विचारांचा कम्फर्टझोन

आपल्याला आपल्या लेव्हलला समजून घेईल असा कुणीतरी हवा असतो नेहमी.
तो कुणीतरी आपल्या विचारांना कंम्फर्टेबल करणारा, त्यांना समजून घेणारा, योग्य न्याय देणारा आणि महत्वाचं म्हणजे योग्य प्रतिसाद देणारा असावा असं नेहमी वाटतं आणि समजा मग असा कुणीतरी मिळाला जो हळुवार आपल्या विचारांना त्याच्या विचारांच्या कट्ट्यावर कम्फर्टेबल करेल अशावेळी काय होतं …?
‘आपल्या विचारांना त्याने समजून घेतलं.’ या विचाराने आपण त्याला समजून घेऊ लागतो. मग हळूहळू आपण त्या व्यक्तीशी आपलं नातं दृढ करतो. किंबहुना ते होत जातं. तो सहवास जास्त जवळचा वाटू लागतो मग स्वभावानुसार नाही नाही म्हणत म्हणत त्याला घट्टमैत्री किंवा प्रियकर-प्रेयसीच्या परिसीमा लागतात आणि त्या लागतातच नकळत. मग त्यामुळे एखादा विचार न पटणारा असला तरी समोरच्या व्यक्तीच्या विचारांमुळे ‘हो ला हो’ करून सोडून दिल्या जातात गोष्टी. हे हळूहळू वारंवार होऊ लागतं.
खरंतर आधीचा तो स्वछंदीपणा असतो नात्यात, पण जी मोकळीक होती तिला कुठेतरी स्वप्लविराम लागतो. त्याच्या/ तिच्या विचारांपुढे आपला विचार जोडावा कि नाही हा रुखरुखीचा प्रश्न सारखा पडत राहतो… पण आपल्या विचारांचा कफर्टझोन निघून जाईल, आपल्यात वाद होतील त्यामुळे बरेचसे मनातच दडवले जाऊ लागते आणि तरीही अशावेळी तो व्यक्ती आयुष्यभरासाठी निवडलाही जातो.
हो मान्य आहे ना, एखाद्या व्यक्तीबरोबर आयुष्य काढण्यासाठी त्या व्यक्तीचे विचार खुप जास्त महत्वाचे असतात, पण त्याबरोबरच व्यक्तीसमोर बोलण्याचा मोकळेपणाही नात्यात ठेवावा लागतो… मुळात माणसाला ‘समोरच्या व्यक्तीला गमावण्याची भीती’ हे सगळे बंधन टाकते राहते. त्यामुळे काही काळानंतर आपल्या विचारांचं कम्फर्टझोन निघून जाऊन आपण समोरच्याच्या विचारांचं कॅरेक्टर जगू लागतो.

त्याच्यानुसार नकळत त्याला कसं आवडेल, योग्य वाटेल ते करू लागतो. तेही स्वतःच्या आयुष्यातला स्व सोडून. नकळत दोन व्यक्ती एकाच विचारधारेचे, एकाच प्रवाहाचे पाणी होऊ लागतात. पण ते विसरून जातात, त्यांची भेट होताना हा प्रवाह वेगवेगळ्या प्रवाशांचा होता. दोन वेगळी व्यक्ती एका नात्यात असली तर त्यात नावीन्य, पडझड आणि कैक वेगळे क्षण येतील.
त्यामुळे समोरच्या व्यक्तीत आपल्या विचारांचा कफर्टझोन शोधावा, त्याच्यासोबत असणारा विचारांचा कट्टा नेहमी खास ठेवावा तो जपावा, तात्पुरता नाही,

तो जपावा आयुष्यभरासाठी… कारण काही क्षणापुरता जपला कि त्याच्या आठवणी होतात जिथे दोघेही फक्त आठवणीत उरतात पण आयुष्यभरासाठी जपला कि त्याची गोष्ट होते जी वर्षाकाळानंतर अशाच एखाद्या रिकाम्या वेळेत आठवणींचा अल्बम काढून एका कट्ट्यावर गुंफली जाते हातात हात घेऊन एका कॉफीसोबत … 💜

Please follow and like us:
error

1 thought on “विचारांचा कम्फर्टझोन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *