प्रत्येक नात्याचं स्ट्रगल…

  • by

नात्यात तुमचे मतभेद होऊ शकतात. किंबहुना तुम्ही आयुष्यभराचा जोडीदार निवडला म्हणून तो तुमच्या मताशी मिळता जुळता असावा, आणि या गोष्टीवर तुम्ही गर्व करावा असं त्यात काहीच नाही. “तुमचे मतभेद होऊ शकतात” हा फॅक्ट तुम्ही स्वीकारायला हवा. कारण व्यक्ती व्यक्तीने मत मतांतरे होतात. तुम्हाला हे मान्य असायला हवे. मुलगा म्हणून सुरुवातीला तुम्हाला पटवायला तो तुमच्या पसंतीला त्याची आवड म्हणून दुजोरा देईल. पण जसं जस वेळ जाईल, तुम्हाला समोरचा व्यक्ती कांद्याचं साल उडून जावें तसा स्पष्ट दिसायला लागेल. तो व्यक्ती तुम्ही निवडलेला असेल, म्हणून त्याने तुमच्या सारखं वागावं, तुमच्या हो ला हो करावं असा हट्ट करणं चुकीचं आहे. कारण जास्तीतजास्त महिनाभर समोरचा व्यक्ती प्रॅक्टिकली प्रेम म्हणून तुम्ही म्हणाल तसं करेलही. पण याने तुम्ही डोमिनेटिंग बनत जाऊन स्वतःच स्वतःच्या नात्याला खराब कराल.

कुठलच नातं परफेक्ट नसतं, ते बनवण्याचा प्रयत्न म्हणजे माणसाचा पुतळा बनवून ठेवण्याचा प्रयत्न असतो.

प्रत्येक नात्याचे स्ट्रगल वेगळे असतात. तुम्हाला तुमच्या नात्याचं वेगळेपण शोधता अन् जपता यायला हवं! बऱ्याचदा आपल्या नात्याला आपण समाजातल्या इतर लोकांकडे पाहून तराजूत तोलण्याचा प्रयत्न करतो. एखादं नातं सहज पुढे सरकत असतं, एखाद्या नात्याला खूप अडथळे येतात. पण म्हणून सहज पुढे जाणाऱ्या नात्यात दुसऱ्या काहीच अडचणी नसतात का हो? त्यामुळे एखाद्याच नातं कसं चांगलं, कसं वाईट याने तुम्ही नात्यांचा अपमान करत असतात. नाहीतर समोरचं कपल किती साजेसे आहे आणि माझ्याच जोडीदारात कमतरता आहे अशी तुलना करून तुम्ही हाताने तुमच्या नात्याला चुकीच्या वळणावर नेऊन संपवण्याच्या दिशेने प्रवास करत असतात. त्यामुळे जेवढे मतभेद तितकी एकमेकांबद्दल अंडरस्टैंडिंग ‌वाढवायला हवी. एकमेकांच्या मतांचा आदर करायलाच हवा आणि प्रेम एकत्र मिळून होणारी गोष्ट आहे, जपायालाही दोघे लागतात.

हो ला हो करण्यापेक्षा मत मांडणारा हवा, वाद कितीही झाले तरी नातं टिकवणारा हवा.

– पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *