डियर जिंदगी 💌

सध्या मनस्थिती उत्तम असली तरीही डियर जिंदगी हा चित्रपट जवळचा वाटला. चित्रपटाची नायिका कायराच्या आयुष्यातले लव्ह प्रॉब्लेम्स माझ्या आयुष्यात नसले तरीही तिची अस्वस्थता खूप ओळखीची आहे. तिचं स्वतःमध्ये राहणं आणि स्वतःवर चिडचिड करणं हे नवीन नाहीये. तिच्या आयुष्याचा मेस अनियंत्रित झाला आहे आणि तिला सायकॅट्रिस्टची गरज आहे इथवर तिचं आयुष्य येऊन थांबलं आहे.

रोज काहीतरी मनाच्या खोल तलावात अडकत असतं, साचत असतं, झिरपत असतं. ती वखवख बाहेर पडत नाही. आतल्या आत साचल्यामुळे आपण स्वतःला दोष देत राहतो, नाहीतर इतरांवर चिडचिड करतो, नाहीतर आयुष्याला दोष देऊन सतत चेहऱ्यावर नीरस भाव ठेवतो. मोकळं हसू विसरून जातो. या नायिकेचं तसचं झालं आहे. जसजसं मोठे होत जातो तसतस अनेक गोष्टी फ्रंट फुटला येऊन कराव्या लागतात. नव्या आणि बदल घडवणाऱ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यातून मग जे आपण उरतो त्यावेळी “मनाने नग्न होणं गरजेचं असतं“. ते प्रत्येकवेळी साचत जाऊन बऱ्याच लोकांच्या बाबतीत सुरू होतो डिप्रेशनचा प्रवास.


या चित्रपटाची कथा लिहिणारी व्यक्ती या सगळ्यातून गेली असणार. तिचं लिखाण हे प्रत्येकाने अनुभवलेलं आहे. येणाऱ्या काळातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात ही अस्वस्थता निर्माण होणार आहे. तो सायकॉलॉजिस्टकडे जाईल की नाही हा ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न… कारण प्रत्येकाची स्वतःच्या मनाला सांभाळण्याची पद्धत वेगळी असते. ज्याला त्याला आपलं मन, आपलं दुःख माहित असतं.

पण मनावर एवढा अन्याय करणं खरंच गरजेचं असतं का? प्रत्येकवेळी परफेक्ट बनणे आवश्यक आहे का? दरवेळी गिल्ट ठेवून गोष्टी करणं गरजेचं असतं का? असे अनेक नवे जुने आणि वेगवेगळे प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. तेव्हा आपल्याला जो त्रास होतो त्याचं मूळ शोधणं गरजेचं असतं. मग त्या प्रॉब्लेमला जोडून  स्वतःला प्रश्न विचारावा, खरंच हे गरजेचं आहे का?

कायरा ज्यावेळी रघुवेंद्रला म्हणते, “छोडो, तुम नहीं समाझोगे!” हा डायलॉग खूप कॉमन आहे. पण तो तितकाच प्रत्येकाचा आहे. बऱ्याचदा “आपली” या कॅटेगरीत आपणच टाकलेली माणसं खूप अनोळखी असतात. पण आपण त्यांना बांधून राहतो. त्यावेळी आपण सगळ्यात जास्त एकटे पडलेले असतो.
या चित्रपटाने दिमाग का डॉक्टर या टॅबू विषयाला खूप आल्हादपणे हात लावला आहे. जेणेकरून कुठलाच नाजूक व्यक्ती दुखावला जाणार नाही. याउलट ‘आपल्याला कुणी समजून घेऊ शकतो’ ही उमेद त्यांच्यात पेरली जाईल. मला माहितीये, आजकाल डिप्रेशन हे कूल असल्याप्रमाणे बोललं जात आहे. पण ट्रस्ट मी, हा विषय आयुष्याचा अडकलेला श्वास मोकळा करू शकतो. तुम्ही नॉर्मली सहजपणे श्वास घेऊ शकत असाल जर तुम्हाला योग्य वेळी स्वतःला समजून घेता आले समजायचे.

हा चित्रपट आल्यानंतर त्यावर खूप चर्चा झाली. बोललं गेलं. माझं यावर व्यक्त होणं नवीन नसेलही. पण मी आज पुन्हा हा चित्रपट बघायला घेणं याचं कारण काही चित्रपट समजूतदार वयात पुन्हा बघावे. यातून अनेक उत्तरं मिळत जातात.
चित्रपट पाहताना सायकॅट्रिस्ट खान कायराला जे प्रश्न विचारतो त्याची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करून पाहायचा. न अडखळत देता येत असतील तर तुमचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे. उत्तरं देताना अडखळला तर आपली खरी उत्तरं शोधायची.
आयुष्याला पत्र लिहिणं म्हणजे डियर जिंदगी. इतकी सोपी कॉन्सेप्ट ही! पण खऱ्या आयुष्यात तितकीच अवघड.
तुम्ही खरंच डिप्रेशनच्या सुरुवातीला असाल, डिप्रेशनमध्ये असाल किंवा मग याआधी तुम्ही तसं काही अनुभवलं असेल तर एकदा हा चित्रपट पुन्हा पहा. यात घेतलेले काही शांत पौज, कायराचा बालिशपणा, संगीत, भूतकाळाची कडी, जोडली गेलेली माणसं आणि इतरही बारीक गोष्टी यांचा अनुभव घ्या. चित्रपटाची कथा तुमची नसेल, पण त्याचा पॅटर्न समजून भावनांशी जुळवून बघा. अर्धा भाग मनोरंजन म्हणून पहा आणि अर्धा स्वतःला शांत करण्यासाठी पहा. सिनेमा एका उत्तम थेरपी सारखा काम करू शकतो. तुम्ही त्यावर विश्वास ठेवून पहा. म्हणून मी या कॉन्सेप्टवर विश्वास ठेवून माझ्या आयुष्याला हे पोइटीक पत्र लिहायचं ठरवलं.


डियर जिंदगी,
बहुत दिनों से बात नहीं हुई।
आजकल थकान ज्यादा होती हैं, खुशियां कम।
ये बड़े होने के सिंपटम्स हैं क्या?
लेकिन फिर भी तुमसे बहुत लगाव हैं।
कभी कभी मैं सोचती हूं,
ख्वाहीशे पूरी हो जायेगी तो क्या हो जायेगा।
ए जिंदगी, तेरा मेरा हिसाब पूरा हो जायेगा।
मेरी तुमसे रही शिकायते खत्म हो जायेगी,
तुम्हारा मेरा नाता कम हो जायेगा।
मैं तुमसे दूर होना भी तो नहीं चाहती।
इसलिए तुम तुम्हारा सिलसिला जारी रखना,
मैं कारवां बनाने की कोशिश में रहूंगी।
हम साथ रहे और खुश रहे उतना काफ़ी हैं।

– पूजा ढेरिंगे
Please follow and like us:
error

1 thought on “डियर जिंदगी 💌”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *