शोध शांतीचा

  • by

ज्यावेळी आपण खूप शांत असतो तेव्हा आपल्याला आजुबाजूच दुःख दिसत जातं. अचानक फिल होतं की जमाने में बहुत गम हैं।
सगळ्यांना आधार द्यावा वाटतो. सगळे खूप एकटे वाटू लागतात. त्यांच्या तग धरून राहण्यामागाचा साफ हेतू कळू लागतो.
त्यांनी कधीच सोडून दिलेली असते आशा की कोणीतरी आपलीही विचारपूस करेल.
तेव्हा सहजच “कसा आहेस/ कशी आहेस तू? किंवा ठिक आहेस ना तू?” हे दोन प्रश्न एखाद्याला ढसाढसा रडवून शांत करू शकतात.
एखाद्याचं वादळ शमवू शकतात. एखाद्याला जगण्याचं निमित्त देऊ शकतात.
आत्ता या क्षणाला या जगात असंख्य एकटी लोकं आहेत. ज्यांच्या आजूबाजूला भरभक्कम आपली माणसं आहे. पण तरीही त्यांना त्यांचं दुःख व्यक्त करता येत नाही. एकटेपणा वाटता येत नाहीये. कसं असतं ना, माणसाला आंतरिक शांती हवी आहे पण एकटेपणा आहे त्यातून मिळणारी शांती नकोय!
मी नेहमी म्हणते, माणूस माणसाच्या प्रेमाचा भुकेला असतो.
हे प्रेम दरवेळी योग्य वेळेला मिळतंच असं नाही.
अशावेळी आपल्यालाच आपला सोबती बनावं लागतं. स्वतःला सांगावं लागतं, “इथपर्यंत आयुष्याला घेऊन आलीस, यापुढेही करशील. तेवढी ताकद तुझ्यात आहे.”
जेव्हा स्वतः शांत व्हाल, तेव्हा तुमच्या सारख्याच नाजूक क्षणात अडकेलेल्या, असुरक्षित वाटणाऱ्या कुठल्यातरी माणसाला अजिबात जज न करता त्या क्षणापुरते त्याचे सोबती बना! हे सगळ्यात मोठं पुण्य असतं. मनाची भाषा वाचता आली की माणसं जोडली जातात.
आपण तितके मच्युअर झालोय की, आयुष्य आज आहे, तर उद्या नाहीये कळलंय. मग यातच जर आज एखाद्या मरणाऱ्याला जगवले तर किमान जगल्याचे समाधान मनात राहील आणि त्याने तुमचाही आजचा दिवस सुखात जाईल. त्यासाठी आधी स्वतःला शांत करा आणि त्यातून वेळ काढून इतरांच्या वाईब्ज ओळखा! मिळून एकमेकांच आयुष्य सोपं करा !
हा माझा मार्ग, माझी फिलॉसॉफी आहे, स्वतःला शांत करण्याची, तुमची कोणती आहे?

  • पूजा ढेरिंगे.
Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *