कम्फर्टझोनमधून बाहेर पड…!

  • by

मादक आहेस, मोहक आहेस, सेक्शुअल ऑब्जेक्ट आहेस…
तू सुंदर आहे, तू रेखीव आहे, कोरीवही आहे… दुय्यम.
पूर्ण आहेस, स्पष्ट आहेस, आत्मविश्वासू आहे हे प्रथम!

सौंदर्यापलीकडे ‘जे छान आहे ते तुझं करून घे!’ 
तू अडकत जाते तुझ्या परिस्थितींमध्ये.
भीतीला तू जरा नाकारायला शिक !
जुन्या रस्त्यांचा पाया ठेव, पण वाट त्याला तुझी जोड!

पुरुषांसारखं जगायचं ही तुलना तू सोड,

तुला आझाद वाटेल अशी जगायला लाग!
तडजोड ही वाईट गोष्टींबाबत ठेऊ नकोसच, बजावतेय समज.!
कारण ‘छान’ची जागा जेव्हा तडजोड घेईल, सवय तुला होत जाईल.
त्यामुळे तू घसरत जाशील या गाळात.
त्यामुळे ठामपणे स्वच्छ प्रवाहाचा तू भाग बन !

छोटी रहा, सीमित रहा, मर्यादित रहा,
पण स्वयंप्रकाशित स्वच्छ रहा !

ताकद तुझ्या पायांत आहे, पैंजणात आहे, डोळ्यात भरलेल्या त्या घट्ट काळजात आहे!

एक कटाक्ष टाकण्याचा उशीर आहे…
गळ्यात सेक्शुअल ऑब्जेक्ट झाकणाऱ्या तुझ्या ओढणीत आहे,
ती समोरच्याच्या गळ्यात अडकण्याचा उशीर आहे.
तशी ती मनगटाच्या जोडीला तुझ्या बांगड्यांत आहे,
ते मनगट एखाद्याच्या मानगुटीवर आवळण्याचा उशीर आहे.!
हो, ती वेणीला माळलेल्या गजर्याच्या दोऱ्यातही आहे,
त्या दोऱ्याने त्याच्या नरडीच्या तिथे करकचून मागे खेचायचा उशीर आहे!
तीच ताकद कानातल्या डुल्याच्या टोकदार दावणीत आहे,
त्या तारीने ओरडबडायचा किंवा त्याच्या उघड्या भागाला,
नाहीतर सरळ त्याच्या लिंगाला ओरडबडायचा उशीर आहे …
त्यासाठी स्वतःची ताकद ओळख.!

सौंदर्यात मढवून ताकद तुझी बांधून ठेवली म्हणे…
आता या सगळ्या सौंदर्याच्या तारांनीच तू सजही नि त्याचा वापरही कर!
वापर कर चांगल्यासाठी, तुझं वाईट होताना ते चांगलं करण्यासाठी !
या सगळ्याची ताकद तुझ्या कणाकणात आहे.

तू स्वतःला सतत सांगत रहा, तुला नेमकं काय हवं आहे.
जाण याची तू स्वतःला करून दे !

 तुझ्या कम्फर्टझोनमधून बाहेर पड! आव्हानं आहे पण वैयक्तिक आहेस या लढाईत याचा आनंद तुला असेल.
जन्म घेताना झगडून, नंतरही कसनुसं जगून मरायचं असेल तर, जगू नकोस स्पष्ट आहे. 

या पायांना हे असं जखडून ठेवण्यापेक्षा, पूर्वापारच्या बेड्यांना तू जिद्दीने तोडून टाक!
नि हे जखडलेले परंपरेच्या रक्तात माखलेल्या पायांतच ताकद आण, हवं तसं आयुष्य जगण्यासाठी !
रक्तबंबाळ तावदानांतून तू तुझ्या स्वप्नांना त्यांचं आकाश दे, आणि मुक्त हो ! 
स्वतःसाठी निदान… ?

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *