Happening City,  Marathi City

पुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… ?

भाग – ३ 

तुम्हाला माहिती आहे का, पहिले सॅनिटरी पॅड हे पूरूषांसाठी बनवले गेले. ?

तर अभ्यासावरून हे दिसून आले कि पहिले डिस्पोजेबल सेनेटरी पॅड फ्रान्समध्ये युद्धात नर्सने विकसित केले होते. ते युद्धक्षेत्रात जखमी सैनिकांमधील अति रक्तस्त्राव नियंत्रित करण्याचा पर्याय म्हणून निर्माण केले गेले. ते शोषक आणि स्वस्त आणि वापरल्यानंतर फेकून देण्यास सोयीस्कर होते. बेन फ्रँकलिनच्या आविष्कारामुळे सैनिकांना जबरदस्त जखमांपासून बचावले, या डिस्पोजेबल नॅपकिन्स वायूच्या वेळेस सहज उपलब्ध होते अशा सामग्रीमधून बनविल्या गेले. ते अत्यंत सोयीस्कर आणि वापरल्यानंतर फेकून देण्यासाठी स्वस्त होते.

व्यावसायिक उत्पादकांनी ही कल्पना उधार घेऊन प्रथम डिस्पोजेबल पॅड १८८८च्या सुमारास – साउथबॉल पॅड या नावाने निर्माण केले. अमेरिकेत, जॉनसन आणि जॉन्सन यांनी १८९६ मध्ये ‘लिस्टर्ज टॉवेल: सेनेटरी टॉवल्स फॉर लेडीज’ या नावाने त्यांची स्वतःची आवृत्ती विकसित केली.

आताची परिस्थिती

जेव्हा स्त्रिया म्हणतात कि, एकविसाव्या शतकातही पुरुष मासिक पाळीचा टॅबू कायम ठेवण्यास कारणीभूत आहे. त्यावेळी याचा प्रत्यक्षात अभ्यास केल्यावर लक्षात येते कि, मासिक पाळीबाबत खेड्या – पाड्यातील, वाड्या – वस्तीवरील महिलांमध्ये जागृती करणे आवश्यक असून, शिक्षणात लैंगिक शिक्षणात मासिक पाळीबाबत स्वतंत्र विषय असावा व अगदी पाचवीपासूनच मुलीमुलांना मासिक पाळीबाबत जागृत करणे आवश्यक आहे.. खरतर आधी शेतात काम करावं लागायचं, नदीतून पाणी आणायचं, कपडे नदीवर धुवायला न्यावे लागायचे, दळण जात्यावर दळाल जायचं, हि सर्व कष्टाची कामे होती, त्यावेळी मासिक पाळी आली असता हि कामे करणे खूप कठीण असायची, शिवाय अशक्तपणा असायचा, त्यावर उपाय म्हणून घरचे लोक त्यांना आराम मिळावा म्हणून एकजागी बसायला लावायचे, आणि असे नियम लावलेत कि त्यांना कुणातच न मिसळून काम करावे लागू नये, हे तेव्हाच्या काळात योग्य होते, कालांतराने याची अंधश्रद्धा होत गेली, आणि आता सर्व कामे सोपी झाली आहे, पॅड्स, टॅम्पॉनस, मासिक कप्स वापरून सहजपणे केली जाऊ शकतात, त्यामुळे कुठलेच नियम, अंधश्रद्धा आता पाळण्याची गरज नाही. तसेच शबरीमाला मंदिरात सर्व स्त्रियांना जाण्याची अनुमती द्यायला हवी.

तसेच, मासिक पाळी आणि त्या दरम्यान होणारे सॅनिटरी नॅपकिन्स या विषयाबद्दल बोलल्याशिवाय अडचणी कळणार नाहीत. त्यामुळे बोलणे गरजेचे आहे. आजकाल इंटरनेट, सोशल मीडिया अशा माध्यमातून या विषयावर मोकळेपणाने चर्चा होत आहेत. शाळा आणि कॉलेज जिथे खुले वातावरण असते तिथे मित्र मैत्रिणींसोबत या विषयांवर बोलायला कोणताही संकोच होत नसल्याने याबद्दल जाणीवनिर्मिती होत आहे…. हा बदल सकारात्मक आहे.

काही पुरुष म्हटले कि, आता मूलभूत गरजा केवळ तीनपुरत्या मर्यादित राहिल्या नसून त्या सकारात्मक पद्धतीने विस्तरायला हव्या. समाजाने जल, जंगल, जीवन आणि जिज्ञासा याबाबत शिकायला हवे. आणि आपल्या समाजाने अशा टॅबूबद्दल बोलायला हवे, त्याला स्वीकारायला हवे. त्यात स्वच्छता महत्त्वाची. सोशल मिडीया, चित्रपट, डॉक्युमेंट्री ही माध्यम नक्कीच समाजसुधारणेला वाव देणारी आहेत. पण, आजही खेड्यापाड्यातील सुशिक्षित लोक आणि स्त्रिया मासिक पाळीला वाईट समजतात किंवा देवाशी जोडतात. चित्रपट किंवा सोशल मिडीया अशा माध्यमातून ही कीड सहज निघणारी नाही. त्यासाठी मुली आणि महिला स्पष्ट बोलतील तेव्हाच ही कीड नाहीशी होईल. आमच्या गावातल्या एकानेही पॅडमॅन थिएटरमध्ये जाऊन पाहिला नसणार आणि जेव्हा टिव्हीवर रिलीज झाला तेव्हाही गावातल्या एकाही कुटुंबाने तो सोबत पाहिला नसणार याची मी पुण्यात बसून खात्री देतो. प्रत्येक मुलगी स्पष्ट आणि बेधडक बोलेल तेव्हा हा विषय सहजसोपा होऊन जाईल.

काही स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी त्यांच्या गरिबीमुळे वृत्तपत्रे , चिखल, आणि राखेचा ही वापर करतात. यामुळे मात्र संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी भारतात आरोग्याच्या दृष्टीने आणि विकासाच्या दृष्टीने विकसित व्हायला हवे. जागरुकता ग्रामीण भागात होणे अत्यंत गरजेचे आहे.ती काही घाणेरडी गोष्ट नाहीये म्हणून लपवून ठेवावी.याबाबत जास्तीत जास्त जनजागृती झाली पाहिजे. जागृती झाल्यामुळे माझ्या आया बहिणी यांच्या वरील होणारे दुष्परिणाम त्यांच्यावरील होणारे अंधश्रद्धाचे सावट दूर होतील.शो ऑफ किंवा मार्केटिंग कंपनी पेक्षा जास्त फोकस हा स्त्री शरीर व मानसिक स्वास्थ्य हे विषय हवेत. हा विषय एवढा नॉर्मल होयला हवा की त्याचे फारसे वावगे ही कोणाला वाटू नये एवढा साधा. जसे की पाणी पिणे, जेवण करणे, झोपणे इत्यादी.

या अभ्यासावरून हे लक्षात आले कि, स्त्रीयांपेक्षाही पुरुष जास्त व्यक्त होत आहे. जेव्हा आदिवासी भागात स्वयंसेवी संस्था मासिक पाळी जनजागृतीसाठी जातात तेव्हा त्यात ८०% पुरुषांचा सहभाग असतो. परंतु २०% महिलांनाच बोलावे लागते कारण आदिवासी स्त्रिया या पुरुषांसमोर मोकळेपणाने बोलत नाहीत, त्यामुळे संस्थेच्या इतर कामात पुरुष सहकार्य ठेवतात.

( क्रमश: )

Please follow and like us:
error

One Comment

  • Kiran

    खूप महत्त्वाचा विषय आहे हा…. सर्व गोष्टी उजेडात आणल्या बद्दल धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *