• Happening City,  Marathi City

    थप्पड; घरेलु विचारसरणीला!

    लेखन फेमिनिस्ट वाटण्याची शक्यता. स्वतःच्या समजदारीवर वाचणे! मानवी आयुष्यात एक मर्यादा संपली की तो दुसरी गाठू लागतो. कारण मर्यादा लांघणे म्हणजे अडवेंचर! कसं? तर अशा पद्धतीने बघा, माणसाला प्रेम होतं तेव्हा सुरुवातीला खूप वेगवेगळ्या भावना निर्माण होतात, प्रेमाला मिळवण्याचा प्रयत्न होतो, मग हळूहळू स्पर्श, मग अलगद स्पर्श, मोक्याच्या क्षणी मिठी, यापुढच्या गोष्टी अवघड असतात पण हव्या असतात. मग मिठी रोजची होऊन जाते, मग किस, फोरप्ले, संभोग आणि मग तेच ते रूटीन… हेच चक्र हिंसेबाबतही असते. कसे? तर आधी समोरच्या व्यक्तीचा साधारण राग येणं, त्या साधारण रागाला समजावून सांगणं, मग पुढच्या वेळी अधिक राग येणं, तेव्हा अंगावर धावून जाणं, तिसऱ्या वेळी समोरच्याबरोबर तुमचा आवाज वाढणं, मग रागात दात ओठ खाऊन रागाला…