-“जगायला हवं रे !
स्वतःसाठी नाही निदान या भाजीवाल्यासाठी, या बेंचवर बसणाऱ्या आजीसाठी, या समोरच्या कुलकर्ण्यासाठी “
-“तुझं आपलं काहीतरीच ……. लोकं कुठे चालले… तू काय बोलते?
जिंदगी कोणामुळे थांबत नाय, ना कोणासाठी काही करावं म्हणूून आपली जिंदगी नसते. कारण तो भाजीवाला तू नसली तरी जगणारे नि ती आजीसुद्धा आणि कुलकर्ण्यासुद्धा”
-“आपला आधार असतो रे यांना आणि हम गरीब लोगोंके पास एकही तो हक़ की चीज होती है “ख़ुशी” .
अगर वो भी खुद के पास रखूंगी तो जीने का मतलबही क्या? अपनी जिंदगी की सांस किसी के जिंंदगी में मेहकनी चाहिए।
आपल्याकडचा मोगरा वाटला जायला हवा रे!”
-“बघ यार जिगी,
‘या जगात पैसा बोलता है।
‘ख़ुशी’ हे फक्त बोलायला’
गरीबाच्या खुशीला किंमत नसते, श्रीमंतांच्या हुसकण्यालासुद्धा भाव असतो.
गरीब कि झोपडी जड होते यांना, श्रीमंतीचे टॉवर चालतात’ त्यामुळे पैसा ख़ुशी देता है, फक्त योग्य ठिकाणी गुंतायला हवा’ हे ठाम.
-“तुला माहिते सज्या…….. अंबानी खूप बीजी असतो,
त्याच्या आयुष्यात भाजीवाला नाही,कुलकर्ण्या नाही आणि आजी असेल पण संवाद नाही”
मला मनापासून वाटतं त्यानी जगायला हवं, प्रांजळ,शांत आणि स्वतःसाठी.. एक दिवस….
शेवटी आनंद,खुशी पैशाने मिळते रे सज्या,समाधान नाही…
आणि समाधानी राहणं आव्हानात्मके शिरीमंतांसाठी….
अंबानी खुश असेल पण समाधानी …?
चल निघायला हवं….
ब्रेक ओव्हर…”
आता मात्र एवढा वेळ पैशाची री ओढणारा सज्या, जिगीच्या स्वच्छपणात इतका सुरक्षित फील करतो कि निघताना तोही नकळत पुटपुटतो,
“जगायला हवं रे, निदान समाधानासाठी 🙂 “

Please follow and like us:
खूप तरल लेखन शैली…आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कोणते ना कोणते दुःख असतेच.. फक्त ज्याचे त्याचे कंगोरे वेगळे असतात. आणि काही वेळा आपण एका विशिष्ट अश्या चक्रव्यूहात असतो. तो भेदता आला पाहिजे. अशोक मामाचा एक चित्रपट आहे, ‘एक उनाड दिवस’ तसा एक उनाड दिवस प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात हवा. मग तो कोणीही असो.तू -मी किंवा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती…