कलाकारी प्रेम!

  • by


गळ्यापर्यंत येत जातो त्याचा तो गहिरा चेहरा, गंभीर नजर, त्याचा आवाज, त्याचे शब्द आणि कानात, मनात गुंतून राहते त्याची छबी!

पण नजर फक्त उरते त्याचा चेहरा पाहायला… किती वेळ श्वासात गुंतून राहायचं मी म्हणते. थोडी इजाजत मिल जाती, एक और मोहब्बत करने की!
काय सांगू ती नशिली आंखे… बघत रहा फक्त आणि बोलणं तर थांबावूच नकोस… असं झटकन प्रेम होऊन जातं. याला प्रेम नसेल म्हणत. म्हणत असतील तर प्रेम एकदाच होतं का? खरंच?
प्रेमात इतकी ताकद असते की नुसतं मन मुक्त पाखरासारखं उडत राहतं, समाजाच्या कुठल्याच भानगडीत न पडता…
तो उर्दू बोलू दे,
त्याला मराठीत चारोळी गाऊ दे,
त्याने हिंदीला जवळ घेऊ दे,
नाहीतर काम…
तो वर्कोहोलिक आहे… पण तो कमाल आहे.
मला त्याच्याकडे आकर्षित होण्यापासून थांबवायला हवे… कलाकार कातील असतात. जगणं ही सुुद्धा कलाच आहे. आणि या आयुष्याच्या कलेत जेेव्हा हेेेे कलाकार गुंतताा, तेव्हा त्यांच्या सभोवतालचे त्यांच्यात गुंतत जातात. त्यांना भान नसणं, हे तिसऱ्या कोणाचं तरी भान हरपवून टाकणार असतं. तसाच हा सुद्धा! तो स्टेजवर नखशिखांत परफॉर्मन्समध्ये बुडालेला असतो, आपण त्याचा औडीएन्स असतो. तिथे असंख्य लोक असतात. पण आपण त्याचा एकमेव औडीएन्स व्हावं इतकी अवास्तव स्वप्न रंगवू लागतो.
पुन्हा एकदा आयुष्याला बाजूला ठेवून आपण प्रेम करू लागतो. याचा शेवट माहितीच असतो, पण इथे थांबणं आपल्या हातात नसतं.

प्रेमात पडण्याआधी स्वतःत होणारे बदल बघावे फक्त, काय ते हसणं, गुदुगुदू होणं, स्वप्नांना कुठलाच बांध नसणं, नुसतं उडायचं आहे म्हणून पंख पसरवायचे… लहानपणी घडणाऱ्या गोष्टींसारखे आपण इतक्या फ्रस्ट्रेटेड आयुष्यातून पुन्हा हसू लागतो. प्रेम निभावण्याची धमक असावी, मग थोडी इजाजत मिल जाती हैं, एक और मोहब्बत करने की, फिर उसी इंसान से!

आयुष्यात दोन फेज सगळ्यात खऱ्या असतात, लहानपण आणि प्रेम!
दोन्हींमध्ये माणूस खरा असतो. पण लहानपण संपल्यानंतर आणि प्रेमाचा बहर ओसरल्यानंतर होणारी पडझड म्हणजे आयुष्य…

– पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error
Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *