धागे गुंततात, उलगडायला वेळ लागतो.
एकत्र जोडुन धरायला वेळ लागतो ,की मग उलगडण महत्वाचं वाटत नाही ?
असमान आसमंत अटळ होत जातो, निर्मितीकक्षा चिवट होतात आणि ‘पुन्हा एकत्र याव’ हा आविर्भावही कोणाच्या मनावर बिंबत नाही …
माणुस समुद्र नाही होऊ शकत,तो तितका विशाल नाही बनू शकत,त्याच्यात कुणाला आपलंस करण्याच सामर्थ्य नसत…..
सुरेश आज खूप दिवसांनी घरी आला मी खुश होते.अम्मू पण खुश झाली.जाईच्या चेहर्यावर मात्र कडवट भेग विस्फारली.मन्याला काही कळणं तर अशक्य होतं.शेवटी प्रश्न होता सुरेशचा ….
नात्यांचा हा खेळ खुऊप कडवट असतो,समजण्या आणि समजावण्यापलीकडचा …
सुरेश जगला होता.’रुबाबतील ढब’ एक व्यक्तिमत्व होतं त्याच.समोरचा बेधडक गार होऊन त्याच ऐकायचा असा तो होता.पण त्याच व्यक्तिमत्व म्हणजे सुस्पष्ट ढोंगीपणा वाटायचा.
दूर कशाला जायचं,कालचच उदाहरण सांगते.
शलाखाने फेसबुकला स्टेटस टाकलं,
“रिश्तोंसे खूबसूरत कोई दौलत नहीं होती,दौलत होकें भी रिश्ते ना हो तो आपकी खुशिया भी दुबली हो जाती है | “
त्यावर त्याने कॉमेंट केली:
” बहोत खूब आईशा ,…. आजकाल की जेनरेशन कहाँ ईतना सोचती है ….”
सुरेश इथेच सिद्ध झाला
पण………….
हो ‘पण’ आहेच.
स्वभावबद्ध प्रतिमा कधीकधी बदलतात, इतक्या की सुखद अपेक्षाभंग होतो आणि आवक भाव जखडून मन जोखिमीने प्रश्न करायला लागतं .
सुरेशने आज ‘मला’ घरी आणलं होतं. मन्याला बोटांनी अक्षरओळखीची पाटी आणि अम्मूसाठी साडी आणली होती ….
पण जाई मात्र कडाडून तापली होती. तिच्या रेखीव डोळ्यांत तो अंगार झळकला,अम्मूने हातानेच शांत केल तिला.
भेगाळलेला राग तिचा एखाद्या नसेतून बाहेर येणार तोच
‘सदाबहार’ला ‘आपकी नजरोनें समझा’ लागलं…
आणि……..
आणि चक्क सुरेशने जाईचा हात हातात घेतला. तिला एका जेंटलमनसारख ‘वूड यू लाईक टू डॅन्स विद मि ?’ विचारलं. अडखळत,गोंधळत जाईची पुरती धांदल उडाली… हो? नाही? च्या वावरातच ती नकळत त्याच्याबरोबर संलग्न झाली.
घरात आम्ही सगळे होतो अगदी आधीचेच सगळे … पण त्याने घेतलेल्या या अनपेक्षित स्वभाव वळणाने आम्हीही चाटच पडलो…
जाई खुश होती ,जाईसाठी भेट म्हणून खुद्द सुरेशच आला होता,तिला आता काहीच नको होत …
अम्मूची तर काळजी तेव्हाच मिटली,जेव्हा सुरेशने आईसाठी साडी घ्यावी, या विचाराने साडी आणली. अक्षरओळखीची पाटी आणून न सांगता त्याने मन्याची जबाबदारीही घेतली.
आणि मी ?
माझं काय ?
मी तीच होते जी त्या रात्री सुरेशच्या आयुष्यात आले ….
“खुशी/आनंद/सुख”
आणि म्हणून कित्येक कडवट रात्रीनंतर सुरेशच्या एका पुढाकाराने
ती रात्र ‘माझी’ ठरली …..