पुरुष आणि तुळस…

  • by

“ना बहरतो गुलमोहरासारखा, ना सुगंधी अत्तर असतो, तुळशी सम वेदना त्याची, याची त्याची स्वप्नं पुरी करत मोहरत राहतो…” तो पुरुष!

असा तो घरातल्या तुळशी सारखा असतो … नसला की घराची चौकट अपूर्ण, अलिप्त राहते.

पुरुष नेहमी स्त्री साठी स्पेशल का असतो ? त्याचं दिसणं हा बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत गौण भाग असतो. एक स्त्री एका पुरुषावर भाळली की मग तिला इतर कुणी लागतच नाही. ती स्वतःला त्याच्या विश्वात घेऊन जाते. तिथे रमते, तिथे सुरक्षित फिल करते. खरंच यासाठी तिचं जितकं समर्पण, तितकच त्याचं कर्तुत्व, त्याचं पुरुषत्व महत्त्वाचं! वपु म्हणतात, एक क्षण भाळण्याचे, बाकी सांभाळण्याचे! पण पुरुषासाठी “एक महिना भाळण्याचा, बाकी जबाबदारीचे” असतात. त्याचा प्रवास प्रत्येक टप्प्यावर काळजीने भरलेला असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्षाची पानं चुकली नाही. पण “पुरूष” या व्याख्येत बसण्यासाठी समाजाने जन्मापासून पाठी लावलेला संघर्ष त्या प्रत्येक पुरुषाला भावनेच्या फक्त किनाऱ्यावर ठेवून देतो. त्याचं अस्तित्व कितीही भावनिक समुद्र बनू पाहत असेल तरी भावनेचा समुद्र बाईचा, पुरुषाने तिची किनार व्हावं! हा गुळमट समज त्याच्या माथी बिंबवला जातो आणि एवढं होऊनही तो जर भावनेचा समुद्र झाला तर कुटुंबाची ओढाताण होऊ लागते आणि सगळ्या जगासमोर तो सिद्ध होतो नालायक पुरुष! स्त्रीसाठी विरूध्द असतात समिकरणं…ही अशी गणितं मागे लावून दिल्यावर तो पुरुष तरी कसा जगणार स्वतंत्र?

– पूजा ढेरिंगे

Thank You for keeping our faith in good men! Happy men’s day 🤠#happymensday#जागतिकपुरुषदिन#पुरुष #पुरुषार्थ #मराठीलेखणी

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *