तुम्ही प्रेमात पडाल, पण फक्त प्रेम काफी नाही. तुम्ही आंजारागोंजारा, लाजा, मिठी मारा, किस कारा, तिच्यासोबत घालवणाऱ्या क्षणांची स्वप्न पाहा, तिच्याबरोबर प्रणय क्षण घालवताना फॅन्टसीचे काही अलवार बोटं फिरवा. हे प्रेमाचे संबंध अनेक येतील. तुम्ही तिच्यात अडकून जाल, तुम्हाला त्याच्याशिवाय आणि त्याला तुमच्याशिवाय काहीच दिसणार नाही.
पण यापलीकडे नातं असतं.
ही नदीवरची समृध्द आणि जिव्हाळ्याची हिरवीशार थंडी अनुभवल्यानंतर त्याच्या तळाशी जायला लागेल, उतरावं लागेल. उतरताना प्रेमाची नाळ तुटण्याचा मुमेंट येईल, तुम्ही तुटायला लागाल. प्रेमाचा सुवास आतमध्ये मुरेल, ज्या माणसासोबत कधी भांडणं होऊन नातं संपुष्टात येईल असं वाटणार नाही. पण तशा घटना घडायला लागतील. तुमचं पूर्ण आयुष्य हादरून जाईल. डोंगर दर्यातून वरती विसवण्याचा प्रयत्न कराल पण तुमच्या हातून नात्याची दोरी जितकी पकडायला जाल निसटत जाईल. समोरचा माणूसही तुटेल. एका अनपेक्षित आणि सोप्या क्षणी ही ताटातूट प्रत्यक्षात घडेल.
पण, तेव्हा डोळे उघडण्याची गरज असेल. त्या कोरड्या शुष्क प्रवाहात प्रेमाचा विरह कडाडून डोक्यात जाईल. कशात मन लागणार नाही.. चूक बरोबरीचे गणितं समोर दिसतील. स्साला मुलींची जातच अशी, नाहीतर सगळी मुलं सारखीच हे तोलणे होईल, भटकत जाल.
अशावेळी तुम्ही स्वतःच्या आत मेलेला माणूस पाहाल. प्रेम तुम्हाला कुशीत घेतं, आईपेक्षा मोठं वाटतं. तारुण्यात आई दूर होते, प्रेमाला नंदनवनाचा स्पर्श येतो, दोघांची मन तिथल्या पाळण्यात झुलू लागतात.
प्रेमामुळे तुम्ही स्वतःवर प्रेम करू लागता, त्याच प्रेमाने तुम्ही आयुष्यातून उठण्यापर्यंतचा दिवस एकदा येईल.
पण ब्रेकअप हा रियालिटी चेक असतो. प्रेमाला केवळ गोजिर्या स्वप्नरथात ठेवणं बंद करायला लागते. तुम्हाला वास्तवही जगायचं आहे आणि वास्तवातील जगासाठी आणि विशेषत: स्वतःच्या आयुष्यात तुम्ही अजूनही स्वतंत्र व्यक्तीच असतात. हे दोघांचं एक होणं सोबत असताना ठीक आहे. पण सातत्याने दोघांनी एकमेकांसोबत असणं कुठल्याच प्रेमात शक्य नसतं. त्यामुळे प्रेम असलं तरीही स्वतंत्र आयुष्य गमावता कामा नये.
याबाबत बोलणारी डियर कॉम्रेड ही फिल्म आहे. फिल्म अर्थात साऊथ इंडियन आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून तुम्ही मनोरंजनाची, एका निष्कर्षाची, प्रेमाची आणि फुल पॅकेजची अपेक्षा करू शकतात. हा चित्रपट तुमच्या अपेक्षांना नाराज करणार नाही.
प्रेम कसं असावं, ते तुटताना काय होतं?, प्रेम होताना काय फिलिंग असते, प्रेम तुटताना काय भावना असते, त्याचं निघून जाणं, तिचं आयुष्याशी लढणं, बुद्धिमत्ता आणि खुबसुरती कशी लोकांच्या नजरेत खुपते, त्यांनतर काय घडतं, त्याचं तीन वर्षांपासून सगळ्या ओळखीच्या दूनियापासून दूर जाणं कसं असतं, ब्रेकपच्या काळात निसर्ग ऐकणं, त्याच्याशी बोलणं, त्याचे आवाज रेकॉर्ड करणं, स्वतःच्या आतला मेलेला माणूस निसर्गासमोर बाहेर काढणे, घुटण घुसमट जशी शरीरातून जळजळते तशीच्या तशी बाहेर काढणं, कसलंच ढोंग नाही! निसर्ग तुमच्या आतला माणूस तुम्हाला परत मिळवून देईल, ही खात्री मी देऊ शकते. हा निसर्ग, त्याची हवा, माती, पाणी, नदी सगळे तुमच्याशी बोलतात, जेवढे लोक तेवढ्या कहाणी, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना तुम्हाला अनेक प्रवासी भेटतात आयुष्याशी लढणारे! तुमच्या तुटलेल्या काळात निसर्गाला कुशीत घ्या. एक वाक्य हिरो मनाशी बोलतो की, प्रकृतीच्या श्वासातून निघालेली आवाज मला आतापर्यंत शांत करते. हा अनुभव मीही खूप जवळून घेतला आहे. निसर्ग तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. तसच हा चित्रपट तुम्हाला योग्य प्रेमाची झलक दाखवेल.
अशातच चित्रपट काहीसा मनाशी विचार करायला भाग पाडतो.
वाटतं, केवळ प्रेम पुरेसं नाही. त्याने आरशात तिचं चुकत असेल तर काय चुकतं दाखवायला हव. त्याच्या नजरेत तिच्या स्वप्नांसाठी धडपड हवी. त्याने तिचं अस्तित्व विसरू देता कामा नये आणि मुलगी म्हणून ती तसं करत असेल तर त्याने भांडाव, चीडाव, राडा करावं, वेळ आल्यास निघून जावं, ब्रेकअप करावं!
आपल्या गर्लफ्रेण्डची लढण्याची नस ओळखून तिला तिच्या हक्कासाठी लढायला शिकवणारा असा कॉम्रेड आहे.
हर लड़की के जीवन में होना चाहिए ऐसा कॉमरेड।
अगर वो नहीं होगा तो तुम खुद के न्याय के लिए कॉमरेड बनो।
मुलगी म्हणून जर तुम्ही अन्यायाविरूद्ध आवाज उठवणार असाल तर आयुष्य गमावण्याची किंमत द्यावी लागेल, हे गृहीत धरा. आपल्या कायद्याच्या देशातही तुम्ही आवाज उठवा, त्यासाठी तुमची स्वप्न मारावी लागतील, हे सत्य दाखवणारा हा पट आहे.
त्याने तिच्यासाठी लढणं हे पाहण्यासारख आहे. लढल्यानंतर ती सोबत नाही हे पाहून दुःख झाल्यानंतर तो काय करतो हे पाहणं कौतुकास्पद आहे… तिथे कळतं,
कॉम्रेड काय आहे?
त्याचे आजोबा त्याला सांगायचे, कोम्रेड म्हणजे जो लोकांच्या हक्कासाठी लढतो तो कॉम्रेड, त्याला बंदिस्त होऊन गुंडा गर्दी करून चालत नाही, त्याला मैदानात उतरावे लागेल. जेव्हा तुम्ही कॉम्रेड बनाल तेव्हा तुम्हाला सगळे उत्तरं मिळतील.
या बंदीच्या काळात गीता गोविंदम् आणि डियर कॉम्रेड या चित्रपटातील विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना या जोडीने उत्तम चित्रपटांची मेजवानी दिली आहे. हिरॉईन जशी अकर्षक आहे, त्याहून जास्त हिरो परफेक्ट सिनेमा मटेरियल आहे, केवळ अभिनय नाही लूक्स म्हणजे काही काही ठिकाणी खल्लास व्हावं इतका डॅशिंग वाटतो. काही साऊथ फिल्म्स बॉक्स ऑफिसवर धमाका करत नसले तरी युटुबला जगभरातून त्यांना मिलियनमध्ये प्रेम मिळतं. चित्रपटाचा शेवट काही प्रश्न अर्धवट ठेवतो, खूप जास्त ड्युरेशन होईल म्हणून उरकवला असे वाटते. पण हा चित्रपट जास्तीत जास्त तरुणाईला अपील करणारा आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा आहे. चित्रपट प्रत्येक तरुणाच्या आतील न्यायासाठीचा आवाज आहे. कॉम्रेडचा अर्थ समजवणारा आहे. प्रेम म्हणजे काट्यासहित मिळणारं गुलाब आहे. जपावं, वाढवावं, सांभाळावं लागतं…
खूप सुंदर लिहिलंय..
I really wanted to write a small comment so as to appreciate you for all the amazing techniques you are placing on this website. My prolonged internet search has finally been honored with extremely good information to exchange with my friends and classmates. I would point out that we website visitors are very much lucky to dwell in a good site with very many outstanding individuals with insightful basics. I feel somewhat happy to have used your website and look forward to so many more fun times reading here. Thanks again for a lot of things.
Pingback: दिठी... वेदना शमवणारी! -