्रेशनने स्वतःवर ताबा मिळवलेला असतो. नकारात्मक सहवास, एकटेपणा, स्वतःशीच बोलणे, तर्क वितर्क लाऊन स्वतःवर प्रेम न करणे, स्वतः बद्दल शंका उपस्थित करणे, खूप खूप मेहनत करून सतत अपयशच येणे, करीयरच्या टप्प्यात आपल्याला हे जमत नाहीये अस वाटणे यामुळे हे डिप्रेशन अधिकाधिक वाढू लागतं. माझं तसचं होऊ लागलंय. माझं वय कमी आहे असं आजूबाजूचे…

 • Happening City,  Marathi City

  वन्स अगेन…!

  वन्स अगेन (पुन्हा एकदा)… हा शब्द आपल्या इथे लग्न झालेल्या स्त्रियांच्या आयुष्यात पाप समजला जातो. खूप धैर्य आणि येणाऱ्या पन्नास पिढ्या उलटल्यानंतर या शब्दाला सहज उच्चारल जाईल. पुरुष म्हणून एक पेग जास्त भरला जातो, तसं स्त्रीला एका पेल्याची मुभा २०० वर्षे पार करून आताशा मिळू लागली. लग्न झाल्यानंतर दुसरं लग्न करण्यासाठी किंवा पुन्हा प्रेमात पडण्यासाठी हा शब्द टॅबू आहे. काही चित्रपट सगळ्यांना आवडणारे नसतात. आपण अशा चित्रपटांना पाहायला हवं. जिथे मोजके संवाद असतात, फ्रेम्स खूप बोलक्या असतात, आणि पात्र? ते तुम्हाला त्यांच्या दुनियेत घेऊन जात असतात. प्रेम आयुष्याच्या दाराबाहेर उभं असतं, त्या दरवाजातून आत येणारा व्यक्ती अगणित अमूल्य असतो. ती भेट लांबवर नेता आली पाहिजे. भेटीपेक्षा कृतिला खूप अर्थ असतो.…

 • Happening City,  Marathi City

  आर्ची… नवा बदल !

  प्रत्येक नव्या विश्वाला जगासमोर आणण्यासाठी कुणा ना कुणाचं निमित्त पुरतं. तसं, राजा हरिश्चंद्र, हरिश्चंद्राची फॅक्टरी, आलम आरा, अशी ही बनवा बनवी, माहेरची साडी, पछाडलेला, चिमणी पाखरं, श्वास, नटसम्राट या माझ्या आयुष्यात पाहिलेल्या काही लेजन्ड्री मराठी चित्रपटांना सोडले तर मध्यंतरीच्या काळात मराठी चित्रपटांचा ग्राफ एकाच वर्तुळात फिरत होता. तीच ती कथा आणि ठरलेलं डीरेक्शन ! यशस्वी व्हायला आणि जगात लोकप्रिय व्हायला काहीतरी कमी होतं. पूर्वी आपली कापडं झिझवलेल्या मंडळींचे चित्रपट केवळ लोकल आणि फार फारतर राष्ट्रीय अवॉर्डसाठी जातात. त्यांच्या कलेचा काळ हा रिलीज झाल्यानंतर जास्तीत जास्त एखाद आठवड्याचा, पूर्वी हा काळ जास्त होता. कारण चित्रपटांची निर्मिती ही मर्यादित होती. आता उपलब्ध झालेल्या असंख्य प्लॅटफॉर्ममुळे मी माझ्या घरी बसून व्हिडिओ बनवू शकते,…

 • Happening City,  Marathi City

  हॅपी बर्थडे निसर्गा!

  स्वतःच्या अंगा खांद्यावर लिहिण्याची मुभा देतोय जो, कोणता देखणा पुरुष आहे हा, जो त्याच्या अस्तित्वावर माझं लिखाण ठेवून मला अधिक सुशोभित करतोय…🌼 हॅपी बर्थडे निसर्गा…!  🌿 बंदिस्त या काळात जुन्या कुपीतल्या आठवणी उजळून जिवंत दिवसांच्या मुक्कामांची आठवण येते रे… तू वातावरणात सहज रंगांचा मऊपणा उधळून दिला की त्या दिवसाचं दिवसपण जगावं वाटतं. या जगातलं सुंदरपण न्याहाळाव वाटतं. तुझ्यामुळे मी स्वतःत पारदर्शी भासू लागते. निसर्गावर सायंकाळी नारंगी लालसर रंगाच आच्छादन टाकलेलं पाहते, त्याने जी डोळ्यांसमोर चित्रफीत तयार होते, निसर्गा, तिथे तू मला भलताच मोहक पुरुष भासू लागतो, ज्याच्या प्रेमात पडण्याच्या परिसीमा मला कणाकणाने मोठ्या करू लागतात… मला तू होण्याची प्रेरणा देतात. महत्त्वाचं म्हणजे तुझी परवानगी न घेता तुला मी माझा प्रियकर…