फ्रेंच किस का म्हणतात?

चायना की फ्रान्स… ?
हुश…
आपल्याला दोघांकडे जायचं नाही, भारतच माहित नाही, विदेश तर सातासमुद्रापार… तरीही भारताची नजर नि इंटरनेट तिथे पोहोचतं… १९९५ च्या जागतिकीकरणानंतर सगळचं ओसाड आणि सगळ्यांसाठी खुले झाले. त्यात राजकारण, बाजारीकरण, बिझनेस, रोमान्स, देवाण घेवाण, आयटी पार्क, आयात निर्यात, दूतावास हे सगळेच ट्रान्स्फर होऊ लागले.

अन् देशांमध्ये नवं करियर उदयाला आले. भाषेचं करियर…

भाषेचं सौंदर्य आणि स्पर्धा यामध्ये खेळ चालू असतो तो भाषेला समजून घेण्याचा…

सध्या मी चायनीज आणि फ्रेंच या दोघांचा अभ्यास करत होते.
या अभ्यासातून समोर आले,

फ्रेंच इज अ लँग्वेज ऑफ लव्ह/ रोमान्स…!
वाऊ!

“फ्रान्सची राष्ट्रीय भाषा असलेली फ्रेंच ही भाषा प्रेमाची भाषा आहे.”
कित्ती सुंदर ना?
आपल्या इथे इतकी विविधता आहे, पण हे प्रेमाच्या भाषेचं गूढ मात्र नाही… काय असेल ही प्रेमाची भाषा?
म्हणजे फ्रान्समधील लोक हे प्रेमाने नांदतात? की मग ते काहीही होवो प्रेमाने बोलतात? मी यात गोंधळले होते.
पण काहीतरी रोमँटिक बोलण्यासाठी फ्रेंच भाषेतील हावभाव वापरले जातात. तसेच येथील लोकांचा उच्चार आणि भाषाशैली ही ड्रीमी आणि मृदू असते. नेटिझन्स बऱ्याचदा ट्रान्सलेट करून फ्रेंच भाषेतील वाक्य आणि म्हणींचा वापर करतात. शिवाय पॅरिसला प्रेमाची शहर म्हणून ओळखले जाते.

येस आय नो…
या व्यतिरिक्तही काहीतरी आहे.
जे तारुण्यात आल्यानंतर सगळ्यांना प्रत्येक कॉलेजच्या कट्ट्यावर एकदा तरी कुजबुजलेले ऐकायला मिळते.

फ्रेंच किस!
तेव्हा प्रेमाची भाषा नि फ्रेंच भारी वाटते.
मग वाटते हे नाव का पडले असेल?
यापूर्वी किस हे फक्त गाल आणि ओठांवर व्हायचे. परंतु फ्रान्समध्ये याचे नवीन रूप उदयाला आले होते.

याचं उत्तर होतं,
फ्रेंच किसला सुरुवातीला मराईंचेनेज म्हणायचे.  कारण साधारण १९२० मध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिटनी, फ्रान्समधील मराईंचींस लोकं प्रदीर्घ आणि गहिऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी ओठांसह जीभेचा वापर करून समोरच्याच्या ओठांना स्पर्श करून चुंबन घेऊ लागले. आकर्षण आणि शारीरिक संबंध या दोघांना भावनेचा स्पर्श देत हे लोक जिभेने जीभेशी संवाद साधत एकमेकांमध्ये मिसळून जायचे.
प्रामुख्याने फ्रान्समधील लोकं ही उदारमतवादी आणि ब्रॉड माईंडेड होती, शिवाय अशा किसमधून अधिक वचन बद्ध प्रेम सिद्ध होते अशी धारणा आहे, या संकल्पनेतून फ्रेंच किसचा जन्म झाला…

शिवाय एक कथा अशीही आहे की,
ब्रिटीश आणि अमेरिकन जवानांकडून पहिल्या महायुद्धानंतर युरोपहून घरी परतत असताना त्यांच्या नजरेत आले, फ्रान्समधील लोक बायका आणि मैत्रिणींना अभिवादन करताना मिठी मारून उत्कट चुंबनांसह “दीर्घ साहसी” चुंबनही देतात. तेव्हा त्यांची ही प्रथा, हा ट्रेंड इंग्रजी लोकांनी जगभर वायरल केेेला.

असा हा प्रवास सुरू आहे…

Please follow and like us:
error

6 thoughts on “फ्रेंच किस का म्हणतात?”

 1. वाह ! पुजा…. तू तर लय भारी शोध लावलास 😛😛 याला फ्रेंच किस म्हणतात हे आज तुझ्यामुळे काळलं😛 नाहीतर आयुष्यभर त्याचं नामकरण झालं नसतं😛
  खूप छान लिहितेस तू… तुझं पाहिलं आर्टिकल मी #metoo च्या काळात वाचलं होतं, जे तुझ्या बालपणी तुझ्यासोबत घडलं होतं. ज्या पद्धतीने तू ते मांडलं होतंस त्याच दिवशी तुझ्या लिखाणाच्या प्रेमात पडलो होतो.अशीच रंजक गोष्टी लिहीत राहा आणि आनंद परत रहा.
  खूप शुभेच्छा !

  1. Thank You so much Bharat ☺️ नेहमीच तू मला प्रेरणा देत राहिलास. असच इन्स्पायर करत रहा ☺️🤗

 2. चंद्रशिल

  उत्कृष्ट पूजा , छोट्या मोठया गोष्ठी मागे इतक्या सुंदर गोष्ठी असतात आजक महितिक पडले आणी आनखी महिति घेन्याची इच्छा झाली. मराईंचेनेज कूठे आहे तो source दे

  1. Thank You so much 🙂 ही माहिती अशी मिळाली की, मराईंचींस म्हणजे ब्रिटनमधील वारसदार लोक जे ‘पेज दे मॉन्ट’ या जिल्ह्यात राहायचे. माहितीसाठी अंकित मित्तल आणि शेरिल कृषेनबौम हीचे “The Science of Kissing: What Our Lips Are Telling Us,” पुस्तक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *