निरोगी मन🌼🌿
एक पर्याय नेहमी असतो’च’
सगळे दरवाजे बंद झाले तरी एक पर्याय नेहमी असतो.
तुम्ही स्वतः पुढाकार घेण्याचा पर्याय!
तुमचा एकही श्वास थांबला तर तुम्ही थांबणार, हे लक्षात ठेवलं की सोप्प होईल. उमेदीचे तसचं असतं, एकदा तुम्ही कंटाळून थांबला की तुम्हाला रोज थांबावं वाटेल. तो तुमचा शेवट असतो. त्यामुळेच म्हणतात, जो थांबला तो संपला! काहीतरी करत रहा…
‘ये जवानी है दिवानी’मध्ये जसं बनी म्हणतो,
“मैं उड़ना चाहता हूं, दौड़ना चाहता हूं।
गिरना भी चाहता हूं, बस रुकना नहीं चाहता।”
इतके जिवंत राहायचे. मी शक्यतो प्रयत्न करते की निगेटीव्ह लोक, विचार यांच्यापासून दूर राहायचे. कारण मला माहीत आहे, ही फेज सगळ्यांच्या आयुष्यात येते. ‘आयुष्य सुंदर आहे’ यावर मी आजही ठाम आहे. पण वर्षभरापूर्वी मी सुद्धा इतकीच डिप्रेशनच्या विळख्यात होते. सावरता आलं, नसतं आलं पण मी स्वतः पुढाकार घेतला. हे स्वतःहून सांगण्याचे धाडस होत नाही… कारण आपण स्वतःला काहीच्या काही भारी समजत असतो. पण एका मोक्याच्या क्षणी आपण याचा शिकार होत जातो. याचा विळखा सुटत नाही. तुम्ही कितीही महान असाल पण एकदा का अडकला म्हणजे तुमचा सगळा मुखवटा गळून पडतो.
याची पहिली फेज म्हणजे सतत नकारात्मक राहणं. हे नकारात्मक राहणं थांबवायला हवे. आयुष्यात दोन्ही बाजू बघायला शिका.
तुमचं आयुष्य हे सातत्याने समाजात मोठेपण गाजवण्यासाठी व्यतीत करण्यापेक्षा जे थोडं थोडक आहे ते निरोगी मनाने द्या…
कारण दुर्दैवाने नकारात्मक होणं हे खऱ्या अर्थाने मनाशी संबधित आहे. जे अंतर दुखणं आहे. त्यामुळे यावर बाहेरच्या डॉक्टरांपेक्षा तुम्ही तुमचे डॉक्टर होणे गरजेचे असते. यासाठी नेमकं हे नकारात्मक आणि सतत दुःखी राहण्याचे फिलिंग केव्हापासून येतंय आणि कशामुळे येतंय, या दोन प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतःला देणं गरजेचं आहे. ही प्रोसेस कशी करतात? यातून बाहेर कस पडता? याचे असंख्य उपाय आहेत. तुम्ही ते उपचार स्वतःहून घ्यायला तयार असायला हवे. तुम्हाला यातून बरच व्हायचं आहे, हा विचार मनाशी केला की तुम्ही बाहेर पडाल हे खरे. त्यासाठी सकारात्मक होण्याचे पर्याय शोधा. एरवी नको त्या लोकांना स्टॉक करण्यात तास तासभर वाया जातो, त्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याला उपयोगी असेल ते करा.
कोरोना काळात अनेक चॅलेंजेस झाले, ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नथीचे चॅलेंज, ओपन हेअर चॅलेंज. आता खऱ्या अर्थाने चॅलेंजला सिरीयसली घेण्याची गरज आहे. कारण आता सगळ्यात मोठं चॅलेंज समोर आहे. सकारात्मक राहण्याचे !
डिप्रेशन नावाच्या राक्षसापासून वाचण्याचे चॅलेंज. ते घ्या, इतरांना सकारात्मक करा.
कारण कोरोना येण्यापूर्वी देशात सोन्याचा धूर निघत नव्हता. कोरोनाच्या आधीही बऱ्याच लोकांच्या पोटावर टांगती तलवार होती. त्यामुळे, ‘आधीच दुष्काळ त्यात तेरावा!’ म्हणजेच रोजगार नसताना पहिल्या लॉकडाऊनपासूनच रोजगाराच्या आणि करीयरच्या टेंशनने दिवसागणिक डिप्रेशन अंशा अंशाने वाढू लागले होते. रोज तेच ते रूटीन फॉलो करून दुसऱ्या दिवशीची उमेद उरली नाही… रात्री रात्री जागून काहीतरी पाहून, विचार करून पहाटे कुठल्याच निष्कर्षाला न पोहोचता स्वतःच्या आयुष्याचं ओझं वाटू लागलं आहे. पोटाच्या खळगीसाठी कित्येक दारं ठोठावून पदरी निराशा आलेल्या कित्येक उदास चेहरे आजूबाजूला दिसत आहे.
सगळीकडे ही परिस्थिती असली तरी, प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने लढतो आहे. हे लढणारे खरे धाडसी आहेत.
या काळात संयम आणि नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून जिवंत रहाणं गरजेचं आहे.
माझ्याबद्दल सांगायचं तर, या काळात मी बरच काही वाचलं, नवनवीन गोष्टी शिकले, ऑनलाईन फ्री कोर्सेस ऐकले, कारण मला माहिती आहे, कुठलीच गोष्ट वाया जात नाही, काम न थकता केले, घरच्यांची मन समजून घेतली. त्यांच्याशी कोऑपरेट करायला शिकले. बोर झाले, चिडले, रागावले, परिस्थितीचा संताप आला, पण या सगळ्या भावनेबद्दल वोकल झाले, कुणाशी तरी सतत बोलत राहिले. माझं बोलणं ऐकून समोरचा त्याचा अनुभव सांगू लागला, हे बौंडींग छान जमू लागलं, जास्त ऐकुन घ्यायला शिकले, एखाद्या शब्दाला प्रत्युत्तर नाही दिले तरी चालते हे शिकले.
या काळात वाचन, लिखाणाबरोबरच म्युजिक आणि त्यांच्या शब्दांनी वेगळा आधार दिला. या काळात माझी प्लेलिस्ट बदलली. गाणं हे मनाचं मेडिटेशन असतं असं म्हणतात. मी सुरुवात आमच्या शाळेत लहानपणी रोज म्हणायला लावणाऱ्या प्रार्थनेपासून केली. ‘इतनी शक्ती हमें देना दाता’ या प्रार्थनेपासून. यापूर्वी मला माहीत नव्हतं की ही प्रार्थना ‘अंकुश’ या चित्रपटातील गीत आहे. हळूहळू रोजचं रूटीन सेट झाल्यावर मी सकाळी उठल्यानंतर आणि सायंकाळी योगा करताना ही प्रार्थना ऐकु लागले. केवळ ऐकु नाही त्याबरोबर म्हणुही लागले. माझ्या या नित्यक्रमामुळे नकळत घरातले हळूहळू हे गुणगुणू लागले. बदल होतो, वातावरण बदलून पहायचं. जीवनशैलीत नवीन चेंजेस आणायचे.
माझ्या या प्लेलिस्टमध्ये मन सुद्ध तुझं गोस्त हायें, हीच अमुची प्रार्थना, देवाक काळजी रे आणि इतनी शक्ती हमें देन दाता! ही प्राथमिक लिस्ट तयार झाली. त्यात इतनी शक्ती पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातील एक एक ओळ वेगळी शक्ती देते. कारण हे गीत १९८६ साली गायले गेले. त्यातील शब्दरचना ऐकल्यानंतर आजही तीच परिस्थिती असल्याची पुसट जाणीव होते. शंकाही येत नाही की आताची आणि तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. गीतकार अभिलाष यांनी लिहिलेलं हे गाणं आजच्या घडीला कित्ती पराकोटीची ऊर्जा निर्माण करू शकते हे तेव्हा जाणवते जेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होतो.
मुद्दामच खाली संपूर्ण लिरिक्स देत आहे. कारण बऱ्याचदा आपण गाणं गुणगुणत असतो, पण त्याबरोबर शब्दही वाचले आणि ऐकले गेले पाहिजे. एकदा डोळे मिटून ऐका, एकरूप होऊन थोडं निरोगी मन तयार करा…
इतनी शक्ति हमें देना दाता,
मन का विश्वास कमज़ोर हो ना।
हम चलें नेक रस्ते पे हमसे,
भूलकर भी कोई भूल हो ना।
दूर अज्ञान के हों अंधेरे
तू हमें ज्ञान की रोशनी दे
हर बुराई से बचते रहें हम
जितनी भी दे भली ज़िन्दगी दे।
बैर हो ना किसी का किसी से,
भावना मन में बदले की हो ना,
हम चलें नेक रस्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना।
इतनी शक्ति हमें देना दाता
मन का विश्वास कमज़ोर हो ना
हम ना सोचें हमें क्या मिला है,
हम ये सोचे किया क्या है अर्पण।
फूल खुशियों के बाँटे सभी को,
सब का जीवन ही बन जाए मधुबन।
अपनी करुणा का जल तू बहा के,
कर दे पावन हर एक मन का कोना।
हम चलें नेक रस्ते पे हमसे,
भूलकर भी कोई भूल हो ना।
इतनी शक्ति हमें देना दाता
मन का विश्वास कमज़ोर हो ना।