पुलित्झर २०२० च्या विजेत्यांचे फोटोज् समोर आले. त्यातून समोर आलेला काश्मीर पाहून पारतंत्र्याच जीवन डोळ्यासमोर जिवंत दिसतं. हृदय असेल, स्वातंत्र्याची व्याख्या आणि जाणीव असेल तर हृदयात धस्स होतं. तुम्हाला लॉक डाऊन ‘सहन’ करावा लागतोय सहज म्हणतात तुम्ही. पण पुलित्झरसाठी गौरविलेल्या असोसिएटेड प्रेस (एपी) या माध्यमाच्या छायाचित्रकारांनी “गेल्या वर्षी काश्मीरचे कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमधील लोकांचे जीवन” टिपले आहे. याबद्दल अधिक बोलण्यापेक्षा ते फोटो पाहून तुमच्या मनात अनेक भावनांचे वादळ निर्माण होईल.
हे फोटोज् पाहून राहुल गांधींनी कश्मिरीयन फोटोजर्नालिस्टची पाठ थोपटली. त्यावर बिजेपी प्रवक्त्यांनी वक्तव्य केले, “ज्या फोटोंना बक्षीस देण्यात येत आहे, त्या फोटोंमध्ये भारतविरोधी भावना दर्शविल्या आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे का?”
एकीकडे पंतप्रधान कलम ३७० चा निर्णय घेऊन ‘हम सब एक है।’चा जयघोष देशभरात पोहोचवतात आणि दुसरीकडे असे टीकास्त्र सोडून पात्रा काय साबित करतात? …
पुलित्झर पुरस्कार हा अमेरिकेतर्फे वृत्तपत्र, मासिक, ऑनलाइन पत्रकारिता, साहित्य आणि संगीत रचना या क्षेत्रांमध्ये कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानाला आणि कामाला प्रेरणा देणारा पुरस्कार आहे.
प्रत्येक फोटोची एक कथा असते. फोटोग्राफर जे काही क्लिक करतो, ते त्याच्या व्यक्तिमत्त्वाच प्रतिबिंब असते. फोटोच्या अँगलवरून मनाचा ठाव लागतो, त्याच्या विचारांची आणि छायाचित्रकाराची छबी दिसते. तो छायाचित्र टिपताना कुठेतरी बॅकग्राऊंडला स्वतः टिपला जातो. हा बॅकग्राऊंडचा व्यक्ती खूप कमी लोकांना दिसत असतो. छायाचित्र ही एका क्लिकची कहाणी कधीच नसते. तुम्ही वृत्तपत्र, टेलिव्हिजन यांसारख्या कुठल्याही माध्यमात फोटोग्राफर असाल किंवा प्रोफेशनल फोटोग्राफर असाल तेव्हा तुम्हाला कळते त्या मागची मेहनत. तुमच्या मागे तुमची तयार होणारी कहाणी कोणी टिपत नसतं, पण याची दखल घेतली जाते.
आनंद, दर यासीन आणि मुख्तार खान या काश्मीर मध्ये वास्तव्यास असलेल्या तीन फोटोजर्नालिस्टने काश्मीरमधील जनजीवन आणि त्यांच्या नशिबात आलेलं ‘नॉर्मल जीवन’ काय असतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ही रोजच्या आयुष्याचा भाग कसा बनते, हे दाखवले आहे.
सौंदर्याची खाण किती घातक असू शकते, याचा प्रत्यय काश्मीरमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना येत असेल. त्यांनी ते जीवन एव्हाना स्वीकारलेही असेल. भारतीय संविधानात कलम १९ ते २१ हे भारतासाठी आहे, काश्मीर भारतात येतो की भारताबाहेर हे शोधण्यात किती जीव असेच डोळ्यात जीवनाची उमेद घेऊन मरून जातात आणि येणारेही किती जाणार आहेत, हे या राजकारणी निर्दयी समाजाला माहित आहे.
काश्मीरचे नागरिकांचे म्हणणे आहे, आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्येच अडकलो आहोत… आम्ही आधीही अडकलो होतो पण जेव्हा भारताच्या पंतप्रधानांनी ३७० लावले, तेव्हापासून पाकिस्तानच्या लोकांपासून आमचा बचाव करण्यासाठी आणि आमचे स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी त्यांनी आमची इंटरनेट, टीव्ही, लँडलाईन सेवा बंद केली. मिलिटरी यंत्रणा अजून कठोर केली, नागरिक हक्कांवर कर्फ्यु लावण्यात आले. हे कितपत योग्य आहे आणि किती दिवस??
ती लोकं सातत्याने या परिस्थितीतून जातात. ते भारतीय संविधानाच्या अंडर आले तरी आज त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. खालील फोटोंतून त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. आपण देशभक्त म्हणून बघत आहोत मला खरंच मान्य आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे असे प्रदर्शन होणे चुकीचे आहे. पण त्यांच्या दृष्टीने विचार केला तर दोन्ही देशांमध्ये त्यांची कोंडी होते, नाही वाटत का?
खालील फोटोज् ना पुलित्झरसाठी गौरविण्यात आले आहे.




















खूप सुंदर लिहिलंय.