प्रेमाचा सुवास!


प्रेमातल्या आकर्षणाच्या स्पर्शाचा जगलेला एक दरवळ घेऊन येते माघारी घरला. दोघांतल्या कैक मौलवी क्षणांचा गुलाब घेऊन येते घरी! एकदा नाही प्रत्येकवेळी हेच करत राहते मी… मी फुलापेक्षा त्याचा सुवासच घेऊन येते माघारी !

का कधी कुठला सोबती, सोबतीला असतो पूर्णवेळ?
का मी तरी असते त्याच्या रोजच्या आयुष्याच्या प्रवासात हो? वाट दोघांनी भरताना नात्याच्या फुलाला पायदळी घेण्यापेक्षा सुवास मिठीत ठेवतो दोघे… !

रोजचा सवयीचा पर्फुर्म दरवळत रहावा, तसा त्याचा दरवळ ठेवते हृदयाच्या कुपीत…
मी कुठे वाहवत जाते प्रेमात, ‘कुठे सवयीला तोच हवा सारखा’ हा हट्ट पूर्वीसारखा करतेय?

प्रेमाचं वय वाढलंय, वय झालं नाहीये मान्य!
मोठं होत अडकलंय नात्याचं फुल जबाबदाऱ्यांत …
त्यामुळे जबाबदाऱ्यांच्या दिवसांत मी सवय सुवासाची करून घेतलीय, त्यानेही केलीच असणारे का?
आठवणीला सहवासाचं अत्तर शिंपडून माझा मोह जगते मी!
म्हणूनच फुल तर शक्य नाही, फुल नकोही असतं. फुलापेक्षा त्याचा सुवास दरवळत ठेवून दोघे येतो माघारी !
सुवास संपला की पुन्हा सहवासाचा मोगरा वाटायला यायचं पुन्हा एकत्र,
पुन्हा लयलूट करून जगायचा प्रेमाचा नवा सोहळा नि न चुकता याही वेळी घेऊन यायचा सुवास स्पर्शाचा…!

  • पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

2 thoughts on “प्रेमाचा सुवास!”

  1. Pingback: एकांत अन् एकटेपणा... -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *