धारावी वाचवा!

आशिया खंडातील झोपडपट्ट्यांपैकी सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून गणल्या जाणाऱ्या धारावीची परिस्थिती आधीच तितकीशी चांगली नव्हती. सामाजिक, आर्थिक पातळीवर रोजच्या रोज लढा देणारी माणसं आहे ती.  त्यात हे श्रीमंतांनी आयात केलेल्या कोरोनाचे संकट हे इतर कुठेही पोहोचले असते तर तितक्या टोकाची चिंता वाटली नसती, पण मुंबई किंवा धारावीसारख्या गर्दीच्या शहरात किंवा छोट्या वस्तीत, दाटीवाटीच्या झोपड्यांमध्ये चुकूनही शिरकाव करू नये असे वाटत होते. पण ते म्हणतात ना, संकट कोणतंही येवो आधी गरीब होरपळला जातो, याच परिस्थितीतून गरीब जनता जात आहे.

झोपडपट्टी रहिवाशांनी याबाबतीत काळजी घ्यावी तरी कशी ?
त्यांनी सॅनिटायझर वापरावे?
रोजच्या रोज कपडे धुवावे, तर साबण, पाण्याचा खर्च, कुठून भरावा दोन महिन्यांचा अडवांस किराणा माल? 
आपल्याकडे स्वतंत्र टॉयलेटची सोय आहे पण त्यांना कॉमन टॉयलेटशिवाय पर्याय नाही.
प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याचा स्वतंत्र नळ नाही.
स्वतंत्र झोपडी आहे पण भिंती स्वतंत्र नाहीत.
कुणी खोकला, शिंकला तरी त्याच्यापासून दूर जाणार कस?
त्यामुळे हे ठिकाण असे आहे जिथे कोणत्याही सूक्ष्म चुकीमुळे महामारी त्याचे घर बनवू शकते. कारण इनमिन जागेत इथे सोशल डिस्टसिंग म्हणजे केवळ अवास्तविक कल्पना आहे.
आधीच जीव मुठीत घेऊन जगणारी माणसं आहे. बाहेरच्या लॉकडाऊनमुळे पोटापाण्याच्या चिंतेने रोज आतून मरत होते, अल्मोस्ट लोकांचं हातावरच पोट होतं, आपल्यासारखी लोकं लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना आर्थिक मारामारीला सामोरं जावंच लागतं होतं पण जीवावर बेतनारी मारामारी गळ्याशी आली आहे. ते परिस्थिती समोर उम्मिद हारलेले नव्हते. पण कोरोनासारख्या संसर्गाने त्यांना विळखा घालायला नको होता. कोरोनाचा शिरकाव इथे कधीच झाला आहे पण त्याने त्याचा प्रभाव दाखवू नये, असे मनापासून वाटते.

धारावीत पहिल्या रुग्णानंतर गुणाकार वाढू लागल्याने सरकारने आपले लक्ष्य धाराविकडे वळवले आहे. धारावी येथील १५ लाख रहिवाशांची चाचणी करण्यात येणार असल्याचे वृत्तांमध्ये छापून आले, ही बाब वेळखाऊ असली तरी शक्य आहे.  

सरकारच्या कृतीवरून सरकारला असलेले परिस्थितीचे गांभीर्य आणि तेथील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचा विचार दिसून येत आहे. काल आणि आजच्या दिवसात काही टेस्टिंग करण्यास सुरुवातही झाली आहे. ही मन दाटून येणारी, धारावीसाठी सहानुभूती आणि काळजी निर्माण करणारी  आणि या दिवसांतील राज्य सरकारचे कौतुक करावी अशी गोष्ट आहे. अगदीच गरज पडल्यास त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी हलवावे, असे वाटते. 
यापूर्वीच्या राज्यसरकारला पूरपरिस्थितीत अनुभवले, व्यवस्थापन आणि नियोजनही पाहिले आहे. असेही नाही, त्यांना काम करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आजही त्यांची तुलना आताच्या सरकारसोबत होऊच शकत नाही. या सरकारने धारावी वाचावावी, मातोश्री सदनापासून तीन किलोमीटरवर असलेली धारावी हा मुख्यमंत्र्यांसह मुंबईला आणि मुंबईनंतर हळूहळू राज्याला कोरोनाच्या विळख्यात ढकलू शकते. त्यामुळे शिवयोध्या, धारावी वाचणे ही प्राथमिक गरज आहे.

©Pooja Dheringe

Please follow and like us:
error

1 thought on “धारावी वाचवा!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *