आजचा ट्रेंन्ड काय?

माध्यमांमध्ये प्रत्येकवेळी म्हटलं जात कि, आज ह्यांव ट्रेंडिंग तर आत्ताच्या क्षणाला त्यांव ट्रेंडिंग. उदाहरणार्थ, गेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आदित्य ठाकरेंपेक्षा जास्त ट्रेंडिंग आहे. किंवा नवीन प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची नेटिझन्समध्ये कितपत चर्चा होऊन सर्चिंग झाले आहे? किंवा मग जगभरात आजच्या तारखेला इंटरनेट सेन्सेशन म्हणजेच इंटरेनेटवर सर्वात जास्त सर्च झालेली गोष्ट कोणती? ही आकडेवारी, हा आलेख, ही नावे कशावरून  काढली जातात ? ती आपल्याला पाहता येतात का? ती आपल्याला समजू शकतात का ?
या ट्रेंड्सचा वापर आपण करू शकतो का? हो, तर तो कसा? एखाद्या ट्रेंडिंग विषयाचा व्हिडीओ, लेखन, ब्लॉग, कन्टेन्ट जास्त का बघितला किंवा वाचला जातो?
जर तुम्ही ऑनलाईन कन्टेन्ट क्रिएटर किंवा डिजिटल क्षेत्रात काम करत असाल तर ‘ऑनलाईन ग्राहक आपल्याकडे आकर्षित करणे’ हे आव्हान असते, मग त्यासाठी काय करता येईल? एखाद्या दिवशी ऑनलाईन प्रेक्षकांना द्यायला नवा विषयच सुचत नाही अशावेळी काय करायचे? कोणत्या अचूक गोष्टींचा पाठपुरावा करायचा?  

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्सुकता मलाही होती. कारण या जगात ज्ञान खूप आहे, माहितीचा साठाही बलाढ्य झाला आहे. पण नेमकं ज्ञान कुठे नेऊन ठेवलंय याची दिशाभूल करणारे नेटकरीसुद्धा खूप आहेत. त्या गर्दीत माझ्या प्रश्नांची उत्तरे आणि धान्य निवडण्यातून खडा बाहेर काढावा तशा काही वेबसाईट्स बाहेर पडल्या.

1. geo=INhttps://trends.google.com/trends/?geo=IN
ही गूगल संलग्न वेबसाईट आहे. यावर प्रत्येक देशात कोणत्या वेळेला कोणती गोष्ट मोठ्या प्रमाणात सर्च झाली हे बघता येते. याशिवाय, कोणात्याही व्यक्तीचे, नावाचे, घटनेचे किंवा घटकाचे सर्चिंग करून तुम्ही त्याचे व्यूव्ज पाहू शकता. उदाहरणार्थ, वेबसाईट ओपन करून ‘Enter a search term or topic’ या रकान्यात ‘संजय राऊत’ हे नाव टाकून एंटर बटन दाबायचे. त्यानंतर गुगलतर्फे तुम्हाला आजच्या दिवसाचे, गेल्या बारा तासांची सर्च संख्या कळते. हा रिजल्ट दाखवल्यांनंतर शेजारीच ‘+compare’ हे बटन असते. ते दाबून त्याच्या प्रतिस्पर्धींची नावे टाकून तुम्ही तुलनाही करू शकतात. तसेच संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी तुम्ही सर्च केलेल्या विषयाशी निगडित कोणत्या घटनांचे किती प्रमाणात सर्चिंग झाले याचीही आकडेवारी दिली जाते. त्यामुळे, ही आकडेवारी नामांकित ब्रॅण्ड्स आणि माध्यमांच्या ठिकाणी अधिकृत आणि ग्राह्य धरली जाते. त्यावरुन ट्रेंन्डसची भाषा बोलणे सोपे होते.    
(बऱ्याच नेट प्रो लोकांना आणि शाळकरी मुलांनाही हे माहित असण्याची शक्यता आहे. कदाचित माझ्यासारख्या कॅटेगरीमधील लोकही जास्त असल्यामुळे स्वतःसाठी हा शोध  घेऊन नंतर त्यांच्यासाठी शेअर करत आहे.)

http://Twitter.com
हा सोशल मीडिया व्यासपीठातील सर्वाधिक अधिकृत प्रकार समजला जातो.
ट्विटर ओपन केल्यांनतर सर्च बारच्या खालीच Trends for you हा प्रकार येतो. त्यामध्ये हॅशटॅग (#) वापरून काही विषय, घटना, व्यक्तीचे नाव असते. जे नाव असेल तो त्या दिवशीचा ट्रेंडिंग विषय असेल.

https://buzzsumo.com/
ही इंटरेस्टिंग वेबसाईट आहे. कारण गुगल किंवा ट्विटर आपल्यासारख्या कमी प्रकाशझोतातील व्यक्तींबद्दल केलेलं सर्फिंग दाखवत नाही. परंतु हि वेबसाईट तुमच्या वेबसाईटपासून फेसबुकच्या आतील गोष्टीही दाखवते. यावर सद्यस्थितीला बातम्या, एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, टेकनॉलॉजि, बिजिनेस, पॉलिटिक्स, व्हिडीओ या आणि अशा अनेक वायरल गोष्टींचा डेटा तुमच्यासमोर आणते. या वेबसाईटला तुमचे फेसबुक जोडून ‘फिल्टर’ हा पर्याय निवडून स्वदेशाबरोबर इतर देशांची माहिती घेऊ शकतो.

Feedly
ट्रेंडिंग विषय शोधण्यासाठी फीडली हे एक उत्तम साधन आहे. TODAY या शब्दावर क्लीक केल्यानंतर प्रत्येक विषयातील आजच्या दिवसातील ट्रेंडिंग तुमच्यासमोर येतात. फीडली हे एक फ्रीमियम ऍप आहे, जे डेस्कटॉप आणि मोबाइलवर उपलब्ध आहे.

https://www.quora.com/
माझ्या निरीक्षणामध्ये आलेल्या अनेक साईट्स पैकी ट्रेंडिंग सामग्री शोधण्यासाठी ‘कोरा’ हा एक उत्तम समुदाय आहे. मी जेव्हा जेव्हा एखाद्या विषयाचा विचार करते, तेव्हा मी ‘कोरा’वरील लोकप्रिय प्रश्न तपासते. ही वेबसाईट आणि ऍप आपल्याला आपल्याशी संबंधित विषयांचे अनुसरण करण्याचा पर्याय प्रदान करते. एकदा आपण असे केल्यास आपण आपल्या कोरा न्यूजफीडमधील ‘शीर्ष बातम्या’ (top stories) पाहणे सहज शक्य होईल. नवीनतम प्रश्न पाहण्यासाठी आपण ‘नवीन प्रश्न’ पर्याय देखील तपासू शकता. आपल्या पुढील ब्लॉग पोस्टसाठी प्रेरणा शोधण्यासाठी हा समुदाय मनोरंजक प्रश्नांनी परिपूर्ण आहे.

याशिवाय अजून काही वेबसाईट म्हणजे
https://www.buzzfeed.com/?country=in
https://getpocket.com/
http://www.socialmention.com/

Please follow and like us:
error

1 thought on “आजचा ट्रेंन्ड काय?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *