तू प्रेम असल्याचं दाखव नि मी प्रेम नसल्याचं. दोघेही सत्य जाणून आहोत तरीही तुला संथ प्रवाहात दगड टाकायचाय नि माझा अश्रूंचा प्रवाह संथ असल्याच मला भासवायचय.
“आपल्यातला संवाद थांबलाय रे ! ….
बाहेरच्यांसमोर मी हळवी होते, नि तुझ्यासमोर .?
कित्ती रे त्रास दिला, नि आता म्हणतोयस मी तुला गमावू नाही शकत…..?
चुक कोणाची होती….?
नेहमीसारखच तुझ्या आडमुठ्या स्वभावाची ….
कधीच दुर गेलीय रे मी …..
खूउप उशीर केलास ,
…”
तुला खोट बोलता येत नाही हे फक्त मलाच माहित, पण मला खोट हसता नि पुन्हा सावरता येत, हे कोणालाच नाही माहित. पण आपली ३ महिन्यांची भेट अशी काही लांबली कि, तुला कंटाळा आला, तु आजारी होता, ट्राफिक होत, ती लांबली ती संपलीच.
तुझ्याबद्दलच्या भावना मेल्या, संपल्या की त्यांनी ” आत्महत्या” केली ?
तुला वेळ तरी मिळेल का शोध घ्यायला ?
मीच सांगते ” ईट वॉज वेल प्लान्न्ड सुइसाईड
(It Was Wel Planned Suicide)”
तुझ्या शब्दांच्या सौद्यात तु माझ्या भावनांना, आसवांना लीलावात ठेवलस. तुझे शब्द, आपला संवाद थांबला तेव्हा माझ्याकडे ‘बाकी’ काहीच शिल्लक नाही राहीली… तुझा भावनांचा व्यवसाय मात्र वृद्धिंगत होत राहिला.
ह्म्मम्म सुइसाईड ..