मैत्रीचं नातं…

  • by

काही क्षण कित्ती सुंदर असतात ना… म्हणजे सहज गॅलरीमध्ये जाऊन बसावं…
थंड वाऱ्याचं येणं असावं…
बॅकग्राऊंडला एखादं सुफी गाणं चालू असावं…
हातात मोबाईल असावा…
एखादा मित्र आपल्या टाईपचा असावा…
असतात खरंतर …
टाईपचे फक्त प्रियकरच नसतात मित्रही असतात…
त्याच्याबरोबर आयुष्याचा सगळा हरिपाठ, रडगाणं, पारायण शेअर करावं …त्यानं त्याचं सांगावं …
त्यात एकाने निगेटिव्ह बोललं की दुसऱ्याने त्याला आपटू न देता उचकवत आव्हान देत पॉजिटिव्ह करत वरती आणावं….

त्यात आज बोलता बोलता विषय निघाला, माझ्या ‘ब्रेकअपचा’

मग त्याने विचारल, “भेंडी दरवेळी तुला सारखसारखं म्हणायचं का, काय झालंय …. भडाभडा बोलून मोकळं हो गं ….पुन्हां त्याच्याशी वाजलं का ?”
“हो …. आज शेवटचं… ” मी ठामपणे म्हणाले.
“हे गेल्या ४-५ महिन्यापासून ऐकतोय … चल सांग ” त्याने उचकवत पण माझं ऐकून घेण्याच्या आग्रहात म्हटलं.
“हो ! तोंडावर पडूनही आज त्याच्या स्पर्शात शेवटचं एकदा जिव्हाळा शोधत होते मी …
हात धरावा, चंद्र दाखवावा, आकाशातला सुकून दाखवावा … ‘आयुष्यभरासाठी माझी होशील का ?’ ही कुठूनतरी पाठ केलेली ओळ चिकटवावी आणि अचानक त्याने एक दिवस सोडून जावं …?
सोप्प असतं ना हे तुम्हा मुलांना? गेल्या कित्येक दिवसांपासून याच फेज मधून जातेेय.
तो खरंच धोका देऊन गेला? मला फसवले त्याने? हा बावळट प्रश्न मला पडलाय….
मग नंतर…? त्या दिवसापासून माझा हळवा आणि एकटीचा प्रवास सुरू झालाय …
संपूर्ण काळोख, निगरगट्ट आठवणी आणि एक कणही उमेद नसलेली आयुष्याची वाट …” पण त्या काळोखात एक जागा हक्काची मिळाली.

तुझं माझ्या आयुष्यात एवढ्या पडत्या क्षणी येणं…

आणि आज एवढं सांगताना मला त्या निर्दयी प्रियकरापेक्षा मित्राची भेट आठवून रडू आलं, मी इमोशनल झालेली पाहून
त्यावर त्याने खदखदा माझ्यावर हसायलाा सुरुवात केली… मी बोलायची थांबणार नव्हंते. मी सुरु झाले,
“या ब्रेकअपनंतर मी माझी उठायला जाणार होते…
मेलेला आत्मविश्वास आधाशासारखा शोधत होते आणि बर्रोबर इथे-च थोडं उचकवणारा, पण माझा गमावलेला आत्मविश्वास मला परत करणारा कुणीतरी हवा होता आणि इथ्थे मला तू भेटलास…
आज कें दिन मेरेही अंदाज में थॅंक्यू म्हणायचं आहे तुला… कारण ब्रेकअपनंतर माझी ज्योत मी तेवत ठेवायचा अतोनात प्रयत्न करतच होते, तिथे दोन्ही हातांनी ती वात विझू नये म्हणून आधार देणारे हात तुझे होते.
ते हात मला ओरबडणारे नव्हते … मला जिवंत ठेवणारे होते …”
म्हणून आजचं रडणं तेरे नाम …
प्रेम मित्रीपेक्षा कैक पुढे आहे……………
तू त्याचं जिवंत उदाहरण आहेस!!!” आणि मी बोलायचं थांबले…

“आणि अशाप्रकारे तुमचा निबंध संपला आहे” त्याने एका झटक्यात सगळा शुक्रिया आहे तसा माझ्या तोंडावर मारला

त्यावर तो म्हणाला,
” प्रेम आणि मैत्री याच्या कैक पुढे आहे आपलं नातं म्हणूनच आपल्या नात्याला मर्यादा नाही .. ते कायम रिक्त असत …म्हणूनच आपल्या नात्याला नाव नाही…
आणि तू कोण गं शुक्रीया करणारी .. तुला नाही अधिकार तो.. मला नको तुझं शुक्रीया. मी काहीच नाही दिलं कधीच… ते देऊही नाही शकत.. तुझ्यात आहे ते सगळं…. तुझ्यात जे दिसलं ते फक्त शब्दात दिलं मी तुला …. हे शेवटचं रडणं मैत्रीतल कळलं का भुता…
इतकं सिरियस कुणी होत का? चल स्माइल दे ती खदाखदा आणि संपव हे … ”

अशाप्रकारे काही क्षण खर्रच खूप सुंदर असतात … उगाच अशा नात्याचा हेवा वाटून जातो …

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *