क्षण आठवून आनंद होतो पण क्षणांच्या पाकळ्यांचा दिवसच आपला असेल तर ..?
एखादाच पण संपूर्ण दिवस आपल्याला मिळावा, एवढंच स्वप्न प्रियकर वर्गाचं असतं.
माझा देव त्यात फार रोमँटिक…
त्याने दोघांच्या नावे म्हणून की काय, अक्षरशः पावसाळी अन् बर्फाळी वातावरण भिजू घातलं होतं. माझ्या मूडला उधाण आलं होतं. फार काही नाही पण तो जवळ असायलाच हवा होता हा अट्टाहास मनाला टाळता येत नव्हता. पण नोकरीवरून सारखं सारखं कितीदा सुट्टी घ्यायची. त्यात नात्याचे आणि प्रेमाचे चोचले अती जास्त असतात.
पण गोड असतात नाही? म्हणजे त्याशिवाय का आम्ही एकमेकांत बांधले गेले असतो?. त्यातल्या त्यात हे चोचले म्हणजे आवड होती एकमेकांची.
प्रेम शाबूत आहे, जोपर्यंत प्रेम तुमच्यात आहे. तेही दोन्ही व्यक्तीकडून तितकंच खरं नि महत्त्वाचं म्हणजे निरागस हवं.!त्याला या बाहेरच्या राजकारणी, दिखाऊ प्रेमाचा स्पर्शही नसावा! जे वेंधळटही चालेल, पण किमान त्यावर लिहिलं जावं इतकं स्वच्छ असावं! “तुझं पण ना..”(मागून कुणाची बारीकशी पुटपुट ऐकू आली)
“कधीही लिहायला सुचतं बाई तुला. एवढा एकटा वेळ मिळालाय आणि आम्ही हे असे नशिबी ज्यांच्या नशिबी लेखिकाबाई आल्यायत. ज्यांना दोघांच्या एकट्या वेळेतही ‘किस’ सोडून कविता होताय.” त्याने मुद्दाम मला डिवचत म्हटलं.
“दोन चहा चालतील.चहा मसाला टाक फक्त.” मी म्हटलं.
“बरं चालतंय, पण त्यानंतर मला दोन ओळी माझ्या हव्या! “
“हावऱ्या, तुझ्यावर मी केसच करणारे ! असं दरवेळी माझ्या लेखणीकडून रिश्र्वत घेतोस…”
“चहा हवाय ना? ” त्याने खोडकरपणे विचारलं.
“अरे मुसाफिर, तुम सिर्फ बनाकर लाओ | हम हमारे लहेजे के साथ आपके सामने आपका पेगाम हाजिर रखेंगे…|”
“उफ ! आलोच … “
अंहा, हे दिसतंय तितकं साधं नाही हां…
एक खोली दोघांना मिळणं… सगळं सुरळीत होणं अजिबात नाही. तेही जात-पात, स्त्री चारित्र्य, अविवाहित मुलगा मुलगी एकत्र आणि महत्त्वाचं म्हणजे शेजाऱ्यांच्या उपस्थितीत एका खोलीत लग्नाआधी पलंगापर्यंत जाणं म्हणजे भलतंच दरारक!
पण तरीही…
बॉयफ्रेंडच्या मित्राचं घर तो नसताना रिकाम ठेवणं, आपल्या नव्या शास्त्रात न बसणारच. बॉयफ्रेंडने मित्राकडे प्रस्ताव ठेवण्याचा उशीर मित्र राजी न व्हायचा प्रश्न दुरदुरवर नव्हता. त्यामुळे तो जाणार हेच आमच्यासाठी प्रेमाचं स्वप्न रुजू करायची वेळ होती.
अन्ह… शारीरिक नाही, रोमँटिक नि अलगद भावनिक स्वप्नकथेचं स्वप्न!
खूप बोलायचं, ऐकायचं, लिहायचं, अनुभवायचं नि हे सगळं करून कसलीच घाई न करता त्याच्या मिठीत गुडूप व्हायचं, एवढंच या आजच्या दिवसाचं सुख येणाऱ्या कित्येक निराशांना परतवणार होतं.
आम्ही दोघे आनंदून गेलो होतो. हुरहुर मनात होतीच पण एक वेगळचं जग एका दिवसात फील करायला मिळणार होतं. म्हणजे लिव्ह-इनचं एक पाऊल आम्ही जगणार होतो. भीती नव्हती, उत्सुकता होती…
नव्या नात्याचा जिव्हाळा अजीर्ण करेल असं काहीतरी करावं, एवढाच ध्यास मनी होता. नात्यातील काही गोष्टी किरकोळ भासत असल्या तरी त्या किरकोळ थेंबात पावसासारखं मजबूत नि मनमोहक आयुष्य साकारण्याची धमक असते.
“मोहतर्मा, आईयेगा जमीन पर. ये गालिब इंतजार कर रहा हैं|” त्याचा चहा झाला होता… मी या एवढ्या विचारांच्या गर्तेत त्याच्या अजीर्ण अस्तित्वाला लिहित गेले होते…
तर्र… तुझ्यासाठी…
दोन शब्द लिहिले, एक मोठ्ठा शब्द लिहिला.
पण…
पण कर्ज तुझं जास्त आहे, वर काळजीचं व्याज वाढलंय. कोणत्या दोन ओळी लिहू?
तुझं प्रेम लिहू की तुझा स्पर्श लिहू की तुझ्या असण्याच वर्णन करू? की लिहू तू किती हवायस मला? कोणत्या दोन ओळी लिहू?
त्या ओळींना चंदनाची दृष्ट लावू की तुझ्या प्रेमाची साठवण टाकू.?
कोणत्या दोन ओळींत मावतं हे प्रेम?
कपाट थोडी आहे की कप्प्यात टाकलं नि मावलं हे प्रेम !
… त्यापेक्षा हे बघ…
या डायरीवर, इतकं मुक्त सोडलंय मी त्याला. त्यामुळे दोन ओळी खोडून, लिहून प्रेमाच्या एका भावनेचं किती संशोधन केलंय, ते कोण्या शास्त्रज्ञाच्या बस की बात नहीं समझे खुश नसिब| पण… तरीही ज्याला शेवट नसतो असा चहा आहे तुझं प्रेम, ज्याची तक्रार असते असा प्रश्न आहे तुझं प्रेम!
…
अशा दोन ओळी आहेस तू, ज्याला नेहमीच लिहून पुन्हा लिहित रहाव वाटतं! किंवा मग …
“ए किंवा मग काय? हा काय महाप्रसाद आहे?” तो मग्न ऐकत होता, पण त्याचा कुठल्याच प्रतिसाद नाही म्हणून मी चिडत म्हटलं,एकवार चहाचा चस्का घ्यायचा उशीर त्याने माझ्या मानेवर त्याची हनुवटी ठेवत म्हटलं,
“पसारा नको, मुसाफिरला मंजिल ऐकायची आहे.” तो म्हणाला”थोडा मुश्किल हैं। “. मी उत्तरलो
“इश्क कहा आसान था? हम तरस रहे हैं….” त्याने प्रत्युत्तर केलं.
“सुनियेगा…” मी प्रयत्न करत म्हटलं. “क्यों? क्या सच में इतना खूबसूरत होता हैं दूसरा कोई?…
(याने हम…) जो इंसान खुद के हिस्से का प्यार बिनशर्त बाट देता हैं बेझिझक |” ….
इतकं हेट करतेस ? खूपच ! ये की अशी मग… त्याने लागलीच शब्दांसह मला मिठीत ओढलं. हा पाऊस खट्याळ आपल्याला मिठीत पाहायला त्रस्त झाला नि तुला त्याच्यावर लिहून त्याला खुश करायचं सुचतंय, अन् तरीही त्या खट्याळला आपलं हे प्रेम मिठीत पहायचंय !
“खोटारडा शहाणाच आहेस की!”
“चहा आणला ना, ये की मग अशी जवळी!”
गुदगुली नको ना, उघड्या अंगाला ओढ तुझ्या स्पर्शाची आहे, गुदगुल्या कसल्या करतोयस. तुम्हा आजकालच्या मुलांना प्रेमही जमत नाही. हे प्रेम कसं अलवार हवं. बागेतल्या झाडांवर फुलपाखराने भिरभिराव पण फुलाला टोचुही नाही, स्पर्श बागडावा या मोकळ्या कळीवर !
नि तोच त्याच्यातल्या प्रियकराला छेडल्यामुळे इम्रान हाश्मी जागा होत त्याने अलगद माझ्या पाठीच्या कडांना त्याच्या बोटांच्या स्पर्शाने लयीत ओघळत नेलं, पावसाचा थेंब पाडवा तसं नि शहारून मी मिठीत जावी त्याच्या इतकं अलवार नि रोमांच उभे करणार होतं.
यापुढे काही होणार नाही, असं काहीसं मनात होतं, कारण शारीरिक प्रेमाने भावनिक प्रेम दुरावलं जातं.
त्याने अलगद मला कोणत्याच नजरेने न पाहता उचलून हलकेच बाथ टबात नेलं. तोच स्पर्श नीलायम ठेवत त्याने आमच्या ठेवणीतले निकोलसचे “ए वॉक टू रिमेंबर” हे पुस्तक वाचायला सूरुवात केली. पण वाचता वाचता एका वाक्याशी अचानक तो थांबला नि म्हणाला, बघ ना…
या पुस्तकासारखा एक वॉक तर आपण घेतलाय. या पुस्तकाला वाचताना आपण एकमेकांसोबत हा वाचनाचा प्रवास तर केलाय. पण हा लेखक निकोलस स्पार्क्स पुस्तकाचा शेवट असा करतो की,
“आपल्या प्रेमातला हा पायी प्रवास खडतर पण लक्षात राहणारा होता. यामुळेच मला चमत्कारांवर विश्वास बसू लागला. हा प्रेमाचा चमत्कार एवढा सुंदर असतो आणि शेवटी ती मरते.”
याला काय अर्थ आहे… या वॉक मध्ये सगळचं तुटक आहे, कशालाच पूर्णत्व नाही. वॉक हा असा अर्धवट राहतो…?
तो इमोशनल होऊन त्या टबा वर डोकं टेकवून बोलतच राहिला. .
“होना, अर्धवटच राहतो.”
म्हणत मी त्या टबाच्या कड्यावरून पळून जात घासरणारच तोच त्याच्या पिळदार हातांनी माझ्या कमरेच्या विळख्यात हातांचा स्पर्श गुंफवून त्याने मला सावरत जवळ घेतलं नि म्हणाला,
“पुस्तक किती प्रश्न किती उत्तरे आणि किती समजूतदार बनवतात ना माणसाला? आणि या पुस्तकांची लेखिकाच मला मिळाली…
आपला वॉक अर्धवट नाही ठेवणार मी! कधीच नाही, मी तुला उचलुन घेऊन चालेल, तू साथ देशील ना? …”
—–