बापाची कहाणी ही केवळ जन्मदात्या बापाएवढी मर्यादित नसते..बाप कुणातही भेटू शकतो… प्रियकरात/ नवऱ्यात जेव्हा बाप दिसतो, तेव्हा ती म्हणते…
“काय आहेस तू?…
तू माझ्यासाठी कोण आहेस?…”
मी कित्येकदा विचारलं की तुला.
पण तरीही ना तुझ्याकडून समाधानकारक उत्तर आलं ना माझ्या डोक्यात ‘तू कोण आहे?’ याची स्पष्ट अशी व्याख्या मिळाली.
मी मैत्री म्हणूं की लोकांसारखे प्रेमाचं लेबल लावू?
मैत्री अन् प्रेम हे सगळ्या भावनांना पूर्ण करतात म्हणे.
तुला मी कोणत्या नात्याच्या अतूट दोर्यात बांधू?
पण तू तसा नाहियेस.
तुला बांधून ठेवावं असा.
तू नेहमीच ‘आहे” मला हवा तिथे हवा तसा.
जसा ना कोंबाला रोपटं चिकटून यावं ना तसा.
तुला मी ‘बाप’ म्हणूं का रे?
हा सगळ्यात विक धागा माझ्या आयुष्यातला.
“ज्याच्या कुशीतल्या टोपलीत शिरून डोक्यावरचं दुःख काढून ठेवावं वाटतं. “
प्रेम तुही माझ्यावर बापासारखच काळजीचं करतो.
पण तरीही तू बापासारखा कठोर वाटतं नाही.
पण बाप म्हटलं की स्वातंत्र्य येतं आणि त्या स्वातंत्र्याबरोबरच वाहत सुरक्षितता येते.
तू ते आहेस.
मुलीच्या मागे बाप असतो तेव्हा, ती तिचं स्वातंत्र्य अनुभवते कारण प्रत्येक स्वातंत्र्याबरोबर असुरक्षित कण येत असतात.
मुलीनं बिनघोर स्वातंत्र्य अनुभवावं अन् बापाने त्यामागे होईल ते सांभाळून घ्यावं.
त्यामुळे तू माझा बाप वाटतो मला.
या अशा बापावर मी अजून काय लिहू?
मला सगळ्याच ठिकाणी पडत झडत सांभाळून घेतो हा बाप.
हा शब्द मला या आयुष्यात जवळ वाटेल कधीच वाटलं नव्हतं, तू त्यातला जिव्हाळा दिलास.
मला कमीच नाही वाटली कसलीच.
“जे काही नसेल ते म्हणजे तू. ” इथपर्यंत की माझ्या प्रत्येक अडथळ्यानंतरचं उत्तर ‘तू’ आहेस आणि कधी कधी माझ्या हसण्याच कारणही आणि खूप वेळा माझ्या रडण्याच आणि चिडण्याच ठिकाणही तूच आहेस.
पण मला मोठं करणारा बाप आहेस तू…
तेरे बच्ची से ,
हृदयाच्या त्या हळव्या कोपऱ्यात लपलेल्या मुलीच्या कोवळ्या भावनेला जपणाऱ्या, मायेच्या छपराचं सुख देणाऱ्या तुला, खूप खूप मोठ्ठा थँक्यू.
कारण मला हे माहिती आहे माझ्या नजरेत आणि डोळ्यात निराशेची किरण नसावी यासाठी तू कित्येकदा बाप झालायस माझा.
बाप होणं टास्क असतो. त्यात मुलगी म्हणून मी अपयशी होते, तू पैकीच्या पैकी मिळवतोस.
मला ते कळत नाहीच.
पण मुली अशाच असतात ना अल्लड.
तू वेगळा आहेस. कुठल्याच नात्यात तुला बसवून बंद करायचं नाही मला. कारण “मी भाग्यवान आहे, तुझ्यासारखा विशाल आसमंत आहे माझ्याजवळ.”
जो माझ्या प्रत्येक कमीला पूर्ण करतो नि माझं आयुष्य स्वतःच म्हणून जगतो.
आयुष्य सुंदर असण्याचं कारण आहेस ‘तू!’
हॅपी बाप दिवस 😍😘😘😘🙌
शब्द, छायाचित्र, एडिटिंग: पूजा ढेरिंगे
Very nice as usual…👍
Thank you so much 🥰
Khup Sundar 👌😘💕❤️
खूप सुंदर लिहिलंय
खूप खूप धन्यवाद. वाचत राहा 🙂
अप्रतिम लिहीलयस….
आणि १००% खरं… खूप आतवर जाणवणारं…
Pingback: तुटलेले मन मराठी स्टेटस | broken heart status in marathi | Premachi kadar