अशाच एका संध्याकाळी वैतागून गच्चीवर जावं. मावळत्या सूर्याकडे बघून साऱ्या आयुष्याचा हिशोब मांडावा. घोंगावणाऱ्या माशीला दूर सारावं , एकवार पुन्हा त्या आग शांत झालेल्या सूर्याकडे पाहावं नि आयुष्याची भग्न चौकट द्यावी त्याच्या नावे करून.
एक सुस्कारा टाकावा, इतक्या दिवस नश्वर वाटणाऱ्या वार्याला कवेत घ्यावं,स्पर्श करावा, आकाशाकडे पाहावं नि पुन्हा एकदा सज्ज व्हावं रिकाम्या झालेल्या पटावर फासा टाकण्यासाठी.
या मावळत्या वीराकडे बघून एक मात्र शिकले,
जिंदगी इतनी भी खुदगर्ज नहीं जितना हम समझतें है।
कभी कभी चलने के चक्कर में हम रुकना भूल जाते है , बिलकुल वैसेही जैसे खुशियां बटोर देते है ख़ुशी पाने के लिए ॥
#homemade happiness…
Please follow and like us: