परदेशी पक्षांची उजनीत सैर !

  • by

खूप दिवसांच्या सुट्टीनंतर हा ब्रेक मिळत होता. भिगवानच्या कुंभारगाव येथील परदेशी फ्लेमिंगोच्या आगंतुक भेटीला जाण्याचा आमचा कॉलेजच्या दोस्तांचा प्लॅन ठरला. परदेशी पक्ष्यांची डिसेंबर ते मार्च ४ महिने उजनी जलाशयात वार्षिक ट्रिप तशी आमचीही ट्रिप ठरली!
कॉलेज सुटलं की सगळे तुुटक होता याला आम्ही अपवाद होतो. ठरलं आणि निघालो, इतकं सहज होतं.
तीच जुनी कॉलेजच्या दिवसांतील थंडी, हिरव्या नारळाच्या उंच झाडांच्या फटीतून हळूच येणारी धुक्याची कुजबुजित रांग मनाला गुबगुबीत खुश करत होती.
हडपसरपासून आम्ही फ्लाईंग बर्ड पाहण्यासाठी सोलापूरच्या उजनी धरणाच्या भिगवन येथील क्रांती फ्लेमिंगो या पॉईंटला पोहचत होतो.

लांबसडक पाय, लालसर चोच, पांढरशार लाल रंगाची पाठ  आणि लांबसडक मान या आकर्षक रंगाचा फ्लेमिंगो बघण्याची भलतीच ओढ लागली होती. फ्लेमिंगोला रोहित पक्षी, अग्निपंख,पांडव असेही म्हणतात. ते साइबेरियामधून कच्छमध्ये येतात. ते व्ही आकारात उडतात, त्यांचा प्रत्येक पाच मिनिटाला नेतृत्व करणारा लीडर बदलतो. ते एका वर्षात एकाच पिल्लाला जन्म देतात. शेवाळामधील अळी खाऊन त्यांच्या पंखांना कलर येतो. म्हणून त्यांना अग्निपंख म्हणतात. त्याची उंची ४ फूट असून त्याच्या चोचीत ३ फिल्टर आसतात. तो एकमेव पक्षी जो अन्न फिल्टर करून खातो. तो १७ ते १८ वर्ष जगतो. तसेच फ्लोमिंगो पक्षी हे हजारो किलोमीटरचे अंतर पार करून येतात. त्यांना आपल्याकडील पाण्याची आवश्यकता असते, इथे येऊन चांगले अन्न, हवामान आणि पाणी मिळाले तरच ते परतून प्रजनन करू शकतात. ही प्राथमिक माहिती दैनंदिन आयुष्यात नावीन्य आणणारी होती, आमचा प्रवास सुरु होता.

खूप दिवसांच्या कामाच्या व्यापातून थोडीशी फुरसत काढून निघालेले आम्ही पीच्चरसारखं आधी डिजे गाणे लावून तुझ्या रूपाचं चांदणं पडलय मला भिजुद्या म्हणत म्हणत तुझ्या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली करत करत चिडवून सर ओसरत बेखयाली, तुमसे मिलने को दिल करता हैं रे बाबा, तुम्हें दिल्लगी भूल जानी पड़ेगी, आफरीन अफ़रीकडे ओढा जात सगळ्यांची मनं बाहेरचा निसर्ग मनावर ओढून घेत होते.
थोडासा पाण्याचा ओढा दिसला तरी मन उचंबळून येते, उजनी म्हणजे या सगळ्याचा संग्रह तिथे मन सुखावून जाते नि स्थिरावते.
अशा वातावरणात दुपारी तीन वाजता तिथे पोहोचल्यानंतर तिथून पुढचे तीन तास आम्ही बोटीने फिरणार होतो.

रोहित काळे हा यांत्रिक बोट चालक आमचा गाईड बनून आम्हाला त्याच्या ज्ञानाने, त्याच्या सजग डोळ्यांनी त्या परदेशातून आलेल्या पक्षांची माहिती देणार होता. त्यांनी सांगितल्या प्रमाणे यावर्षी परदेशातून जवळपास ३० नव्या प्रजाती स्थलांतरित झाल्या आहेत. दरवर्षी शंभरीचा आकडा पार करणारे परदेशी पक्षी यावर्षी बेसुमार पावसामुळे जलाशयाची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यामुळे कमी प्रमाणात आले आहेत. त्यातील काही पक्षी अन्नाच्या शोधात इजिप्त, आफ्रिका, ऑस्टेलिया, सायबेरिया, युरोप, जपान, रशिया, अमेरिका, पाकिस्तान, इंडोनेशिया, कोलंबिया, मंगोलिया, लदाख, राजस्थान,भरतपूर, गुजरात, कच्छ, गिर, गुहाघर, चिपळून या ठिकाणाहून आले आहेत.

उजनी जलाशय दलदलीचा असल्यामुळे आणि पाण्याची पातळी उथळ असल्यामुळे या परिसरात पक्ष्यांचे थवे येण्यास पसंत करतात. यामुळे पर्यटनाला चालना मिळत असून बोटीच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. परंतु पाणी कमी असल्याने स्थानिक पक्षी व स्थलांतरित पक्षी यांच्यामध्ये अन्नासाठी स्पर्धा चालते. धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे फ्लेमिंगो पक्षांची संख्या कमी असली तरी इतर पक्षी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत.

त्यामध्ये,
मार्श हॅरियर- दलदलीत ससाणा. हा घाटी भागातून येतो. मासे, पक्षांची पिल्ले यांचे अन्न हिसकावून खातो. तो ७ ते ८ वर्ष जगतो.

मार्श हॅरियर

नॉर्दन शॉहलर- बदक. तो शेवाळ आणि छोट्या गोगलगाय खातो. हे पक्षी नेहमी थव्याने राहतात. त्याचे आयुष्य ५ ते ६ वर्ष असते.

नाॅर्दन शाॅहलर

रफ- आफ्रिकेच्या समुद्र किनाऱ्यावरून येतो. गवताच्या काड्या खातो. गर्भधारणेच्या वेळेस रफला मानेच्या खाली तुरा येतो. रफ हा दिसायला सर्वात सुंदर पक्षी असून त्याचे जीवनमान ४ ते ५ वर्षाचे असते.

रफ

रंगीत करकोचा: याच्या चोचीत एकावेळी ४०० ग्राम अन्न बसते, तो त्याच्या पिलासाठी ३० किलोमीटर जाऊन चारा आणतो.
हळदी कुंकू: या पक्षाच्या जोडीतील एक पक्षी मेला तर दुसराही मरतो.

लेपर्ड गेको- रंगीत पाल चित्याच्या कलरसाऱखी दिसते म्हणून लेपर्ड गेको म्हणतात. त्यांना पापण्या नसतात. ते जिभेने तोंड साफ करतात. नाकतोडे, मुंग्या, अळ्या, किडे खातात.

लेपर्ड गेको

राजहंस- हे मंगोलिया देशातून येतात. डोक्यावरती तीन बार असल्यामुळे यांना पट्टकादम म्हणतात. याची ख्याती आपल्या देशात अधिक लोकप्रिय आहे, दूध आणि पाणी एकत्र करून दिल्यास तो दूध वेगळे करून पिऊन घेतो. हा पक्षी जगातील सर्वांत उंच उडणारा पक्षी असून तो हिमालय पार करून येतो. शेकडोंच्या झुंडीने राजहंस स्थलांतरित होतात. यांचे आयुष्य हे १३ ते १४ वर्ष असते.

राजहंस

ओपन बिल- अडकीत्ता किंवा गोगलफोड्या म्हणतात. ओपन
सुपारीसारखी गोगलगाय फोडून खातो म्हणून आडकित्ता असे म्हणतात. हा पक्षी आशिया खंडातून येतो. त्यांचे जीवनमान १० ते १२ वर्ष असते.

ओपन बिल

पेरिग्रीन फाग्लन- भैरी ससाणा
रशियामधून गुजरातला कच्छ मध्ये येतो, तेथून भिगवणला येतो. जगातील सर्वात जास्त वेगाने उडणारा पक्षी असून तो अन्न पान टिलवा/ढांगाळ्या खातो. तो शिकार नेहमी सकाळच्या वेळेत करतो. त्याचबरोबर माळरान पक्षांमधे लााल चिमणी आढळते.

पेरिग्रीन फालकन
रेड मोनिया (लाल चिमणी)

आमच्या गाईडबरोबर मोकळेपणाने बोलल्यानंतर तो पर्यटकांच्या गमती जमती आणि त्याचा या काळातील अनुभव सांगू लागला. तो म्हणाला, पर्यटकांना आनंद देणे हा माझा आवडता वेळ असतो. ज्यामुळे मला रोजगार मिळतोच पण मला आवड असलेल्या क्षेत्रातून मी इतरांना आनंद देतोय याचे समाधान असते. पक्ष्यांची परप्रांतियांकडून होणारी शिकार, धरणाजवळील वाळू काढण्याचे हे येथील निसर्गाला धोका असून याची काळजी फॉरेस्ट कडून घेतली जावी, असे मनापासून वाटते. कारण हे सगळं माझं घरच आहे.  माझे शिक्षण सातवीपर्यंत झाल्यामुळे मला पुढील उच्च शिक्षणाची ओढ असलो तरीही माझ्याकडे कॅनन कॅमेरा आहे. कॅमेराच्या लेन्सला दुर्बीण करून मी त्यातून प्रत्येक ऋतूतील पक्षांचे आगमन टिपत असतो. आतापर्यंत या पक्षी प्राण्यांच्या सानिध्यात राहून आणि त्यांना कॅमेरात कैद करून मला १३ गोल्ड मेडल्स मिळाली आहेत. राहुल कडून वरील चित्रांचा खजिना घेऊन आम्ही परतीच्या
प्रवासाला निघालो. असा हा कॉलेजच्या मित्रांबरोबर अनोखा प्रयोग करून नवा अनुभव घेण्याचा अनुभव नवीन दृष्टी देऊन गेला.

“डोळ्यांच्या उघडझापेतून शटरसारखे दिसत जावे एखाद दोन म्हणत अनेक पक्षी, तेव्हा त्यांच्या गतीतून मिळणाऱ्या सुखाला अनुभवून स्वतःचाच हेवा वाटू लागतो.”

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *