तुम्हाला काय वाटतं?

मी या ब्लॉगसाठी सुरुवातीलाच लिओनार्डो द विंची यांचं ‘हेड ऑफ अ वुमन (ला स्कॅपिग्लियाता) हे चित्र वापरले. त्यांनी चित्र काढताना “स्त्रियांचं मन आणि डोकं कोणालाच समजू शकलं नाही, किंवा याच आशयाने हे रेखाटलं असण्याची शक्यता आहे. त्यांनी चित्राला दिलेल्या नावावरून तसा प्रत्यय येतो, पण मला या चित्रात वेगळच अपूर्ण फिलिंग येतं. वाटतं, मुलगी जन्म घेते, मोठी होते, आझाद व्हायला जाते तिथे लग्न होतं, तिचं आयुष्य कुठल्याच टप्प्यावर फुललं जात नाही. आताच्या पिढीत सोशल मीडिया सारखे व्यासपीठ आले, तेव्हापासून ती थोडी व्यक्त व्हायला लागली, पण तिथेही तिच्या कलेला कला म्हणून पाहिलं गेलं?” या प्रश्नचिन्हाला समर्पक उत्तर म्हणजे हे चित्र. यातून विंची सांगू इच्छित असतील, तिला पूर्णपणे उलगडू द्या. तुम्हाला तिच्याबद्दल आजही काहीच माहिती नाही, तुम्हाला म्हणजे या जगाला, केवळ पुरुषांना उद्देशून नाही. तिला स्वतःला सुद्धा तिच्याबद्दल काहीच माहीत नाही, ती तिच्या स्वतःच्या खोलात कधी गेलीच नाहीये. ती बाहेरच घुटमळत आहे, तिला जग जो बनावटी आरसा दाखवू पाहत आहे, तिला तेवढाच दिसत आहे, ती कष्ट घेत नाहीये बाहेर पडायचे आणि काही लोक मुद्दाम तिला बाहेर पडू न देण्यासाठी प्रयत्न करताय.

फरक पाहा…
फरक पडतोच,
आणि फरक असतोच….

मुलींचं कलेच्या आणि निर्मितीक्षम प्रांतात थोडं दुर्दैवच असतं.
चेहरा पाहून दाद देणाऱ्या वर्गाचा रागच येतो, यामुळे खरा कलाकार बाहेर पडत नाही. कलाकार कलेपर्यंत पोहचत नाही,
मुरत नाही त्या मुलीत कलेचा क्षार!

मी, ती आणि माझ्यासारख्या कित्येकजणी वाहवत जाता या दिखाऊ कौतुकाच्या मागे,
त्यामुळे समाज म्हणून तुम्ही नकळत कापुन टाकता, जन्माला येणाऱ्या कलेचा बुंधा…

तो सहज म्हणून जातो, “अरे त्याला काय दिसायला चांगली आहे, म्हणून लाइक्स, कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव होतो!” हा दोष खरंच मुलीचा आहे? तिची कला तिचं अस्तित्व असलं तरी, या जगात तिचं सगळचं ‘मुलगी’ या उपरोधापासून सुरू होतं. यात तिच्या लिंगाचा कमीपणा समजू की या जगात मुली नसल्याचा कमीपणा आहे हा?

माझा मुद्दाच तो आहे, कलेबद्दल लिहितानाही आधी तिच्या जेंडर, लिंगाबद्दल लिहावच लागेल का?
“तिच्यातली कमी काढायला हा समाज तिच्या शरीराच्या कमनीयते पलिकडे जाणार आहे का?” तिने लिहिलं तिच्या आतल्या आणि तिला सामोरं जाव्या लागणाऱ्या स्त्रीवादाबद्दल, तुम्हाला तिला केवळ टॅग देऊन मोकळं व्हायचंय. कालपर्यंतच्या पिढीमध्ये हा टॅग समाजात विष पसरविणारी, समाजाला खराब करणारी, आपल्या बायकांना नादाला लावणारी, वाया गेलेली, पोरांना फिरवणारी, वेश्या, रंडी, *नाल, कुलटा, आणि आज फेमिनिस्ट… !
हा टॅग आधी मिम्स आणि नंतर शिवीसारखा वापरला की मुली त्या टॅगपासून वाचण्यासाठी दूर पळतात. त्यामुळे फेमिनिझम शब्द ट्रोल होतोच, सोबत त्याबाबत लिहिलेल्या विषयाचं विष होतं. त्यामुळे मुलींनी फारफार तर फोटोज् टाकावे, मिम्स शेअर करावे, मुलांनी स्त्रीवादावर लिहिलं की त्यांची कौतुक करावी, लाईव्ह येऊन ब्युटी टिप्सचे व्हिडिओ करावे,
तुम्ही बोलला तर तुम्ही नाही दिसत तुमचं लिंग दिसतं.
तुम्ही लिंगात राहायचं, नाही राहिला तर समाज आहेच, तुम्हाला ठेवायला.
मुलींच्या तुलनेत मुलांचा रेशो आजही दुप्पटीने आहे. त्यामुळे मुलं जी दिसेल, तिला उपमा देत जातात. काही अपवाद नक्कीच असतात. या जगाच्या ८०% चुकीच्या मानसिकतेच्या पुरुषांत हे अपवाद ओळखणं खरं आव्हानच असतं. पण माझा मुद्दा हाच आहे, मुलगी म्हणून तिच्याकडे पाहताना तिच्या कलेला तुम्ही माणूस का समजता?
कला माणूस नाहीये, त्यामुळे ती युनिव्हर्सल आहे!

मान्य आहे, आजूबाजूला मुली थोड्याच आहेत, त्यातही ज्या आहेत त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीत अरेंज मॅरेजचे भिक्षुक व्हावे लागते, त्यात कधी नशिबाच्या गळाला मासा लागतो तसं एखादी गावते हाताला, तेव्हा हाती आलेली सोनपापडी आपल्याला तितकीशी रुचत नसली तरी भावनिक, शारीरिक आणि मानवी भूक भागवणारी असते, म्हणजेच ती मुलगी असते. ती मुलगी असणं पुरेसे असते. त्यामुळे जसं पुरुषाच्या मनाचा मार्ग पोटातून जातो, तसा मुलींच्या मनाचा मार्ग त्यांना देत असणाऱ्या वेळेतून आणि वेळेबरोबर योग्य कंपनी देणाऱ्या मुलाच्या बोलण्यातून जातो. तिला तुम्ही खरे वाटत असतात आणि त्याबरोबर तुमचे शब्दही. त्यामुळे तुम्ही तिच्या कसल्याही गोष्टीचे कौतुक करता, हे ती खूप सिरीयसली घेत असते. तिच्यासाठी तिच्या हक्काचा प्रामाणिक प्रेक्षक बना, तिच्या कलेवर टीका करा, जे आवडलं नाही ते सांगा, कशावर काम करण्याची गरज आहे ते बोला, तिच्यात कलाकार घडवणं तुमच्या हातात आहे, त्यामुळे शब्द जपून वापरा!

तिला आणि तिच्या कलेला मोठं होऊ द्या! तिच्या जन्माला सहानुभूती समजून तिच्या डोळ्यांवर गुलाबाच्या, सुखद वाटतील तेवढ्याच उपमा बांधू नका, ती कलाकार असेल तर तिच्या मनातला तो अदृश्य सेन्स तिला उलगडून द्यायला मदत करा. तुमच्या या अगतिक वागणुकीमुळे समाजात निर्माण होणाऱ्या हरहुन्नरी कलाकारांच नुकसान होणार आहे आणि कलेवर कलंक आणि अन्यायाचा डाग लागणार आहे. कलेला माणूस बनवू नका, ती युनिव्हर्सल आहे!

।पूजा ढेरिंगे।

Please follow and like us:
error

4 thoughts on “तुम्हाला काय वाटतं?”

  1. जर तुम्हाला हे चित्र or चेहेरा समजुन घेचे असेल तर first leonordi de vincho ला समजले पाहिजे then you can think about drawing but understaning but impossible to understand such genius person!

  2. जर तुम्हाला हे चित्र or चेहेरा समजुन घेचे असेल तर first leonordi de vincho ला समजले पाहिजे then you can think about drawing but understaning him is impossible, such genius person!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *