अपशकुनी कुंकू?

  • by

सांडल्या पूजेच्या ताटाला अपशकुनी मानणार्‍याणा काय सांगू ,
नितळ पाण्यात कुंकु पडलं तरी तिचं मुख, केसावरची ओली लट नि सडपातळ देह अक्षरशः तरतरीत बोलकी फ्रेम दिसावा ,प्रतिमा इतकी बेदाग होती अशा सौंदर्याच्या कैदेतून स्वतःला सावरत तिचा मऊ हात हातात घेऊन त्यानं अलगद विचारलं …. “फिरसे शादी करोगी मुझसे?”
उधळल्या त्या अपशकुनी कुंकवात ती अशी काय लाजरीबुजरी झाली, कि त्याची पापणी तिच्या नेत्रांच्या दवात तशीच गुंफून राहिली. तिचं लाजणं इतकं काही सांगून गेलं कि त्याला पुन्हा काही विचारावसही वाटेना, तो मनमुराद त्याच्या स्वर्गात गढून गेला.
ती दोघे आज या विखुरल्या कुंकवाच्या नि तांदळाच्या दाण्यात मनसोक्त पहुडले…
अपशकुनाचा साधा लवलेशही नव्हता …

#colors of life

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *