लेखणी फक्त शब्द नाही लिहीत, तिला तिचं म्हणणं आहे, म्हणूनच माझ्या लेखणीच्या गर्भाला लोक कळतात. त्यांच्या भावना कळतात, त्यांनाही संवेदना आहे कळतं, काहीशी त्यांची स्थिती कळते, त्यांचा अनादर ही एकमेव गोष्ट ती टाळते. माणुसकीच्या शोधात राहून माणुसकी निर्माण करते, भेदाचे वारे ती निर्भिडपणे पेलते…
होण्यासारखे असंख्य शब्दांचे बाण ती टाळतेच तेव्हा, माझ्या लेखणीच्या गर्भातून व्यक्त होणारी लेखिका आणि धडधाकट शरीराने बोलणारी मी, हे शोधताना लोक आम्ही दोन वेगवेगळे साचे आहोत, इतकं जज करतात… लिहिणं आणि बोलणं या दोन्ही क्रियांमध्ये तफावत असू शकते, इतकी की माणूस लिहू शकतो, तसा तो मुखातून बोलल्या जाणाऱ्या शब्दाएवढा बोलून व्यक्त होऊ शकणार नाही… मान्य असायला हवं!
कलेच्या अस्तित्वामुळे व्यक्ती कलाकार होतो, कलेला त्याच्यापासून वेगळं करून त्याचा अनादर टाळला पाहिजे, लेखणीला नाजायज वाटतं!