वक़्त ने किया क्या हंसीं सितम, तुम रहे न तुम, हम रहे न हम।
‘हां हे सुंदर आहे. जुळतय आताच्या परिस्थितीला…’
जेव्हा संभोगातून शांत झालो तेव्हा तो हे गाणं गात होता.
‘व्हॉट डू यू मिन? परिस्थितीला जुळतय म्हणजे?
मुड अच्छा है, शांत मौसम हैं, क्यों तकलीफ उठा रही हो? काय झालंय?’
मी त्याला म्हटलं, मुड भी और इश्क भी एक ही बिस्तर पर हैं, लेकिन बेगाने एहसास कहीं और अटकें हुए हैं। आप कहें तो थोड़ा दिल का हाल सुनाए?
‘जरूर! त्याचाच इंतजार आहे. बोल ना, तो म्हणाला.
एक गंभीर श्वास घेत मी बोलायला सुरुवात केली, ‘कपलच्या रिलेशनशिपमधले सगळे कर्व्ह एन्जॉय करायला हवे ना… जसं बाईचं शरीर एकाच कर्व्हचं नसतं. तिच्या डोक्याचा उंचवटा पार केल्यानंतर तिच्या ओठांच्या बदामाखालची हनुवटी दिसते. ती पाहिल्यानंतर तिचा मानेखालचा भाग दिसतो, मान दिसते तेव्हा लागलीच तिच्या स्तनांचा परिचय होतो, पण तो केवळ अर्धवट नजरेचा भाग असतो, त्या स्तनांना पाहायला मानेचा खोलगटपणा उतरून खाली यावं लागतं, तिथून स्तनांवर रेलायच म्हटलं तरी अशक्य असतं बाई तितकी इरेजीस्टेबल असते. तिच्या स्तनांवरून पोटापर्यंत जावं लागतं, तिथे एकमेकांच्या एकत्र येण्याचा खरा स्पर्श होतो. दोघांची पोटं, एकत्र राहण्याची जाणीव देता…
मी बोर तर करत नाहीये ना?’
मी थोडं स्वतःला सावरत विचारलं.
‘अरे येडं माझं, आज वेळच वेळ आहे. आज तू बोललेल ऐकणार आणि समजणारपण आहे. त्यामुळे तू खुल के बोल… पोटाच्या जबाबदारीचं बोल ऐकावस वाटतंय.’ खूप दिवसांनी त्याचा आवाज आधीसारखा वाटला.
‘हां तर… पोटाखालचा प्रवास हा आपल्या नात्यात आधीच होऊन गेलाय. तो आकर्षणाचा असतो, तो शारीरिक गरजेचा असतो. नातं तात्पुरतं असलं की पोटाच्या खालच्या शारीरिक अवयवाचा सेक्स होऊन उपयोग संपतो. पण त्याच नात्याला पुढे न्यायचं म्हटलं तर योनी-लिंगाचा सहवास वाढत जातो, त्यात होणारी वेदना, अगतिकता, घर्षण आणि आवडत्या व्यक्तीचा स्पर्श हा प्रवास सुरू होतो. तेव्हा समजतो त्या सोबत्याला बाईच्या पाळी, गर्भवती, गर्भपात नि संभोगाच्या नवनवीन अनुभवांच्या गोष्टी.
या शरिरासारखाच कपलच्या नात्याचा रस्ता कर्व्ह आणि नागमोडा असतो. नात्याच्या सुरुवातीच्या प्रवासात दोघेही हरवत नाही पण हळूहळू नातं म्हातारं होऊ लागतं तेव्हा हरवू लागता दोघेही. आपलंच बघ ना आज शारीरिक आणि भावनिक नातं सुरू होऊन पाच वर्ष झालीय.
आपल्यातलं भावनेचं नातं आधीपेक्षा कैक घट्ट झालं पण शारीरिक नात्यात मात्र तोचतोपणा आला. साचलेपण वाढलं, त्यात नाविण्याने काही करूनही शरीराची मागणी म्हणून शरीरसंबंध येऊ लागला. तेव्हा मनात काहूर माजायचे, नेमकं तू अशावेळी सोबत नसायचा, तेव्हा बऱ्याचदा मी स्वतःशी बोलायचे,
जेव्हा नवीन नवीन तू प्रपोज केलं तेव्हा दोघांनी एकमेकांच्या शरीराचे-सोबतीचे कर्व्ह उलगडले. शरीर सुखातील हट्टापायी एकमेकांच्या शरीरातील ऊर्जा डेडलाईनमध्ये मिळवण्याच्या प्रयत्नात कुठेतरी अनेक नाजूक नि नितळ गोष्टी राहूनच गेल्या आपल्या. रूम, लॉजच्या भानगडीत न पडणारे फोकस्ड आपण शेवटी शेवटी मुक्काम सर्रास करू लागलो पण नव्याने त्याच व्यक्तीला जाणून घेण्याची उमेद राहिली नाही. हळूहळू एकमेकांत असलेला शारीरिक स्वर्गाचा हिशोब संपू लागला. आता रिकामा वेळ मिळू लागतो, रिकामी जागा, प्रायव्हसी मिळते तरीही मन मुक्त होत नाही…
त्यामुळे भावनिक अपेक्षा तक्रार करू लागतात.
मला वाटते तू पहावं, या डोळ्यांच्या डबक्याखाली झालेले ब्लॅक सर्कल, मानेच्या सरकत्या रस्त्यावर कॉलर बोनच्या खळग्यात अडकलेली काळी शाई, स्तनाग्रांच्या खाली असलेली काळी वर्तुळं, पोटाच्या गोळ्याभोवती विचारांची झालेली गर्दी- घुसमट, योनीच्या मऊशार पाकळ्यांना वयाकडे झुकवणाऱ्या मिशा, मांड्या फाकल्यानंतर बंदिस्त झालेली घाई, गुडघ्याच्या वाटीमागे अडकलेली क्षीण काळी वयाची उदासी , पायांच्या बोटांच्या मधल्या चिमटीत बसलेला काळा कुट्ट नैराश्याचा समुद्र …
या संपूर्ण शरीरात तू का पहायचा बंदच झालाय…?
मी विचार करायचे की,
तू फक्त या चेहऱ्यावरच्या हसण्यावर, आणि हास्याच्या हनुवटीवर उमटलेल्या काळया रेषेकडे पहायचा. ती रेषा उमलती ठेवायची, एवढं कर्तव्य तू बजावत असायचा.
पण तू या खळग्यात लक्ष घालत नाही, कारण तुला तेवढा वेळ कुठे उरला आहे.
तुझा मोह माझं हास्य आहे.
पण माझा मोह म्हणजे तू माझ्या प्रत्येक शरीरातील प्रत्येक अवयवाला तुझ्या स्पर्शातून संदिग्ध करणे होता.

प्रेमाचा कणांवर अधिकार असावा,
क्षण साजरे होत असतात…‘
माझं बोलणं ऐकून तो शांत पडलेला होता. एक शांततेचा वारा आमच्यातून गेल्यानंतर तो म्हणाला, ‘एक सांगू? म्हणजे हे डीप गुपित म्हणता ना तसं आहे. तुला योगायोग वाटेल पण सांगतोच. मीही विचार करायचो,
कोणत्या भाषेत प्रत्येकवेळी समजावू हिला?
माझ्या काळया वजा पांढऱ्या होऊ लागलेल्या केसांवरील जबाबदारीच ओझं, जसं केस डाय करून बाहेरून काळेभोर दिसतील तसं तुझं प्रेम डाय आहे पण त्याची मुळं तर पांढरी झाली आहे, ही जबाबदारीची पांढरी मुळं कुठेच पिच्छा सोडत नाही. तुझ्यावर प्रेम आणि तुझी जबाबदारी या दोन्हींमध्ये आता तुझी जबाबदारी आणि तुझ्याबरोबर सुरू झालेल्या संसाराची जबाबदारी ही त्या स्वैर प्रेमाला बहरूच देत नाही.
मग का नाही दिसत हिला माझ्या खडबडीत हातांच्या सुस्पष्ट होत जाणाऱ्या रेषा? त्या रेषा मी दोघांचं भवितव्य, ‘नशीब’ या नावी तयार करण्यासाठी तर हा अट्टाहास करत आहे.
कधी कळणार हिला शरीर उन्हाने काळवंडल नाहीये त्याला स्वतःच्या राख झालेल्या स्वप्नांची बद्दुवा लागली आहे.
माझ्या आतल्या तारुण्यातील मुलाच्या आतील वासना, आकर्षण, शरीरसुख, संभोग, तळमळीची जागा आता पुरुष होऊन तुझी ‘काळजी’ घेऊ लागलय. त्यामुळे तुझ्यावरच्या शारीरिक प्रेमाचं माहीत नाही, पण भावनिक काळजीची आणि तुला सुखात ठेवण्याची कमाल मर्यादा मात्र पार केलीय मी.”
त्याचं मन ऐकल्यानंतर मात्र दोघेही कमालीचे शांत झालो होतो. इतक्या दिवसांचा कोलाहल नरमावत होता. दोघांनाही कळेनासं झालं होत. तो स्वतःशी बोलायचा, मीही स्वतःशी बोलायचे. दोघांतील संवाद हा ‘हिला/ ह्याला नाही समजणार जाऊदे!’ म्हणत पूर्ण तुटलाच होता. पण आजचा दिवस आमच्या नात्याला एकत्र बांधण्याचं औतान घेऊन आला होता.
आमच्या भांडणाच्या रागात सुरू झालेलं हे जीवन संगीत शेवटी शास्त्रीय संगीताचे कैक सामंजस्याचे राग गाऊन शांत होत गेले.
नात्यात तुटण्याची ही नाद घंटा जाणवू लागते मनी,
तिची दोर धरून ठेऊन लय न्यावी लागते अनंतापरी!
तुटणाऱ्याला तुटण्याचा श्राप कितीही द्या,
सांधणाऱ्याला जोडण्याचं वरदान तिथूनच आले!
तुला तोडच नाहीये……. काय काय आणि किती डिटेल्स…… मनातला काहूर… सपशेल बाहेर…. एक नंबर रे
मनमोकळे पणाने एकमेकांच्या भावना आणि त्या भावनातील
उत्कलता, सुस्पष्ट लिखाण. तेवढंच धाडस जे तु बिनधास्त लेखनशैलीतून मांडते. मस्त
एवढे बिनधास्त तर एखादा मुलगा पण लिहू शकत नाही .जितके तू लिहिलंय.. जबरदस्त आहे 👌