मैत्रीत प्रेम!

  • by

मी सहज बोलते आजकाल. जास्त लडिवाळ नसतं काहीच, ना उगाचच सांभाळणं असत … तो मला पाणी पिण्याचे फायदे विचारतो मी त्याला सांगते …
त्याच्यासाठी मी कोण? …
माहीत नाही …
पण मी त्याला मनाच्या चौकटीत कुठे बसवू कळत नाही.
.

.
त्याला बसवायला तो काय चौकोन आहे …?
देवाssss नाही हां ….ते मनात बसव, हृदयात बसव वगैरे म्हणू नकोस ..
साउंड्स स्टुपिड….
हे असलं फक्त सिनेमातल्या क्लाइमॅक्सला रंगवायला लिहिता…
आता तूच सांग त्याला मनात बसवायला इतका का छोटाय तो ??
.
.
ओह्ह्ह्ह…. ते अस भावनेत वगैरे लिहितात ?
ए मग भावनेत लिहिलं की प्रेम होतं ? मग मनात बसवल की तो आपला होतो ? म्हणजे आता जर मी कवी बिवी होऊन लिहिलं, तर तो माझ्या मनाच्या घरात आलाय आणि मी त्याला बसवून कुलुप लावून घेतल तर? म्हणजे तो कायमचा माझा? असंच काहीस का ?
अरेच्चा कित्ती सोप्पंय हे ! मला उगाचच वाटायचं , प्रेम करणं अवघडै वगैरे ..
.
.
देवा महान आहेस हो ! या माणसांनाही तूच घडवलय विश्वास पटलाय बर …ऐकतोय ना ?
“म्हणे मनात बसव …”
.
बर ठीके …. तू एवढं म्हणतोच आहेस तर करून बघते.

बसवलं मनात….. आता पुढे ?
.
.
काय? डोळे झाकून त्याला आठवायचं ? नि मग त्याला फिरायला घेऊन जायचं? …. म्हणजे आधी त्याला मनातून काढायच ?………
हे म्हणजे घराचं कुलुप उघडून त्याला फेरफटका मारायला घेऊन जाणं झालं …
छे! मला नाय जमायचं …
म्हणे त्याला आठवायच नि अस समजायचं तुम्ही दोघे छान फिरायला गेले आहेत …
अरेय त्याला काय त्याच त्याच जाता येत नाही ?
.
.
बर ठीके आणलं फिरायला मग?

.
.
.
.
.
.
आणि मग हळूच डोळे उघडायचे ……
हॉ… इश्यSsssss
दस्तुरखुद्द ‘तो’ समोर उभा ……
बाकी काही सांगायलाच नको….लाजेपासून माफीपर्यंतचे सगळेच भाव एकसकट डोळ्यातून असे भरभर तरळून गेले नि मनाने पक्क केलं ,आतापासुन ‘त्याला कुठेच न बसवलेल बरं’

तरी परत मनाने ठिणगी टाकली
‘प्रेम …?’

‘नाही मैत्रीच्याच चौकोनात बसवते..’

‘पण मैत्रीच्या चौकोनात बांधलं तर प्रेम होईल,
आणि प्रेमाच्या चौकोनात बांधलं तर मैत्री संपेल …?’ प्रश्नचिन्ह कायम होतं.

देवआआआ …… वाचव रे !

हां आयडिया
“…. आहे तिथेच नि तसंच ठेवते ….” असंही करण जोहर सांगतोच, प्यार दोस्ती हैं, दोस्ती प्यार हैं|

“अरेच्चा कित्ती सोप्पंय हे ! मला उगाचच वाटायचं अवघडै वगैरे ..”

मनाला हा असा निराधार आधार देऊन एक स्मित करून बंद केला ‘घुटमळणाऱ्या गडबडलेल्या भावनांच्या विचारांचा कप्पा.’हसत हसत….

क्योंकी हर दोस्ती मोहब्बत नहीं होती जनाब, कुछ मोहब्बतें दोस्ताना निभाकर जीने पड़ते हैं।

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *