एक विलन रिटर्न्स वाचाच!

  • by

(टीप – सुरुवातीलाच टीप लिहीत असल्याचं कारण ज्या सिनेमावर मी लिहू घातलय तो अनेक लोकांच्या मनात एकमताने बॉयकॉट केलेला सिनेमा आहे. सर्व सिने रसिकांची माफी मागून या लिखाणास सुरुवात करण्याची हिंमत करते)
तर्र सिनेमाचं नाव आहे एक विलन रिटर्न्स!

तोच ज्यात अर्जुन कपूर आहे. पण मी जर त्याला इग्नोर करून सिनेमा पाहिला तर सुरीचे दिग्दर्शन असलेला तसा बरा सिनेमा आहे हा आणि अर्जुनला इग्नोर करून सिनेमा पाहणं सहजच शक्य आहे. कारण जॉन अब्राहम आणि इतर दोन हिरोईनने सिनेमाचा बराच भाग खाल्लाय.
सिनेमा पाहताना स्क्रिप्टला धरून अनेक विचार मनात आले. म्हणजे कसं आणि कोणाचं प्रेम आपल्याला मिळतंय यावरूनच ठरत असेल ना प्रेम करणाऱ्या माणसाचं आयुष्य? तिथे जिंकून हरत नाही कोणी!
पण प्रेम भयानक असू शकतं? प्रेम माणसाचा प्रत्यक्षात जीव घेऊ शकतो? कोणत्या सीमा पार करायला लावू शकतं कोणीच सांगू शकत नाही. प्रेमातल्या एका प्लेजरसाठी प्रेमातला व्यक्ती कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. पण आपल्याला पाहिजे असलेल्या व्यक्तीचं प्रेम मिळवण्याच्या जिद्दित हद्द पार करून जीव घेणं थरारक आहे.
“प्यार जब जिद बन जाए और जिद हद पार करने लगे तो इश्क सामने वाले की भी फिक्र नहीं करता।” याचा अर्थ हळूहळू मूव्ही पुढे जातो तसा येतो.
एकतर्फी प्रेमाच्या अनेक कहाण्या बॉलीवूडने दाखवल्या. पण आपल्या आजूबाजूला होणारे एकतर्फी प्रेमातले एसिड अटॅक, खून हे सर्रास वाढू लागले आहे.
ब्रेक अप, विरह, म्यूचूअल समजुतीने दूर होणं हे सगळं जीवघेणं आहेच. पण एखाद्याचं अस्तित्व नाहीसं करणं भयावह आहे. येणाऱ्या पिढीने हे कल्चर पुढे न्यायला नको. याची सुरुवात कुठेतरी झालेली दिसते. “तू मेरी नहीं हुई तो किसी की भी नहीं हो सकती।” या एटीट्युडच्या मर्दानीमुळे कठोर परिणाम होऊ लागले आहे. सिनेमात दाखवणारं हार्डकोर प्रेम वास्तवात करून हिरो बनू पाहणारी जमात वाढायला नको.
कारण तेच खरे विलन आहे. त्यामुळे मला एक विलन रिटर्नचा विषय महत्त्वाचा वाटला. आज एक विलन रिटर्न्स पाहिला. त्यात दाखवलेलं बऱ्याच अंशी वास्तविक आहे.
प्रेम ही काही खेळायची वस्तू नाही. कुणाच्या भावना आपली अमानत नाही. हे समजायला हवे. आताच्या काळात एका नात्यात दोघेजण असून नेमकं कोण सीरियस प्रेम करतं आणि कोण तात्पुरता आनंद घेतय हेच कळत नाही. कारण कॅजूअल रिलेशनशिप ही वेस्टर्न कन्सेप्ट आपल्याकडे आली. पण भारतात वाढणाऱ्या भावनांचे मूळ न समजता ती अडॉप्ट करणं चुकीचं आहे. इथे नातं सुरू होण्याआधीच ते खरंच सीरियस आहे का हे बघून घ्यावं. हो मान्य आहे प्रेम सहज होतं, अगतिकपणे! पण ते प्रेम नाही तो स्वभाव असतो माणसाचा. प्रेम केव्हाही होऊ शकतं, कसही आणि कधीही. कारण प्रेम करणं आणि प्रेम करू देणं हा मानवी स्वभाव आहे. त्यासोबत येणारे परिणाम आणि लूपहोल्स आपल्याला त्या त्यावेळी समजून घ्यावे लागतील. नाहीतर कुणीतरी तुमचा नाहीतर कोणाचा तरी तुम्ही वापर कराल.

एक विलन रिटर्नचे अनेक वाईट रिव्ह्यू वाचले. मास फ्लॉप म्हणून घोषित झालं हेही कळलं. पण या सगळ्यात चित्रपट खूप गंभीर मेसेज देऊन जातो तो मिस झाला. तसं पाहिलं तर सिनेमा आवडणं न आवडणं हे व्यक्तीसापेक्ष आहे. त्यामुळे इतरांच्या मताचा पूर्ण आदर आहे. पण प्रत्येक चित्रपटाचे लिखाण हे त्या काळात घडणाऱ्या गोष्टींवर बेस्ड असतं अस मला वाटतं. कारण लेखक त्या काळात जगत असतो. त्यामुळे जगण्यातला अंश त्यात उतरलेला असतोच. त्यामुळे आताचा प्रेमातला उथळपणा या स्टोरीत दाखवणं चित्रपटाची गरज असेल.

चित्रपटात दिशा पटानीचा क्रिस्पी अंदाज आकर्षक वाटला. तारा सुतरियाचा फेस कट श्रद्धा कपूर सारखा असल्यामुळे तिला घेतलं असावं असा माझा तर्कहीन अंदाज आहे. पण ताराचे ट्रॅडिशनल डिजाइन असलेले ड्रेसेस, त्यावर टिकली हे लूक्स वेगळे आहेत. हिरोईन्स नेहमी पेक्षा वेगळ्या अंदाजात चांगल्या वाटताय.
अर्जुन कपूर वाईट नाही आणि चांगलाही नाही. तो हिरो म्हणून विशेष नाही. त्याच्या जागी कोणीही सूट झाला असता. त्याचा अभिनय पाहताना तो नेहमी अंडर प्रेशर परफॉर्म करतो असे वाटत राहते. स्क्रीनवर काहीतरी हालचाल होते एवढ्या पुरतं. जॉन अब्राहमला त्या सेमी न्यूड हॉट अंदाजात बघणं खरं नेत्रसुख! अहाहा! दिशाचं प्रेमात बदला घेण्याचं कारण अजूनही ट्विस्ट आणणारं आहे अस वाटतं, पण ते फक्त वाटतच राहते. त्यासाठी मूव्ही पूर्ण बघितला.
या सगळ्यामध्ये एक लक्षात आलं,
“प्रेम तुमची ताकद किंवा तुमची कमजोरी बनू शकतं !”

शेवटी दाखवलेला आपला रितेश देशमुख पुन्हा पहिल्या पार्टची आठवण देऊन जातो आणि तिसऱ्या भागात, पहिल्या आणि दुसऱ्या भागातले विलनसह त्यांचे हिरो, हिरोईन एकत्र येऊन प्रेमाला जिंकवतील आणि एक विलनचा एंड होईल इतका अपेक्षित निष्कर्ष मनाने काढून चित्रपट संपल्यानंतर मी पहिल्या एक विलनचा म्युजिक ज्युकबॉक्स ऐकला. कारण ती कमी दुसऱ्या पार्टमध्ये सतत वाटत राहते.
आणि मग चुकून पहिल्या गेलेल्या या मुविला मी एकटीने का सहन करावं म्हणून त्यावर मत मांडून तुमचे ५ मिनिट घेतले त्यासाठी अर्जुन कपूर आणि त्याला कास्ट करणार्या कास्टिंग डिरेक्टरकडून आभार!

  • पूजा ढेरिंगे
Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *