एकतर्फी, दोन तर्फी, अपूर्ण राहिलेलं, चौकटीत न बसणारं, नाहीतर जगापासून लपून छपून कुणावर प्रेम करताय?
.
.
.
.
हे वाचल्यावर ज्या व्यक्तीचा चेहरा समोर आला त्याच्यासाठी हे गाणं एकदा ऐका…
बऱ्याचदा असं होतं, आपण आपल्या मनात समोरच्यासाठी काय भावना आहे ते व्यक्त करू शकत नसतो.
हे गाणं म्हणजे फक्त गाणं नाही. कित्ती तरी दिवसांनी मिळमिळीत सॉफ्ट दर्दभरे गाणे सोडून कुठेतरी मनाला स्थिर करेल, एकदा ऐकुन संपणार नाही, मन भरणार नाही, तुम्ही एकापेक्षा जास्तवेळा ऐकालच. इतकं लयबद्ध गाणं आहे हे! बऱ्याच दिवसांनी एखाद्या गाण्यात आपल्या मनातल्या व्यक्तीला पाहावं असा रीदम सापडला! गाणं रिलीज होऊन
बरेच दिवस झाले. पण गाणं आजही लुपवर आहे… सगळ्यात जास्त आवडलेली ओळ म्हणजे,
“ऐ खुदा तू बोल दे तेरे बादलों को ऐ खुदा तू बोल दे तेरे बादलों को मेरा यार हंस रहा है बारिश की जाए!” ही पहिली ओळच आपल्या मनाचा ताबा घेऊन आपल्याला त्या सोबत्याच्या शेजारी नेऊन सोडते.
पाऊस आणि प्रेमाचं नातं अलिंगण म्हणजे मीठी मारावी एवढं जवळच आहे. प्रेमातला पहिला पाऊस मनात प्रेमाचा स्पर्श आणि थंडावा ठेवून जातो. त्यावेळी घडलेलं सगळचं प्रेमातल्या इतर क्षणांपेक्षा खूप वेगळं असतं. त्यामुळे जेव्हा बी प्रेक त्याच्या हृदयाच्या टोकापासून गातो, मेरा यार हंस रहा हैं, बारिश की जाए… तेव्हा तोच चेहरा समोर येतो, ज्याच्या चेहऱ्यावरच्या हसण्याने तुम्ही खुश होतात… त्याच्या आनंदी राहण्या भोवती तुमचं आयुष्य खुश होणार असतं. आपल्या सोबत्याच्या फक्त सुखाचाच विचार करणारं गाणं आहे…
या सगळ्यात अधिक ताकदीचे वाटते, ते जेव्हा अल्बममधला नवाजुद्दीन हिरोईनकडे बघून म्हणतो, “उसका बस चले तो सारा दरिया पी जाए” । ही ताकद त्या प्रत्येकीच्या वावरण्यात असते आणि ती ताकद तिच्या हिरोने बघितली म्हणजे क्या कहना।
आणि मधले दोन शेर तर उफ्फच!
ये सूरज से भी कह दो के अपनी आग बुझा के करे,
अगर उससे बातें करनी है तो फिर नज़र झुका के करे।
ना दुनिया के लिए लिखते ना मेरे लिए लिखते,
ग़ालिब जिंदा होते तो तेरे लिए लिखते।
वाह क्या बात है.. इतकं सुंदर लिहिलंय की गाणं ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली..👌