स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवायला शिकायला हवं! सगळी प्रोसेस समजून उमजायला वेळ जातो. आयुष्य आपल्याला तेवढा वेळही देतो, फक्त एखादा क्षण विसावा घेऊन आपल्या भावना समजून घ्याव्या. तर तुम्ही म्हणाल अचानक हा काय विषय ?
तर मला गेल्या काही दिवसात हा प्रश्न टिनेज त्याचबरोबर चोविशी पार करणाऱ्यांकडून विचारला जात आहे. समोरच्याच प्रेम आहे की नाही कळत नाही. तो/ ती नीट रिस्पॉन्स देत नाही. हा सगळा अट्टाहास का चालला याचाही अर्थ लागत नाही. तो / ती स्वतःहून प्रेमाचा विषयही काढत नाही. ऑनलाईन असून रिप्लाय देत नाही. वेळ असून वेळ नसल्याची कारणं सांगतो. एकाच बाजूने किती समजून घ्यावं? तुला काय वाटतं मी काय करावं? तेव्हा त्यांना सगळ्यांना उद्देशून सांगावं वाटतं, जे सहज वाट्याला येतं ते पूर्ण जगून घ्या! उगाच ओढाताण करूनही जर माणूस जवळच येत नसेल तर का ही उठाठेव?. जिथे तडजोड करावी लागते तिथे प्रत्येकवेळी वाहवत जाण्यात अर्थ नाही. अर्थात प्रेम म्हटलं की भावना आल्या. आपण भावनेच्या भरातच प्रेम करत असतो, त्यात वाहवत जात असतो. पण या गेल्या दोन तीन वर्षात मी अशा माणसांना भेटले जिथे दोन जोडीदारांपैकी एकजण खूप सिरियस ट्रेडिशनल नीतिमूल्ये जपून प्रेम करणारा असतो, त्याउलट दुसरा खूप मॉडर्न प्रेम करतोय. या आताच्या पिढीचा प्रोब्लेमच तो झाला आहे. पिढीत होणारे प्रचंड उलथापालथ घडवून आणणारे बदल पिढीला तळ्यात मळ्यात करताय. सोलोगमी, हुकअप्स, वन नाईट स्टँड, गे-लेस्बिअन प्रेम, फ्रेंड्स विथ बेनिफिट मैत्री अशा आणि अनेक प्रकारच्या प्रेमाचा परिचय आणि वाढ या पिढीत झाली आहे. त्यामुळे एवढे ऑप्शन्स समोर येताना आपलं प्रेम नेमकं कोणतं, कसं असायला हवे आणि प्रेम व्यक्त करण्याचे असंख्य प्रकार समोर येत असल्यामुळे खूप गोंधळ उडाला आहे. या सगळ्यात वय लग्नाच्या वयाच्या पुढे जात आहे. त्यामुळे घरून लग्नाचे प्रेशर आणि प्रेम असुनही लग्नाची शाश्वती न देणारे जोडीदार किंवा लग्नाचे प्रेशर सुद्धा नसलेले बरेच कपल्स आहेत, ज्यांना त्यांच्या त्यांच्यातच प्रेम आहे की नाही याची खात्री नाहीये. याचे कारण म्हणजे बाजारात उपलब्ध असलेले असंख्य पर्याय…पण मी का म्हटलं की भावनांवर कंट्रोल करा? कारण बऱ्याचदा याच पर्यायांमागे एकजण जातो त्याने दुसऱ्याची फरफट सुरू असते. तो एकावरच अडून असतो पण दुसरा मात्र बाजारातले सगळे पर्याय चवीने पाहत असतो. त्यामुळे आपला जोडीदार खरंच अस्खलित प्रेम करत असेल तर पुढे जा! आताच्या पिढीची एक गोष्ट मला खूप जास्त आवडते, ती म्हणजे लग्न करताना बरेच जोडपे सगळ्या गोष्टींबद्दल बोलतात. मुलगा मुलगी भविष्याबद्दल सुद्धा बोलतात. “लग्न करतोय” या मोठ्ठ्या निर्णयाची जाणीव प्रत्येकात निर्माण होतेय आणि घरात त्यांचे आई वडील आणि इतर आधीच्या जोडप्यांना पाहून आपल्याला कसा जोडीदार नको आहे हे त्यांना कळू लागले. पण या सगळ्यात जोडीदार तितका दणकट पाहिजे. प्रेमाला धरून राहणारा जोडीदार मिळाला की नात्याचं सोनं होतच. अधेमधे एकमेकांच्या आयुष्यात काय सुरू आहे याची चर्चा करावी. आपल्या जोडीदाराने आपल्याला जे सांगितलं नेमकं तेच त्याच्या रोजच्या कृतीत वागण्यात आहे ना याची खात्री पण करावी. म्हणजे उदाहरणार्थ, तुमच्या पार्टनरने सांगितले की आज हे हे काम आहे. याच्याशी बोलणं झालं. याचे फोन्स आले. तर एखाद वेळी चेक करा. सतत नको. नातं आहे, प्रेम आहे. संशय म्हणण्यापेक्षा स्वतःला सुरक्षित आणि आश्वस्थ ठेवण्यासाठी हे प्रयोग. आंधळ प्रेम करून काय मिळतं मला माहित नाही. पण ताजं, खरखुरं प्रेम करून किमान आपण स्वतःच्या भावनांना फसवल नाही हा आत्मविश्वास तरी राहतो. त्यासोबतच, एकमेकांच्या स्वातंत्र्याच्या व्याख्या काय यावर एकदा बसून बोला. कारण प्रत्येकासाठी स्वातंत्र्य वेगळं काहीतरी असते. ते व्यक्तीसापेक्ष असल्यामुळे बोलल्याने नात्यात क्लॅरिटी येते. फक्त ४-५ वर्षाच्या भेटीत त्यापूर्वी घडलेल्या आयुष्याचा पाढा नाही वाचता येत. त्यामुळे असे मेन मेन मुद्दे डिस्कस होणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःला नेहमी सांगायची की आयुष्याला इतकं पण सिरीयसली नको घेऊया, ज्याने आपण सिरियस होऊन जाऊ. इतकं सोप्पं नसतं हे सगळं. पण एखादा माणूस आपल्या आयुष्याच्या चौकटीत आणि एकंदरीत चुकीचा वाटत असेल तर तिथे हळूहळू स्वतःच्या भावनांना आवर घाला. एकदा वाहवत गेला तर तशीच सवय लागून पुन्हा पुन्हा या मोहात अडकून तिथेच सुरू होतो आयुष्याचा बळजबरी प्रवास… जे नाही आवडत ते नाहीच आवडत. त्यामुळे दोघेही हेल्दी रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी आपण मनाशी
स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवायला शिकायला हवं!
सगळी प्रोसेस समजून उमजायला वेळ जातो. आयुष्य आपल्याला तेवढा वेळही देतो, फक्त एखादा क्षण विसावा घेऊन आपल्या भावना समजून घ्याव्या. तर तुम्ही म्हणाल अचानक हा काय विषय ?
तर मला गेल्या काही दिवसात हा प्रश्न टिनेज त्याचबरोबर चोविशी पार करणाऱ्यांकडून विचारला जात आहे. समोरच्याच प्रेम आहे की नाही कळत नाही. तो/ ती नीट रिस्पॉन्स देत नाही. हा सगळा अट्टाहास का चालला याचाही अर्थ लागत नाही. तो / ती स्वतःहून प्रेमाचा विषयही काढत नाही. ऑनलाईन असून रिप्लाय देत नाही. वेळ असून वेळ नसल्याची कारणं सांगतो. एकाच बाजूने किती समजून घ्यावं? तुला काय वाटतं मी काय करावं?
तेव्हा त्यांना सगळ्यांना उद्देशून सांगावं वाटतं, जे सहज वाट्याला येतं ते पूर्ण जगून घ्या! उगाच ओढाताण करूनही जर माणूस जवळच येत नसेल तर का ही उठाठेव?. जिथे तडजोड करावी लागते तिथे प्रत्येकवेळी वाहवत जाण्यात अर्थ नाही.
अर्थात प्रेम म्हटलं की भावना आल्या.
आपण भावनेच्या भरातच प्रेम करत असतो, त्यात वाहवत जात असतो.
पण या गेल्या दोन तीन वर्षात मी अशा माणसांना भेटले जिथे दोन जोडीदारांपैकी एकजण खूप सिरियस ट्रेडिशनल नीतिमूल्ये जपून प्रेम करणारा असतो, त्याउलट दुसरा खूप मॉडर्न प्रेम करतोय.
या आताच्या पिढीचा प्रोब्लेमच तो झाला आहे. पिढीत होणारे प्रचंड उलथापालथ घडवून आणणारे बदल पिढीला तळ्यात मळ्यात करताय.
सोलोगमी, हुकअप्स, वन नाईट स्टँड, गे-लेस्बिअन प्रेम, फ्रेंड्स विथ बेनिफिट मैत्री अशा आणि अनेक प्रकारच्या प्रेमाचा परिचय आणि वाढ या पिढीत झाली आहे.
त्यामुळे एवढे ऑप्शन्स समोर येताना आपलं प्रेम नेमकं कोणतं, कसं असायला हवे आणि प्रेम व्यक्त करण्याचे असंख्य प्रकार समोर येत असल्यामुळे खूप गोंधळ उडाला आहे.
या सगळ्यात वय लग्नाच्या वयाच्या पुढे जात आहे. त्यामुळे घरून लग्नाचे प्रेशर आणि प्रेम असुनही लग्नाची शाश्वती न देणारे जोडीदार किंवा लग्नाचे प्रेशर सुद्धा नसलेले बरेच कपल्स आहेत, ज्यांना त्यांच्या त्यांच्यातच प्रेम आहे की नाही याची खात्री नाहीये.
याचे कारण म्हणजे बाजारात उपलब्ध असलेले असंख्य पर्याय…
पण मी का म्हटलं की भावनांवर कंट्रोल करा? कारण बऱ्याचदा याच पर्यायांमागे एकजण जातो त्याने दुसऱ्याची फरफट सुरू असते. तो एकावरच अडून असतो पण दुसरा मात्र बाजारातले सगळे पर्याय चवीने पाहत असतो. त्यामुळे आपला जोडीदार खरंच अस्खलित प्रेम करत असेल तर पुढे जा!
आताच्या पिढीची एक गोष्ट मला खूप जास्त आवडते, ती म्हणजे लग्न करताना बरेच जोडपे सगळ्या गोष्टींबद्दल बोलतात. मुलगा मुलगी भविष्याबद्दल सुद्धा बोलतात.
“लग्न करतोय” या मोठ्ठ्या निर्णयाची जाणीव प्रत्येकात निर्माण होतेय आणि घरात त्यांचे आई वडील आणि इतर आधीच्या जोडप्यांना पाहून आपल्याला कसा जोडीदार नको आहे हे त्यांना कळू लागले.
पण या सगळ्यात जोडीदार तितका दणकट पाहिजे. प्रेमाला धरून राहणारा जोडीदार मिळाला की नात्याचं सोनं होतच.
अधेमधे एकमेकांच्या आयुष्यात काय सुरू आहे याची चर्चा करावी.
आपल्या जोडीदाराने आपल्याला जे सांगितलं नेमकं तेच त्याच्या रोजच्या कृतीत वागण्यात आहे ना याची खात्री पण करावी. म्हणजे उदाहरणार्थ, तुमच्या पार्टनरने सांगितले की आज हे हे काम आहे. याच्याशी बोलणं झालं. याचे फोन्स आले. तर एखाद वेळी चेक करा. सतत नको. नातं आहे, प्रेम आहे. संशय म्हणण्यापेक्षा स्वतःला सुरक्षित आणि आश्वस्थ ठेवण्यासाठी हे प्रयोग.
आंधळ प्रेम करून काय मिळतं मला माहित नाही. पण ताजं, खरखुरं प्रेम करून किमान आपण स्वतःच्या भावनांना फसवल नाही हा आत्मविश्वास तरी राहतो.
त्यासोबतच, एकमेकांच्या स्वातंत्र्याच्या व्याख्या काय यावर एकदा बसून बोला. कारण प्रत्येकासाठी स्वातंत्र्य वेगळं काहीतरी असते. ते व्यक्तीसापेक्ष असल्यामुळे बोलल्याने नात्यात क्लॅरिटी येते.
फक्त ४-५ वर्षाच्या भेटीत त्यापूर्वी घडलेल्या आयुष्याचा पाढा नाही वाचता येत. त्यामुळे असे मेन मेन मुद्दे डिस्कस होणं गरजेचं असतं.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःला नेहमी सांगायची की आयुष्याला इतकं पण सिरीयसली नको घेऊया, ज्याने आपण डोक्याने सिरियस होऊन जाऊ. इतकं सोप्पं नसतं हे सगळं. पण एखादा माणूस आपल्या आयुष्याच्या चौकटीत आणि एकंदरीत चुकीचा वाटत असेल तर तिथे हळूहळू स्वतःच्या भावनांना आवर घाला. एकदा वाहवत गेला तर तशीच सवय लागून पुन्हा पुन्हा या मोहात अडकून तिथेच सुरू होईल आयुष्याचा बळजबरी प्रवास… जे नाही आवडत ते नाहीच आवडत. कारण कुठल्याही हेल्दी रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी आपण मनाशी पारदर्शक असणं गरजेचं आहे.
- पूजा ढेरिंगे