• Happening City,  Marathi City

  जग फोटोग्राफरचे!

  हा दिवस स्पेशल आहे… आजचा दिवस हा सगळ्या फोटोग्राफर्सच्या जिव्हाळ्याचा दिवस असतो. जीव असलेल्या कॅमेराबद्दल पार जीव ओवाळावा इतकं प्रेम येतं नि एक फोटोग्राफीचा काळ/ जर्नी डोळ्यासमोरून जाते…. बदलत्या काळासोबत किती गोष्टी बदलतात. आणिबदल हा या फोटोग्राफीचा सगळ्यात प्रमुख नियमच जणू !जसं जसं काळ बदलत गेला, तेव्हा तेव्हा हा काळ कैद करून ठेवलाय तो या कॅमेराने. कॅमेराने काळही स्विकारला नि तोच काळ सतत कैद करण्याचं अमीष फोटोग्राफर्सला सूपूर्दही केलंय. फोटोग्राफीने सामान्यातल्या सामान्याला अमीर बनण्याची मुभा दिली. स्वतःच्या निव्वळ वेगळ्या दृष्टीने, दृष्टीकोणाने स्वातंत्र्य दिलं स्वतःच असं वास्तविक आयुष्य कल्पनेत जगण्याचं.एकदा हातात कॅमेरा आला की सुरुवात जरी स्ट्रीट फोटोग्राफी, कॅन्डीड फोटोग्राफी, पोट्रेचर फोटोग्राफी यांचे अगणित प्रयत्न करून होत असली तरी, त्याचा अंत…

 • Happening City,  Marathi City

  जर पाळी त्याला येत असती…

  जर पाळी त्याला येत असती.. तर मी मुक्त झाले असते… माझी वर्जिनिटी हा माझ्या मर्जीचा विषय झाला असता. जर पाळी त्याला आली असती तर, संभोगाकडे हात वळवताना त्याने आधी समाजाचा विचार केला असता. पाळी त्याला आली असती, तर माझ्या शब्दांना मान आला असता. समाजाच्या नजरेत मी स्वतंत्र वावरले असते. पाळी त्याला आली असती तर अंग आणि इज्जत त्याने झाकली असती. तेव्हा एखाद्या घरात म्हटलं असतं, वंशाला दिवा नको घराण्याला पणती हवी आम्हाला. जर पाळी त्याला आली असती तर घरात त्याने संसर्ग का होईना पण दमट मोरीत लपवून पाळीचे कपडे वाळत घातले असते. पाळी त्याला आली असती तर दर महिन्याला त्याला खूप त्रास झाला असता, मग लपवून काळया पिशवीत मटणा ऐवजी…

 • Happening City,  Marathi City

  बंदिश बँडीट्स तडका!

  अर्ध्या तासाच्या वर कधी शास्त्रीय संगीत मन लावून ऐकले, असं झालं नाही. ती माझ्यातली कमतरता मानून मी मुडनुसार गाण्यांचा अस्वाद घेते… संगीत कोणतेही असो त्याच्याशी आपण कनेक्ट व्हायला हवं, ही त्या गीताची पावती असते. पण प्रत्येकासाठी गाण्याचं स्थान वेगळं असतं. माझ्यासाठी ते मुड बदलणारं वाद्य असेल तर इतर कोणासाठी तरी ते त्याच्या प्रिय व्यक्तीने समर्पित केलेली भावना असेल, एका अल्लड मुलासाठी त्यावर थिरकणे हे रसिकतेचे रुप आहे… मी कधी शास्त्रीय संगीताला मनावर घेतलं नाही. वर म्हणाले तसं गाणं ऐकणे हे सक्तीचं नसतं. संगीतामध्ये आपण मश्गूल होऊन जातो, जिथे इतर कोणी महत्त्वाचं वाटत नाही. मी गीतकाराच्या नजरेतून संगीत ऐकलं नाही, ना पाहिलं. माझ्यातला रसिक श्रोता ज्या ठिकाणी समाधीमग्न होतो ते संगीत…

 • Marathi City

  ना प्रेम ना मैत्री!

  तो; तुझ्या बांधलेल्या केसांपेक्षा तुझ्या जड डोळ्याचं अर्धवट उघडणे मला अनुत्तरित करतं. ती; याचा अर्थ काय? मला अर्थ नाही लागत. तो; तू मला कधीतरी स्वयंपाक करत असताना आठवून पाहिलंय? या जगात स्वयंपाक घरापेक्षा पवित्र जागा नसते. ज्यासाठी मनुष्य धडपडत असतो, त्या भुकेला शमवणारे ठिकाण खरेच किती निर्मोही आहे, निस्वार्थ आहे. मी स्वयंपाक बनवताना तुझी आठवण काढतो, मग आठवणीतून हळूहळू तुला सत्यात घेऊन येतो, तुला काही त्रास आहे का विचारतो. पण तू तरीही अशी अर्धवट डोळे जड पडल्यावर कस वाटतं तशी भासते मला. मी जेव्हाही तुझा विचार करतो, तेव्हा मला तू झाडांच्या पारंब्यांच्या कोपऱ्यात दबून गेलेला पक्षी वाटते. तुझे पंख कुठे आहेत? ती; कोणीतरी घेऊन गेलंय. तो येण्याची वाट बघतेय. तो;…

 • Happening City,  Marathi City

  राखी विशेष?

  वंशाचा दिवा म्हणून मुलगा पाहिजेच मानणारी पिढी रक्षाबंधनाला बहीण कशी देणार? कित्येक घरांमध्ये भाऊ किंवा बहिणीची कमतरता भासत राहते. काहीजण नैसर्गिकरीत्या दिलेले अपत्य आपले मानून समाधानी होतात. पण आजही गर्भानिदानातून कित्येक बहिणींना मारून टाकले जाते. गर्भात नाही मारले तरी स्त्री म्हणून गर्भाबाहेर असलेला समाज आणि पुरुषसत्तेचा पाठीराखा तिचा बळी देत राहतो. जन्म झाल्यापासून मुलींचा सतत तिटकारा करून मुलगी म्हणून मिळालेला हा जन्म कसा निरर्थक म्हणून लहानपणी खूप जास्त राग यायचा, चीड यायची. या विचारसरणीला विरोध करता येतो किंवा त्या विरोधात उभे राहून काहीतरी बदल करता येतो, हे वातावरण सुद्धा आजूबाजूला मिळत नव्हते. तेव्हा, हा समाज पुरुषवर्गच चालवतो, किंबहुना तो त्यानेच निर्माण करून जपला आहे हा विचार माझ्यात मुलगी म्हणून रुजायला…

 • Marathi City

  दोस्तीतला बाप!

  दोस्त …. म्हणे दोस्त… नीट बघा बरं दोघांना…  दोस्त दिसता का हो ते ? “त्यातला एक तुम्हाला बाप वाटेल आणि दुसरा त्या बापाने दत्तक घेतलेला मुलगा…” याव्यतिरिक्त, तुम्ही लोकं वेडे असतात त्यांना मित्र म्हणतात… तुमची काही चुक नाहीच म्हणा ते दोघे हरामी, तुम्हाला जे दाखवायचं तेच दाखवता.. बघायची तुम्हाला त्यांची यारीच, तर जा त्या ठिकाणी (ते ही त्यांनी येऊ दिल तर ) जिथे ते दोघे मित्रांशी खोटं बोलून गपचुप कुठेतरी फिरायला जाताय… लोकांसमोर शांततेचे ते पुतळे बसतात, पण नजरेनेच ते एकमेकांचा आनंद बनता …. जा अशा ठिकाणी,  जिथे ते एकमेकांच्या सोबतीने रडतात… आणि जा अशाही ठिकाणी, जिथे ते एकमेकांच्या सोबत नसू या भावनेने रडतात… जा  तिथेही जिथे ते निव्वळ शांत…

 • Marathi City

  मैत्रीचं नातं…

  काही क्षण कित्ती सुंदर असतात ना… म्हणजे सहज गॅलरीमध्ये जाऊन बसावं… थंड वाऱ्याचं येणं असावं… बॅकग्राऊंडला एखादं सुफी गाणं चालू असावं… हातात मोबाईल असावा… एखादा मित्र आपल्या टाईपचा असावा… असतात खरंतर … टाईपचे फक्त प्रियकरच नसतात मित्रही असतात… त्याच्याबरोबर आयुष्याचा सगळा हरिपाठ, रडगाणं, पारायण शेअर करावं …त्यानं त्याचं सांगावं … त्यात एकाने निगेटिव्ह बोललं की दुसऱ्याने त्याला आपटू न देता उचकवत आव्हान देत पॉजिटिव्ह करत वरती आणावं…. त्यात आज बोलता बोलता विषय निघाला, माझ्या ‘ब्रेकअपचा’ मग त्याने विचारल, “भेंडी दरवेळी तुला सारखसारखं म्हणायचं का, काय झालंय …. भडाभडा बोलून मोकळं हो गं ….पुन्हां त्याच्याशी वाजलं का ?” “हो …. आज शेवटचं… ” मी ठामपणे म्हणाले. “हे गेल्या ४-५ महिन्यापासून ऐकतोय…

 • Marathi City

  लॉकडाऊन लव्ह!

  ‘आपलाच प्रिय व्यक्ती अनपेक्षित वागू शकतो?’ या प्रश्नाच्या उत्तरात विणा होती. हा काळ तिच्यासाठी खूप त्रासदायक, एकटेपणाचा आणि कठीण होता. विणाला असं एकटं आणि गुमसुम कोणी पाहिलं नव्हतं. तिला दिलखुलास आणि मोकळं राहायला आवडायचं. पण तसं पाहिलं तर हा काळ सगळ्यांसाठी कठीणच आहे. पण ती बंदिस्त घराच्या चार भिंतींमध्ये खूप एकटी पडली होती, तिला कोणी समजून घेत नाही ही तिची स्वतःशी रोजची तक्रार होती. दिवसभर ना बोलायला कोणी होतं ना समजून घ्यायला. मित्र मैत्रिणी असूनही तिला त्यांच्याशी पर्सनल आयुष्य डिस्कस करण्याची कसलीच इच्छा नव्हती. कारण तिला गॉसिपमध्ये इंटरेस्ट नव्हता, तिला तिची कामं बरीच होती. पण संपूर्ण दिवसाचा निवांत वेळ म्हणून तिला त्याच्याशी बोलाव वाटायचं. असं नव्हतं की रवीश तिला टाळत…

 • Happening City,  Marathi City

  दिल बेचारा; अपूर्णच!

  #film_spoiler मला प्रश्न पडतो, संपूर्ण आयुष्य गमावत असताना, काही स्वप्न उरतात सुद्धा? जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही मरणार आहात! किती क्रूर आहे आयुष्य, जितक्या यातना बाळाला जन्म देताना स्त्रीला होतात, तेवढ्याच वेगळ्या वेदना मरताना माणसाला होत असतात. पण मरतानाही स्वप्न उरतात, त्याचं उत्तर माझं मलाच मिळतं. स्वप्न उरतात जर ती स्वप्न पाहण्याची हिंमत देणारं प्रेम तुमच्या आयुष्यात असेल तर… जर ते प्रेम किझी आणि मॅनीसारख असेल तर…! प्रेम ही या जगात खूप ताकदवान गोष्ट आहे, मृत्यूपेक्षासुद्धा. याची ओळख दिल बेचारा चित्रपटात होते. चित्रपटाची कथा ब्लॉगर किझी बासू आणि इमॅन्युएल राजकुमार ज्युनियर उर्फ मॅनी या दोन्ही कॅन्सरग्रस्त प्रेमींची ही जीवन मरणाची कथा. त्याहीपेक्षा जास्त सुशांतच्या खऱ्या आयुष्याचा हा शेवटचा चित्रपट. त्याच्या…

 • Marathi City

  मृगजळ प्रेमाचं!

  मृगजळ कसं दिसत असेल? हा प्रश्न कधी पडला तर त्याला प्रेम नावाची मधमाशी दाखवून द्यायची… हो, प्रेम मृगजळच वाटतं मला.  ज्याला मृगजळची ओढ असते, तो प्रेमात पडतो… आणि मृगजळ हातात पकडण्याचा अक्षम्य प्रयत्न करतो. मृगजळ म्हणजे फार काही नाही जे असल्याचा भास होत असतो, पण ते प्रत्यक्षात नसतं. पण याचा अर्थ प्रेम नसतं असा आहे का? तुम्हाला अस झालंय का माहित नाही. पण प्रेमात पडायच्या आधी तुम्ही प्रेमाची स्वप्न पाहत असतात. माझा जोडीदार म्हणून त्याची रफ स्केचिंग मनात करत असतात. पण जेव्हा तो समोर येतो, तेव्हा तुम्ही सगळ्या कल्पना खोडून मनात नवा कागद रंगवायला घेतात. त्यात खरा माणूस जसाच्या तसा रेखाटून त्याच्या विशिष्ट सवयींना अधिक मोहकपणे पाहू लागतात. किंबहुना तुमच्या…