दिवा माजघरात लावला होता,
प्रकाश त्या पारावर पडत होता…
त्या पारावरच्या ओट्यावर ते हात तिचे अस्थिर होत होते. त्याचा हात तिच्या हाताच्या एका इंचापासून दूर होता…
हेच अंतर तोडायचं होतं, प्रेम विनाकारण करायचं होतं!
इजहार जमत नव्हता, मन अशांत होते.
गोंधळ उरी दोघांच्या, काहूर माजले होते.
एक श्वास वेगळा होता, एक रात्र आज काळी सावळी होती.
ती थांब म्हणत होती, तो अधीर झाला होता …
भावना उर भरून वाहत होत्या, मन बावरे कल्पक होऊन गगनभरारी घेत होते.
या अशा घाईच्या श्र्वासांच्या रातीत नकळत त्यांनी जन्म दिला एका नव्या निर्णयाला… !
एका नव्या नात्याच्या पायरीला!
एका जादुई प्रवासाला!
अलवार, मनाचा काहूर शेजारी ठेऊन तिनं त्याच्या कुशीच्या टोपलीत डोकं टेकवलं नि त्याच्या मिठीचे स्वातंत्र्य हक्काने आपलंसं केलं.
तो पारावरच्या झाडाला लटकलेल्या चंद्रातून नेमक्या तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या चेहऱ्याला शून्यात पाहू लागला…
अधीर मन आता बधीर होऊन शांत होण्याचा प्रयत्न करू लागले पण असंभव ते प्रेमाचे वारे त्यांच्याच दिशेने वाहू लागले. लागलीच त्यानेही प्रेमाची जबाबदारी घेत, त्याच्या हातांच्या बाहू पाशांनी तिच्या प्रेमाला मिठीत घेतलं नि गुंफून टाकली त्याच्या कुशिशी तिची मिठी !
एक प्रवास या सावळीच्या राती अनंताचा सुरू झाला… !