विना माणसांचं पुणे !

  • by

तुला माहिते मला रात्र आवडते. का माहिते ? … कारण मी कधी रात्री बाहेर पडलेच नाही. मला घरातली रात्र माहिते, मला बाहेरची रात्र आज पहायला मिळाली … कित्येकांसाठी यात विशेष अस अज्जिबात काही नाही पण कुछ बात है।….

त्यात रात्रीच पुणे झेडब्रिजवरुन बघणं म्हणजे ओठांवर हसू असतं..
खूप खूप जास्त शांत वाटत होतं खूप वेळ थांबावसं वाटत होतं… माहित नाही काय नशा आहे या निशेत पण श्वासांच अस्तित्व या निरामयतेत फील होत … तो नाकातून घेतला गेलेला श्वास बेंबीपर्यंत जातो तो अनुभव जिवंतपणाची अनुभूती देतो … कदाचित माणसाला माणुस असल्याची जाणीव करून द्यायलाच रात्रीचा जन्म झाला असावा, नाही.

मला ना फरक नव्हता पडत माझ्या आजूबाजूला काय होतय कोणी आहे की नाही, मला फक्त तो नारंगी लालसर चंद्र दिसत होता … मला वाटतंय तो पण मला पाहून खूलला असेल. मला माहित नाही काय आहे आयुष्य पण काही वर्षापूर्वी जे जे काही मी मागितल होतं ते नकळत मला मिळतय .. तेव्हा त्याची किंमत खूप होती म्हणून माझ्या मनात ओढ होती, अनामिक अजाणती ओढ. त्यात कसलीच अपेक्षा नव्हती कारण मी ते स्वप्न पाहिलं होतं अपेक्षेविना.. अपेक्षेविना पाहिलेली स्वप्न खरी होतायत वाटतं…

पण तो रस्ता नाही माझ्याशी बोलला. कारण आज पहिल्यांदाच रात्रीचा प्रवास केला आणि त्यात मी न घाबरता ६०-८०च्या स्पीडला गाडी चालवली … एरवी माणसं असतात ना रस्त्यावर. मी माणसांना घाबरते काय ? … जाऊदे तो प्रश्नच …
त्याहून अलग सांगू तर अख्ख्या रात्री हे लाइटीचे दिवे आहेत ना राज्य करतात या शहरावर …

मुळात खरा आनंद यात असतो की माणसं फार कमी असतात यावेळी आणि त्यांचा गलका असला तरी आपल्याला आपले श्वास फील होत असतात आपण स्वतःचे झालेले असतो… सगळं निशंक पॉजिटिव्ह असतं. कदाचित तो आपला हॅंगओव्हर असतो … पण या हॅंगओव्हरमध्ये गाडी नाही हा चालवायची, स्वप्नात जायला होतं मग तोलही जातो त्यामुळे हॅंगओव्हरला डोळ्यात नजरेत श्वासांत मनात आणि आयुष्यात साठवून घ्यायचं आणि पुन्हा एक स्वप्न पहायचं या रात्रीला जिवंत अनुभवायचं … आणि शेवटी जोरात ॲक्सलरेटर देउन ओरडायचं जिंदा हूँ मैं |

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *