तेजस्विनी बस सुरू झाल्या तेव्हा वेगळाच आनंद झाला होता. मार्च २०१८ ला सुरू करण्यात आलेली तेजस्विनी ही महिलांसाठी दिलासा होता… मला थोडा सुरक्षित आनंदही झाला होता, I’m sure माझ्या सारखाच तो प्रत्येकीला झाला असेल.
कारणं बरीच आहेत, अनेकांना ती माहीत आहे काहींना तीच कारणे ओव्हर रेटेड, फेमिनिस्ट आणि अतिशय अटेंशन सिकर कॅटेगरीमधले वाटतील, तरीही वृत्ती आणि सत्यस्थिती बदलणारी नाही. त्यामुळे सांगते,
पहिलं कारण गर्दी विभागली गेली. दुसरं कारण गर्दी विभागली म्हणजे स्वाभाविक पुरुष स्त्रिया हे वेगळे प्रवास करू लागले.
आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे असं होण्यामुळे गर्दीचा आव आणून नको तिथे स्पर्श करणारे लूच्चे यांच्यापासून सुटका होईल. एरवी महिला बोलत जरी नसल्या तरी त्रास होत असतो आणि त्या त्रासाला कंटाळून अखेर सवय करून घ्यावी लागते, कारण या स्पर्शापेक्षा वैयक्तिक कारणे बरीच असतात. ते युद्ध अविरत चालूच असतं त्यात या युद्धाला सुरुवात कशाला…? म्हणत सगळचं स्वीकारलं जात होतं, पण तेजस्विनी ही सुटका होती…
आजही दुरूनच जेव्हा तेजस्विनी दिसते महिलांना सुकून वाटतो. पण हे झालं तेजस्विनी चे अस्तित्व. याशिवाय महिला महिलांचं खरं व्यक्तिमत्व सोडत नाही.
होय, भांडणं…
इथे वासनांध नजरांपासून आराम असला तरी वादांच्या सुमधुर वाणीला न्योता असतो.
आठवड्यात कमीत कमी दोन भांडणं आणि जास्तीत जास्त एका बसमध्ये प्रवास होईपर्यंत दोन भांडणं… त्यात महिलांना कुणाचं काय चुकतंय हे दाखवून देण्यात स्त्रीपण वाटते. त्यामुळे एखादच भांडण प्रवासभर चालू असतं…. स्त्रियांचं भांडण म्हणजे झाडाला सपासप फुटणाऱ्या फांद्या असतात, आणि फांद्यांना कोंब फुटतच जातो. त्यामुळे एखाद् भांडण झाड असेल तर त्याच्या फांद्या त्याहून मोठ्या असतात.
भांडणाचं एकमेव
आईग्… मागे तो दूरचित्रवाणी केंद्र पुणे त्याचा सकाळच्या प्रहरातील आवाज एका ऐतिहासिक विंटेज काळाचा फिल देतो, अन् हळूहळू काही स्त्रियांचं अटेंशन भांडणावरून बातम्यांवर जाते… सकाळचे आठ वाजत आहे आणि तुम्ही ऐकत आहात “__” ही रिकामी जागा अगदी काहीही असो पण सकाळचे आठ वाजणे हेच खूप मोठं रीमाईंडर भांडणं कमी होण्यासाठी असतं… प्रवास अविरत सुरू राहतो…
शेवटच्या सीटवरून एकसलग दहा रांगांमधील त्या स्त्रियांना बघताना नेमकं काय न्याहाळू?
लेस्बिअन म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून…
त्या सगळ्यांच्या केश रचनेला न्याहाळत कितीसा वेळ दिला असेल तिने हे करायला? साधा प्रश्न पडत मन हळूच तिच्या साडीकडे जातं, थांबत जरावेळ विचार करून वाटतं, घरकाम क्या ही चीज हैं असली कसरत तो सारी पहनना हैं। सवयीने हेही आतापर्यंत जन गण मन सारखे ६० सेकंदांचे झाले असेल… ?
मग जीन्स घालायला हवी…
नको अंकंफर्टेबल होऊन दिवसाचे साठ मिनिट यात जातील त्यापेक्षा हे साठ सेकंद पुरतील, तिच्या आवडीचे आणि सुखकर !
वाऊ… तो लिपस्टिक चा शेड किती सुरेख आणि ओठांवर पहारा दिल्यासारखा आहे न? म्हणजे एकतर धोका नाहीतर प्यार …
तरीही महाग असेल ना? धोका या प्यार हो सस्ता कहां होता हैं?
या अल्लाह, त्या मुस्लिम बुरख्याच्या आतल्या मुखड्याची काही तारीफ तरी करावी मी??? ते डोळ्यांच्या काजळाची रेष, गालांवर गुलाबी रंगाचे रेशीम, तो ओठाच्या तावडीतुन सुटून त्या ओठांच्या किनारी राणी सारखा बसलेला तीळ, आणि त्या भुवया जणू एखाद्या युद्धात बाण म्हणून मारून युद्ध जिंकून जावं, हा मुखडा तेजस्विनी मध्ये फक्त उघडा ठेवला जातो, वाटते मुलीनेच मुलीला पाहून का प्रेमात पडावं… ?
धत्त ऐश्वर्या रायचे सौंदर्य, ये कयामत आ गयी हैं यहा ।
आता तुम्ही म्हणाल स्त्रिया स्त्रियांना बघता ते चालतं, पण हेच पुरुषाने पाहिलं तर?
पुरुषाने फुलाला पहावं, त्याला न्याहाळाव पण खोचक नजरेने ओरबाडून त्याचा चुरा करायला नको, नाहीतर मग बळच कुठंतरी तिच्या स्तनांना हात लावून दाबण्याचा प्रयत्न नाहीतर मग स्वतःच्या गुप्त भागाला तिच्या गुप्त भागाशी स्पर्श करण्याचा प्रयत्न…
हे नको असतं हो… न्याहाळणे हे जायज आहे, सौंदर्याला बघण्याची परवानगी घ्यावी लागत नाही. कारण नजर असते सौंदर्य बघण्याची. पण परवानगी घ्या, तिच्या जवळ जाण्याची. दुरून सेलिब्रेट करावं त्या सौंदर्याला…
असो, यापेक्षा जास्त तुम्ही जाणता…
पण सगळ्यात सुखावह हेच की सगळ्या स्त्रियांच्या गाडीत पुरुषाचं अस्तित्व फक्त ड्राइव्हरचे असतं… त्यात एखादा नॉर्मली हँडसम असणारा असेल तेव्हा तर तो खलास असतो… मग मात्र तो सुखावतो या नजरांनी…
त्यामुळे एकंदरीत, तेजस्विनी भारीच सुखावून जाते.
पण आज अचानक तिच्या नावावर आणि लोगोवर नजर गेली. लोगोच्या प्रेमात पडावं इतकी सुंदर रचना होती… ज्याने कुणी बनवला असेल त्याच्या नजरेतली स्त्री इतकी आकर्षक असेल .?
असायलाच हवी, कारण त्याला तेजस्विनी चे अस्तित्व आधीच कळले होते.
या सगळ्यात मात्र एक लॉस झाला, एखादा हँडसम मुंडा माझ्याच रोजच्या गाडीत प्रवास करायचा, आता त्याला बघणं होणार नाही, नेत्रसुख नावाची काही गोष्ट असते की नाही? त्यावर पाणी फिरवावं लागलं, पण मधल्या काळात पुरुषही तेजस्विनी मध्ये येऊ लागले होते, तेव्हा थोडंसं सुख अनुभवलं पण पुन्हा तेच अनुभव. त्यामुळे जे मिळालं तो स्त्रियांनी भरलेला गाव, भारी होता…