मी- काय बोलु.? काय बोलु.? … हाय बोलु.? हॅलो ? की मग फक्त एक स्माइली टाकु.? की मग हाय बोलून स्माइली टाकु.?
हश्ह्ह्ह… मला काहीच समजत नव्हतं. पुरती चलबिचल, धांदल, गडबड, थरथर सगळं एकदाच….
हां… पाण्याचा घोट घेतला नि ठरवलं कि हॅल्लोच लिहिते… तितक्यात फोन वाजला …
त्याचा फोन होता तो. ओ माय गॉड…
तो – हॅलो
मी – हॅलो.?
तो – कशी आहेस…. ?
मी – (मनातल्या मनात) यावर तर बरी आहे, ठीक आहे, मस्त आहे की मग मजेत.? काय उत्तर देऊ.? की सरळ सरळ विचारून टाकु, का फोन केला म्हणून … नाही, नको …
तो – ते जाऊदे सगळं “मला सांग कुठे आहेस आत्ता. ?”
“हेलो?”
मी – हं…? मित्राबरोबर…
तो – काही प्लान आहे का पुढे.?
मी – नाही…
तो – मी येतोय. नेहमीच्या ठिकाणी भेट. नो एक्सक्यूझेस… बाय.
“काय पटापट बोलून गेला हा.. बस्स.? मी गारठले होते. अंगात सनसनीत झणक गेली होती, त्याच्या त्या अनपेक्षित शांत शब्दांनी.
मी जाऊ की नको.?
नाहीतर मेसेज टाकते, काम आहे आज नक्कोच भेटायला… पण भेटावसही वाटतंय.
आज तब्बल ४ महिन्यांनी त्याने फोन केलाय, नक्कीच काहीतरी काम असणार. सोबत नीशाही असेल ? सुंदर दिसते तशी … दोघे सोबत छान दिसतात, नाही? ओह काम ऑन आयशा, स्टॉप थिंकिंग टू मच…” मी स्वतःलाच समजावलं.
“एनी प्रॉब्लेम?” मित्राने विचारलं.
मी – नो नो, नॉट एट ऑल…
फोन कट झाला होता. मी काहीच बोलले नव्हते, कारण आजचा हा फोन नि त्यानंतर आमच्यात झालेलं संभाषण… नात्याच्या आतापर्यंतच्या सहवासात पहिल्यांदा जाणवलं, की आज त्याला माझी गरज आहे.
तो आला. मी पाहीलं.
माहीत नाही का, पण आज पहिल्यांदा सोबत असलेल्या मित्राला मी ‘मीठी मारुन बाय’ केलं. तो बघतच होता.
माझं मन आज चक्क शांत होतं एकदम गार. जे हृदयाचे ठोके त्याला बघून धडधडायचे ते आज जणू नव्हतेच. शर्ट तर तोच घातलाय, पहिल्या भेटीचा. पर्फ्युर्मही तोच, माझा आवडता. स्पाइक्स, स्टॅंड कॉलर, ब्लॅक शर्ट बस्सच… याआधी तर कद्धि असं झालं नाही .? काही हवंय का याला.?
ती सोबत दिसत नाहीये … काही गडबड तर नसेल?
मला पाहून तो हसला. मला खोटं हसावं लागलं.
चार बाय सहाच्या खोलीत जितकं गुदमरत नाही तितकी घुसमट त्या एसी गाडीत होत होती. कारण, काहीही झालं तरी आज पहिल्यांदा समोरासमोर भेटुन ‘माझं प्रेम संपलंय’ हे त्याला दाखवायचं होतं. आणि यावेळी ते गरजेचही होतं. अवघड होतं.?
नाही… बिलकुल नाही …
गाडी सुरू झाली,पण संवाद मात्र नव्हताच.
एकदा अनक्म्फर्टेबल नजरा नजर झाली, नाही झाली नाही ती मुद्दाम केली, त्यानेच पण मी टाळली किंवा मुद्दाम टाळली त्यानेही…
२० मिनिटांचा वेळ गेला, आम्ही दोघेही शांत होतो. इतके शांत की आवाज होता, फक्त एसी नि रेडियोच्या ‘आपकी मुलाक़ात’चा.
तो – गाणं बदलू…? नाही तर तूच लावते का एखादं.? असंही तुला माझी प्ले-लिस्ट आवडत नाही ना ….
मी – हां 🙂 …. (स्वत:च्या मनातला गोंधळ बाजूला ठेवून ढवळलेल्या मनाला स्तब्ध दाखवत, मनाला समजावलं, प्रेम संपल आहे आणि ते पुन्हा होणार नाहीच. बस्स… यापुढे काहीही विचार करायचाच नाही) या तन्द्रित अजाणतेपणी मी ‘ब्रेकअप सॉँंग’ लावलं.
हश्ह्ह्ह्ह…. दोघांची नजरानजर झाली आणि एकदाची ती शांतता भंग झाली, आता मात्र दोघेही खळखळुन हसलो.
तो- तू केव्हापासून अश्शी गाणी ऐकायला लागलीस ?’ त्याने सहजच विचारलं
मी – नवाब साब, मोहब्बत क़ी थी इसलिए, मोहब्बत जी रहे थे|
अब दिल टूटा है, तो उसे भी अपने दर्द की खुशी बाटने का मौका दो||
तो – तू बिलकुल नाही बदललीस.
“मी आताही शांतच होते, खरं सांगायच तर केव्हा एकदा बडबड करते असं झालं होतं. या शांततेची बिलकुल सवय नव्हती, ना मला ना त्याला. माझा तो ठेहराव त्याला आतून खात असावा, तो तेवढा ओळखतोच ना मला ?… नक्कीच आयशा, हा काय प्रश्न झाला.?
पण मग “निशा आणि माझ्यामध्ये त्याने निशाला निवडलं, माझ्यावर प्रेम होत ना? …” तो असतानाही मी स्वत:बरोबर बोलणं अधिक पसंद करत होते …. पण तरीही कदाचित काहीतरी वाटलं असावं किंवा नाहीसुद्धा, कदाचित मी बोलावं म्हणून… म्हणूनच त्याने “लग जा गले” लावलं, माझं भयानक आवडतं गाणं.
आता मात्र माझ्या मनातल्या आठवणी, प्रेम, एकत्र घेतलेला चहा, ज्ञानप्रबोधिनीची एसपीडीपी, डाकेची दाबेली, वडापावचा चटका, डॉमीनोझचा पिझा, ऐन पावसात छत्री नसताना उडालेली धांदल, राग रुसवा, त्याचं मनवणं, चीडचीड, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक अल्हाददायी क्षण यांना ओहोटीसारखं उधाण आलं होतं. ४ महिन्यात सहन केलेला तो दुरावा, तो एकटेपणा त्या एका गाण्यामुळे मी पुरती विसरून गेले, स्वतःलाच मन म्हणत होतं जणू,
“लग जा गले के फिर ये हसीं रात हो ना हो|
शायद फिर इस जनम में ,मुलाक़ात हो ना हो ||” गाण्याचे बोल मला बोलतं करू पाहत होते. ओठांवर शब्द इतके ऊसळुन आले होते, की कोणत्याही क्षणी तोल जाऊन बाहेर पडतील. पण मग मनाने प्रश्न केला,
“आठव ती रात्र. जेव्हा तू सोबत होती, तू अडचणीत होतीस. तोही सोबत होता. हेच गाणं बाजूला चालू होतं. तो तुझा हात धरून विचारू शकत होता की “पिल्लू काय झालंय.? मला सांग बरं… मी आहे ना सोबत… ही अशी रुखीरखी परी छान नाही वाटत बघ….” पण तेव्हाही त्याला फोन आला. काळजी घे, म्हणून तो निघून गेला आणि तो गेलाच…
त्यामुळे आज तू काहीही बोलणार नाहीस हे कन्फर्म. कारण तुझं प्रेम तू मारलं आहेस, तुझ्या भावनांना तू मारलं आहेस नि ते कायमचंच.
आता कोणतीही तडजोड नाही, कारण नातं वाचवण्यासाठी जी तडजोड करत होतीस तू, ते नातंच आता उरलं नाही, मग तडजोड ती कशासाठी?”
तो – आज उपवास आहे का.?
मी – अं…?
तो – नाही, इतकी शांत तू कधी नसतेस ना, म्हणून विचारलं.
मी – हमारे चेहरें पे तो हरदम मुस्कुराहट हुआ करती थी|
शायद, हमारा वही अंदाज आपको रास नही आया|
तो – असं तुटक का गं बोलतेयंस ? बोल ना काहीतरी एकदम धाडधाड फाडफाड आधीसारखं… तुझी ही शांतता पोखरतेय मला.
“एकदा माफ कर ना!”
मी – माफी ? कशासाठी?
तो – सगळ्याच गोष्टींसाठी.
मी – कोणत्या गोष्टी.? मला काहीच कळत नाहीए…
तो – पिल्लू, तुला सगळ कळतंय. नको ना असं करुस, मला नाही ना राहता येतंय तुझ्याशिवाय….
मी – मला खरच नाही रे कळतेय, तू कशाबद्दल माफी मागतोयस.
तो – बरं मी काय करू म्हणजे तू आधीसारखं वागशील ?… सांग ना …
मी – अरे थांबव… थांबव… थांबव… घर आलं ना माझं, चल बाय, भेटू पुन्हा … 🙂
तो – तू बदललीस… इतकी की, तू शांत झालीयेस प्रचंड आणि मला त्रास होतोय त्याचा. कान तरसलेत गं तुझ ते “आज जाने की ज़िद ना करो ” ऐकायला. आज हवं तितका वेळ थांबेल, तू जा म्हटली तरी नाही जाणार, पण तू बोल गं… मी खूप एकटा पडलोय गं… काहीतरी तर बोल… प्रेम करतो गं मी तुझ्यावर…
मी – “बस्सससस्स्स्स्स्स्स हां… यापुढे एक शब्दही नकोय मला… नॉट ए सिंगल वर्ड… प्रेम ? वाह बॉस… सवयीला प्रेमाचं नाव देऊन मोकळा झालास.?
ज्याला तू प्रेम म्हणतो, ती निव्वळ एक तडजोड आहे. आपल्या या सो कॉल्ड तडजोडीला कंटाळून प्रेम कधीच लुप्त झालंय… हे जे आपण भेटलोय ते काही प्रेम म्हणून नाही, मुळीच नाही. आपण भेटलोय, कारण आपल्याला एकमेकांची सवय झालीय. तुला भीती मला गमवण्याची मुळीच नाहीए, तू घाबरतोय त्यानंतर येणार्या एकटेपणाला नि तुझा तो एकटेपणाच आज माझ्यासमोर माफी मागतोय… त्यामुळे ना….”.
पुढे बोलणारच तितक्यात फोन वाजला…” हे! कैसे हो.? बहुत दिनों बाद …” फोनवर बोलता बोलताच त्याला अलविदा केलं नि मी निघाले.
तो फोन कॉल, ते कुणाशीतरी बोलणं सगळं खोटं.
मी शरिराने घरी तर आले होते, पण मनात विचारांनी घरच्या घरं बांधली होती. आसवांची अतिवृष्टी होतानाही, का कुणास ठाऊक, पण मनाचा एक कोपरा इतका सुखावला होता की, डोकं बंद होतं नि मन तूटलं होतं तरीही तो आनंदित होता …पण का ?…. ………
आता सगळंच संपल होत… हो ना?. सगळंच ….
मग का…? रात्री रेडियोवर लागलेल्या ”आज जाने की ज़िद न करो” ऐकताना मी रडले.? का पुन्हा ‘त्याच्या नसण्याच्या’नुसत्या कल्पनेने कोलमडले आणि याहीवेळी नेहमीसारखंच माझ्या अश्रुंचा समुद्र बघण्यासाठी ती रात्र नि तिचा काळोख होता. तो नाहीच….
Jast kahi nhi pn mla as vatt ki tyala tyachi chuk samajli ahe tr tine hi tyala ek chance dyayla hawa
Ekda vel nighun geli ki kahich karta nhi yet
Saglyach love story mdhe sagal perfect Nast chuk hotach aste
Ani eka chuki mule jar lamb janyachi vel yet asel tr tya Prema Cha KY arth
Please mla as vatat tine tyala ek chance dyava
chuk ch dharun basli tr ky vupyog jar in case toch ya jagat nhi rahila tr tyachi chukich ky krnar ahes
So ahe Chance tr complete kra love story
Karan saglyana ch tyanch prem miltach as nhi…..🙏🙏
खर तर प्रेमात राहण्यासारखी सुंदर गोष्ट या जगात कोणतीच नाही
प्रेम अनुभवायला मिळणे ही दुर्मिळ गोष्ट आहे पण प्रेमात योग्य वेळी व्यक्त ही होता आलं पाहिजे
नाहीतर सर्व काही गमावून बसतो
कधी कधी मैत्री ते प्रेमाचा प्रवास सोप्पा ठरतो,अन प्रेम ते मैत्री हा प्रवास खूप कठीण आणि अशक्य असा होतो
खूप सुंदर वर्णन….
माझ्या संतापाच कारण तुच आहे,
माझ्या रुसण्यात पण तुच आहेस.
माझ्या अश्या वागण्याचं कारण विचारून
प्रेमाची चेष्टा नको रे उडवू,
माझं प्रेम खरं तर तुच आहेस…..
.
.
खूप सुंदर कथा लिहली आहेस.👌
Like!! Thank you for publishing this awesome article.