• Marathi City

    तार;

    लहानपणी मामाचं गाव म्हटलं की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची शब्दशः ओढ लागायची. कारण शहरी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी गावाचं जीवनमान म्हणजे भावनिक समाधानाचा झरा वाटतो. तिथे सगळ्या प्रकारचे इमोशन्स आहे. पण त्या सगळ्यात एक शुद्धता आहे. तेढ, द्वेष, राग, चीड, बांदावरची भांडणं, जावाजावांची किरकिर आहे पण त्या सगळ्यांना माहिती आहे, एकत्र आहोत तरच सौख्य आहे. भांडा, सौख्यभरे! याची जाणीव गावाला जाताना नेहमी व्हायची. ग्रामजीवन पाहिलेल्या आणि त्यानंतर शहराकडे स्थलांतरित झालेल्या असंख्य पिढ्या आहेत. या पिढ्या आयुष्यात मनाच्या एका कोपऱ्यात एकदातरी विचार करतात, चला सगळं सोडून गावी राहायला जाऊ! आपलं आपलं पिकवू आणि स्वतःसाठी खाऊ! तीन वेळेचं जेवण मिळेल, कधी काही कमी पडलच तर गावचा तुक्या, रम्या, सुऱ्या त्याच्या ताटातलं देईल. अशी लोकं दिवसभर काम…