• Marathi City

  तार;

  लहानपणी मामाचं गाव म्हटलं की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची शब्दशः ओढ लागायची. कारण शहरी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी गावाचं जीवनमान म्हणजे भावनिक समाधानाचा झरा वाटतो. तिथे सगळ्या प्रकारचे इमोशन्स आहे. पण त्या सगळ्यात एक शुद्धता आहे. तेढ, द्वेष, राग, चीड, बांदावरची भांडणं, जावाजावांची किरकिर आहे पण त्या सगळ्यांना माहिती आहे, एकत्र आहोत तरच सौख्य आहे. भांडा, सौख्यभरे! याची जाणीव गावाला जाताना नेहमी व्हायची. ग्रामजीवन पाहिलेल्या आणि त्यानंतर शहराकडे स्थलांतरित झालेल्या असंख्य पिढ्या आहेत. या पिढ्या आयुष्यात मनाच्या एका कोपऱ्यात एकदातरी विचार करतात, चला सगळं सोडून गावी राहायला जाऊ! आपलं आपलं पिकवू आणि स्वतःसाठी खाऊ! तीन वेळेचं जेवण मिळेल, कधी काही कमी पडलच तर गावचा तुक्या, रम्या, सुऱ्या त्याच्या ताटातलं देईल. अशी लोकं दिवसभर काम…

 • Marathi City

  तुमची चिमुरडी सुरक्षित आहे का?

  ऑफिसला जाताना पैसे, पाकीट, लिपस्टिक, रुमाल, फाईल घेतली का पुन्हा तपासून पाहिलं. आणि मुलगी? ती जॉब करते, तोही जॉब करतोय. दोघेही उत्तम भविष्याच्या दिशेने करीयर करत आहे. स्वाभिमान दोघांत काठोकाठ भरलेला. दोघेही यशाच्या पायऱ्यांवर आहे, दोघांनाही त्यांची ध्येय दिसताय. पण त्या दिवशी त्यांच्या शरीराने गतिरोधक दाखवला. झालं असं की, त्यांच्या शारीरिक गरजांमुळे ते नवरा बायको होऊन जवळ आले. इतके दिवस मनाने तर एकमेकांच्या साथीला नव्हते. पण शारीरिक गरजेने नवरा बायको असल्याचं कर्तव्य पूर्ण करत ते त्या रात्री ऑफिसची कामं बाजूला ठेवून वेळात वेळ काढून एकत्र आले. एकत्र आल्यानंतर जे झालं ते अशावेळी रोमँटिक नव्हतं. तुम्हाला प्रेमात पडल्यानंतर एका रात्रीची मजा रोमँटिक वाटते. पण ज्यावेळी त्याचे परिणाम तुमच्या समोर येतात, तुमची…

 • Marathi City

  एकतर्फी प्रेमातलं ‘सॉरी’

  तो मेसेज करतो, तीन चार महिने उलटले की एकदा. मेसेज मध्ये लिहिलेलं असतं, “सॉरी” जेमतेम तीन चार भेटीतली ओळख ! तो माझा सिनियर होताा. त्याला कोणत्या तरी मुहूर्तावर माझ्यावर प्रेम झालं. बरेच दिवस शांत राहून त्याने मला न्याहाळल. नजरेतला आसमंत प्रेमाच्या कल्पनेने तुडुंब भरला. त्याच्या नजरेत त्याच्या मित्रांनी प्रेम पाहिलं. अन् तिथेच त्याचा आसमंत माझ्यासमोर आला. मित्रांनी सांगितल्यावर त्यावर विश्वास न ठेवणाऱ्या मला घेऊन ते क्लासरूममध्ये गेले. आम्हाला दोघांना बोलायला एका क्लास मध्ये ठेवलं. माझं उत्तर ठरलेलं होतं. त्यामुळे त्यात बदल होणार नव्हता. त्याला म्हटलं काय झालं? बोल. तो एकदम शांत झाला. पाच मिनिटाच्या त्या वेळेत एकही आवाज त्या खोलीत नव्हता. मी तिथून निघून आले. त्याला वाईट वाटले. त्याने दुसऱ्या…

 • Marathi City

  त्याच्या आयुष्यातला ‘तो’ स्पर्श!

  स्पर्शाची भूक असते माणसाला… मग तो स्पर्श तिचा असो अथवा त्याचा… जिव्हाळा शोधायला स्पर्श मानवायला हवा… मला स्पर्श सेलिब्रेट करायला आवडतो. हो, प्रत्येकाला नाही जमत तो. अशी त्याची वीण मोकळी सोडावी लागते. नातं घट्ट असलं की वीण सैल सुटते. स्पर्शाचं परिसासारख असतं. ज्याला करतोय, त्याचं सोनं व्हावं अथवा ज्याने आपल्याला केला त्याच्यामुळे आपलं सोनं व्हावं… त्यामुळे स्पर्श हा एका सेकंदाचा खेळ नाही. स्पर्श दोरीसारखा असतो, धागा धागा जुळत जाऊन ही स्पर्शाची वीण एकमेकांना जवळ आणते. त्याने थोडं पुढे यावं, तिने थोडं त्याच्याकडे झुकावं… त्याने हळूच पाण्याचे थेंब फेकावे तिने अलगद झेलण्यासाठी थांबावं… हा प्रवास असतो, प्रेम उगवल्यापासून प्रेम डोईवर येईपर्यंतचा… अन् श्वासांच्या शेवटच्या घटकेला प्रेमाचा अस्त होताना नव्या प्रेमाची सकाळ…

 • Happening City,  Marathi City

  जोडीदार तुमच्या लायक आहे का?

  त्याचा, तिचा वाद होतो… नाही म्हणत म्हणत खूप टोकाला जातो. प्रेम जपायच्या काळात ते कारणं देऊ लागतात. लग्न म्हटलं की आई वडिलांच्या शब्दापुढे जाणार नाही म्हणतो. पण त्या काळात समोर येतं त्याचं दुसऱ्या मुलीबरोबर चाललेलं प्रेम प्रकरण. यावर ती जाब विचारते, तो तिच्यावरच चिडतो. विश्वास, काळजी आणि इमोशनल शब्दांच्या गोजिर्या खोट्या परिकथेत तिला रमवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रेम असल्यामुळे ती हे सगळं ऐकून लगेच निघून जात नाही. ती रागावून शिव्या घालते. त्याला ते अपेक्षित असतं. कारण त्याच्या मनाला सत्य माहित असतं. सत्य कधीतरी समोर येणार असतं, याला गृहीत धरून तो आधीच दोघींना हॅण्डल करण्याचं प्लॅनिंग करतो. एकावेळी दोन व्यक्ती आयुष्यात असल्यावर त्या दोन्ही व्यक्तींना अनभिज्ञ ठेवून तो त्याचा कुलूप चावीचा…

 • Happening City,  Marathi City

  माझ्या मनातला, माझा न जन्मलेला जन्म.!

  “तुमच्या अंगातली ती नस काढून टाका बरं, जी तुम्हाला बाई म्हणून काही आव्हान पेलू देत नाही…” साला हा प्रॉब्लेम तोपर्यंत जाणवत नाही जोपर्यंत एखाद्या रविवार तुम्ही १४ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर क्रिकेटच्या मैदानावर जात नाही … किंवा मग देवकुंडच्या धबधब्यावर जातात, जिथे तिथला तो धबधबा असा अंगावर येत असतो पण तुमची आणि तुमच्या अंगावर मनाची वाढ फक्त होत असते कारण त्या अंगावर ‘भीती’ नावाची कातडी जाडसर थरात चिकटलेली असते … त्यामुळे त्या एवढ्या प्रकर्षाने अंगावर येणाऱ्या पाण्याला तुम्ही विरोध करत दुरूनच मुलं कशी त्या पाण्यात पोहतात, याचा समजूतदार आनंद लुटतात…. आणि दुरूनच त्या जाडसर भीतीच्या थराला समाजाने दिलेलं ‘नाजूका’ नाव तुम्ही जगू लागतात आणि गर्वाने वाढत राहतात नाजूका म्हणूनच!… आणि असं…

 • Marathi City

  सुखाचा मोगरा!

  मन मंदिराच्या सुखासाठी, घर मंदिरात लावला मोगरा होता,खुडून कुणी नेले फुल देवाला, तिथे सुगंध सांडला होता… एकाने फुल तोडले, पण तो सुगंध सगळ्यांत वाटला गेला… त्यामुळे सांगते, चांगल्या गोष्टी करता जा रे स्वतःसाठी, त्याचा फायदा दुसऱ्या कुणालातरी होईल. जसं गाणी ऐकताना तुमच्या बरोबर तिर्हाइत कुणीतरी गाण्याचे बोल ऐकत असतो, मोठ्याने पुस्तक वाचताना त्यातला विचार कुणाचंतरी आयुष्याचं कोडं सोडविणारा ठरतो, स्वतःच्या समाधानासाठी केलेली मदत तिसऱ्या कुणालातरी फायद्याची ठरते, एखाद्याला दिलेला सकारात्मक सल्ला तो पुढे जाऊन तिसऱ्या कुणालातरी देतो, आकर्षक दिसण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करून स्वतःला खुश करता, त्यातून तिसऱ्या कुणाच्या तरी पाकिटात पैसे जातात, स्वतःच्या यशासाठी नोकरी करता, त्यातून कंपनी अन् घराची चूल पेटते, तुम्ही आतुन सकारात्मक आणि खुश राहता तेव्हा त्याचा…

 • Marathi City

  आयुष्याचा तोल!

  इतका उबग येतो का हो आयुष्याशी लढताना? तुम्ही त्याचे होता की ते तुमचे होऊ पाहते तुम्ही मिंधे होताना? थोडा सल्ला पाकळीला विचारू,त्रास होतो का ग सांडताना? तू कोणासाठी करावं, लोक तुझ्यासाठी करणार नाहीत,तरीही उरली उमेद तर करत जा त्यांच्याहीसाठी! तुझा परतीचा प्रवास तुला वाटतो सुरू झाला,मी सांगते ही वाट अजून तक्रारींची लागलीही नाही तुझ्या वाट्या. मोहऱ्या मिरची खूप होतेय, पूड घालून सोपं कर, माणूस आहेस तशीच रहा, ढोंग माणसाचे नि रंगफुलांचे गळून पडता अर्ध वयात. बी रुजून कोंब फुटून अंकुराला झेलता सगळे ऋतु, कळी होऊन फुल होते रंग कवेत घेते ग तू,आज रंग कवेत घेताना रस्त्यात अलवार गळून पडतं हातातलं फुल, प्रवास तितकाच त्याचा, तिथे तो गळून पडून मृत्यू होतो…

 • Marathi City

  प्रेम अन् समुद्र!

  समुद्रासारखंच तर असतं प्रेम…ज्याचं आकर्षण तुला, मला, प्रत्येकाला असतं.समुद्राच्या किनार्यावर निवांत आनंद घेताना वेगळाच सुकून हृदयाच्या पटांगणावर असतो. थंड हवा, कोवळं ऊन, संध्येची तिरीप, चार विटांची चूल, वेगवेगळ्या अँगलचे फोटोज्, प्रत्येक दगडाच्या आकाराचे आकर्षण, शंख शिंपल्यात दोघांच्या मौल्यवान नात्याची कल्पना, नारळाच्या झाडांना पाहून ‘नातं इतकं उंच आणि अतूट जपायचं’ याची वचने… चारी बाजूंना दगड ठेवून त्यांना दोरी बांधून डोक्यावर छपराची कल्पना… अन् दोघे रात्रीचं कामावरून घरी आल्यावर चुलीवर जेवून मऊशार गादीवर खालून दगडांचा बाज करून एकमेकांच्या मिठीत झोपी जायच्या गोष्टी… सगळं ‘कहो ना प्यार हैं’च्या बीचवरचं… सगळं शब्दिक स्वप्नवत जादुमय फिलिंग! नवं विश्व साकार करणार असल्याचं फिलिंग! किनाऱ्यावर बसून लाटांचा नवखा स्पर्श हळूहळू संपूर्ण अंगभर भिनू लागतो, शिंपल्यात मन घट्ट…

 • Happening City,  Marathi City

  ते तृतीयपंथी!

  खूप दिवसांनी बाहेर पडल्यानंतर सिग्नलला थांबलेली लोकं पाहून डोळे सैरभैर होत होते. प्रत्येकाच्या नजरेत पोटापाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामाची भूक दिसत होती. कदाचित कोरोनामुळे आपल्याला आपल्या प्रायोरिटी सेट करणं सोप्प झालं असेल. पुन्हा सगळं नॉर्मल होऊन आपण कोरोनाची तीव्रता एक दिवस विसरणार आहोत. याच सिग्नलवर दोन तृतीयपंथी आले. त्यांच्या टाळ्यांनी अजाणत्या वयात कसतरी व्हायचं, नकळत मैत्रिणींसोबत नजरानजर होऊन हसूही यायचं. पण जोपर्यंत समाजाचं वास्तव बघण्याची नजर आणि जाणीव होत नाही तोपर्यंत समाजावर हसणं सोप्प जातं. प्रत्येकाला त्याच्या वाट्याला आलेले आयुष्य स्विकारण्याशिवाय पर्याय नसतो. आणि मी म्हणेल जो तो ज्याच्या त्याच्या परीने खूप मुश्किलीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. आपण का जज करायचं? त्या टाळ्यांच्या आवाजाने माझं लक्ष पुन्हा वेधलं गेलं. त्या…