दृश्य अन् सत्याचा लपंडाव, दृश्यम!

तुम्हाला जर डोकं खाजवायला लावणारे, तर्क वितर्कात टाकणारे चित्रपट आवडत असतील तर दृश्यम २ तुमच्यासाठी आहे. चित्रपटात सगळ्यात जास्त श्रेय लेखकाला जातं. ज्या स्ट्रॅटजीने हे लिहिलंय ते लिखाण त्या पात्रांचं आयुष्य जगल्याशिवाय येणं अशक्यप्राय!

चित्रपटात मध्यांतरानंतर जे ३-४ इंटेलिजंट ट्विस्ट आहे त्याने चित्रपटाची पकड घट्ट होते. जितका पहिला भाग स्मार्ट तितकीच ताकद दुसऱ्यात पण घट्ट आहे. दुसरा भाग पहिल्या भागाशी एकदम जोडलेला असल्यामुळे पहिल्याशिवाय दुसऱ्याची लिंक लागत नाही. दोन्ही भागात सामान्य माणसाची ताकद लक्षात येते. आपण भले आयुष्यात खूप साधं काम करत असू पण आयुष्यात असं काही घडतं की सामान्य माणूस म्हणून आपण इतके इंटेलिजंट असू हे आपल्यालाही तेव्हाच कळतं.

सुरुवातीला चित्रपट खूप स्लो आणि असंबद्ध वाटतो. पण उत्तरार्धात सगळे अर्थ लागतात. वातावरण निर्मितीला पूर्वार्ध जातो. पण मध्यांतरानंतर जी इंटेलिजन्टली पकड घेतो त्याने प्रेक्षक आपसूक टाळ्या आणि हमखास शिट्ट्या वाजवतात. अजय देवगण सामान्य माणूस म्हणून लूक वाईज भलताच स्मार्ट दिसलाय.

पिक्चरची सुरुवात नीट पाहिली तर सुरुवातीलाच लक्षात येतं की डेड बॉडी कुठे लपवली आहे. जेव्हा एकच चित्रपट दोनदा पाहतो तेव्हा आपल्याला रिव्हर्स दृष्टिकोन कळू लागतो. मल्याळम दृश्यम पाहिल्यानंतर हिंदी दृश्यम फ्रेश वाटणे अपेक्षित नसले तरी तो आहे. कास्टिंग तगडी असल्यामुळे स्टोरी छान मुरते. मिसेस साळगांवकरचा त्या मर्डरनंतर सात वर्षे सुरू असलेला सदमा समजून घेताना आपल्याच गळ्यात चित्रपटभर आवंढा येत राहतो.

समोर काय आहे यापेक्षा आपण समोरच्या गोष्टीत काय पाहतोय हे सांगणारा हा चित्रपट आहे. त्यामुळेच पहिल्या दृश्यात अजय देवगण जमीन खोदतोय, आपण फक्त त्याची लगबग बघतो. पण त्याच्या भोवतल्याच्या परिसरावरून शेवटी पडलेल्या प्रश्नाचं पहिलेच उत्तर मिळून जातं हे लक्षात येत नाही. त्यामुळे दृश्यापेक्षा आपण काय बघतो हे इंपॉर्टन्ट !

पूर्ण चित्रपटात न्यायासाठी लढाई सुरू असली तरी जग आणि ज्याने दुष्कृत्य केले त्याची स्वतःची आई साळगांवकर कुटुंबाला गुन्हेगार ठरवते. ही रिॲलिटी इतकी स्वच्छ परखडपणे सहज दाखवली, याने चित्रपट जास्त खरा वाटतो आणि पटतो.

चित्रपटात मेन फोकस हिरोच्या आयुष्यात कुटुंबाचं महत्त्व सांगायचं होतं पण आपण पहिल्या भागातलं रहस्य शोधत वेगळेच तर्क लावत बसतो. उत्तरं शोधत बसतो आणि शेवटी सगळी उत्तरं मिळतात.

कुटुंब आणि डेडबॉडी या दोन्हीत गुंतलेला हिरो कित्ती कसोशीने सगळ्यांवर पाळत ठेवून सगळं मॅनेज करतो हे स्क्रीनवर इतक्या सुटसुटीतपणे मांडण्यासाठी लेखकाचे स्वागतच… माणूस कसा एकमेकाच्या पायात पाय घुटमळून गुंतलेला असतो हे मजेशीरपणे बघायला इंटर्वलनंतर मजा येते. मध्यंतराआधी मेडीटेशन व्हावे इतका संयम ठेवून प्रेक्षक सगळं पाहत असतो पण त्यात सुख म्हणजे तब्बुला स्क्रीनवर अभिनयापेक्षा सहज वावरताना पाहणं डोळ्यांना ट्रिट आहे. चेरी ऑन द टॉप म्हणजे अक्षय खन्ना त्याच्या लुकने चित्रपटाला नॅचरल गूढ सस्पेन्स टच आणतो. अक्षय खन्ना माझ्या पिढीसाठी तालमध्ये रोमान्स करणारा अक्षय किंवा मग दिल चाहता हैं मध्ये समंजस बॉय अक्षय म्हणजे गुणी पात्र. पण त्यानंतर आयजीच्या रोलमध्ये त्याला पाहणं चित्रपटाला क्रिस्पी बनवतं.

हिरो जिंकतो या भावनेनेच लोकांना चित्रपट पाहिल्यासारखं वाटतं, या विश्वासाभोवती फिरणारे कथानक या चित्रपटालाही त्यामुळेच जास्त प्रेक्षकवर्ग देतो.

यापेक्षा उत्तम सस्पेन्स, इन्वेस्टीगेटीव्ह चित्रपट यापूर्वी आले आहे, पण काही चित्रपट माससाठी असतात. दृश्यमच्या पहिल्या भागानेच दुसऱ्या भागाची पब्लिसिटी करावी एवढी ताकद पहिल्या भागाने निर्माण केलेली.

इन्वेस्टीगेटीव्ह चित्रपट बघताना वेगळीच मजा असते. एरवी इमोशनल चित्रपट बघताना आयुष्याचा स्ट्रेस आठवून त्यावर दुःखी होणारे आपण, अशा चित्रपटांत डोकं लावत बसतो आणि डोकं बिझी असलं की आयुष्य सोप्पं होतं. त्यामुळे दृश्यम सारखे चित्रपट रिफ्रेशिंग असतात.

-पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • by