थेटरात हाऊसफुल ऐतिहासिक ‘हिरकणी’

दोन तास आधी थेटर खच्चाखच्च भरलेलं, शेजारी बायाबापडे कुटुंबासोबत नि आपल्या लहानग्यासोबत ‘हिरकणी’ पाहायला आलेले. बाळ सतत म्हणतंय, “बाबा शिवाजी महाराज कुठाय?”
म्हणजे, घरातल्यांनी हा बहाद्दरला ‘शिवाजी महाराजांच्या चित्रपटाला जायचं ना?’ हे निमित्त दिलंय पण कसं का असेना कुटुंबाने चित्रपट पाहण्याचे क्षण भारी कमी! पण हिरकणीमुळे शक्य झाले ते…
एकीकडे गड किल्ले भाड्याने देऊ पाहणारे सरकार त्यांच्यासमोर हे कलाकार इतिहास जपण्याची जबाबदारी हाती घेतात… आणि त्याला प्रेक्षक मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने नाही हाऊसफुल प्रतिसाद देताय. प्रसाद ओकची ही कामगिरी मराठी प्रेक्षकांना थिएटर पर्यंत खेचतेय हे त्यांची पाठ थोपटण्यासाठी कमी नाही.
या कुटुंबाच्या हालचालीत नि कुजुबुजात चित्रपट सुरू होतो, स्क्रीनसमोर एक दोन म्हणत म्हणत अनेक कलाकार दिसतात तेव्हा समजते हा इतिहास समोर आणायला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागले होते. पण यामुळे का होईना मावळ्यांच काम करताना त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कामातून शिवबाच्या इतिहासाचा अंश त्यांच्यात पेरला गेला. चित्रपटात पहिल्याच दृश्यात महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस दाखवून शेतकरी, गावातल्या स्त्रिया, मुस्लिम, धनगर, माळी, वारकरी या स्वराज्यातील प्रत्येक घटकाचा उत्साह जिव्हाळ्याने प्रेक्षकांसमोर आणला आहे, त्यातील ‘हर बशर का ख्वाब हैं तू’ हा कवालीचा भाग मला खूप आपला वाटला.

कथा आहे रायगड वाडीत रहाणाऱ्या महाराजांचा मावळा जीवजीच्या पत्नीची हिरकणीची … पडद्यावर दिसतेय ती सोनाली कुलकर्णी ही विनामेकअपही आवडतेय आणि नेहमीपेक्षा उलट खूपच जास्त… अजिंठामधली सोनाली पुन्हा एकदा अभिनयात दिसते… पुन्हा एकदा तिच्या सौंदर्यापेक्षा तिची भूमिकासमोर येते. प्रेक्षकांना गोऱ्या वर्णाचा लोभ जरी असला तरी तिच्या भूमिकेने लोभ गळून पडतो, कर्तृत्व नि हिरकणी त्यात अधोरेखित होत जाते. परंतु अमित खेडेकरची नटाच्या भूमिकेतील एंट्री हि शॉकिंग होती. चित्रपट सृष्टीतील इतके मातीतले खेळाडू सोडून अमितचं जिवाजी होणं बघण्यासारखं होतं.

आता मी कलाकारांपेक्षा कथा पाहू लागते, जेव्हा एक बाई जन्म घेते, तिची ताई होते, स्त्री होते, पत्नी होते नि जेव्हा ती आई होते तेव्हा तिच्यासाठी या जगात तिच्याहून गडगंज श्रीमंत कुणी नसतोच नि या श्रीमंतीत तिच्या बाळापेक्षा मोठा राजा उरतच नाही कुणी…
हळूहळू चित्रपट रंगत धरू लागतो. लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात वाचलेली हिरकणी कविता, मागे मनाच्या बॅकग्राऊंडला आणि समोर त्याचे चलचित्र फिरताना दिसते. प्रत्येक फ्रेममध्ये दिवसा निसर्गाच्या प्रकाशाचा कवडसा आणि रात्री पणत्यांची रोषणाई… शूटिंगसाठी वापरलेल्या लाईटीच्या प्रकाशाचा तिळमात्र संबंध यात तिरीप टाकत नाही…
कथेत प्रहार बदलला कि तोफेचा धडकी भरवणारा आवाज हळूहळू आपल्या मनातही त्या काळातील संरक्षण करण्यासाठी आखलेल्या कल्पनांना दाद देण्यास भाग पडणाऱ्या वाटतात…
एका आदर्श स्वराज्यात राहणाऱ्या मावळ्याची बायको हिरकणीने तिच्या तान्ह्या बाळाच्या एकट्या राहण्याच्या कल्पनेने सर केलेला पश्चिम कडा, ही एका वाक्यात पूर्ण संपूर्ण कथा पण त्याला एक तास ३८ मिनिटे, जेवढं आहे तेवढंच नेमकं साकारण्याची कला वाखाणण्यासारखी आहे. “चूल आणि मूल म्हणजे स्त्री” ही कमीपणाची उक्ती हिरकणीने तिच्या कर्तृत्वातून धुडकावून लावली आहे. हे सगळं होताना माझ्या शेजारी बसलेलं छोटं बाळही मोठ्या कौतुकाने ती चलचित्र न्याहाळतोय.

जिवा आणि हिराची प्रेमकथा दाखवल्यानंतर मात्र एक दिवस जीवाला जंजिराच्या लढाईसाठी मोहिमेवर जावे लागते नि इकडे गायी-म्हशींचे दूध विकून मिळणाऱ्या पैश्यातून उदरनिर्वाह करणाऱ्या हिराला गडावर दूध टाकायला जायचे असते. घरी एकट्या बाळाकडे पाहायला शेजारची आजी असली तरी हाताएवढं भरणारं ते इवलुसे बाळ डोळ्याआड होणं, हे हिराच्या हुरहुरीतून नेमकेपणाने समोर येते, तेव्हा जाणवते युद्धावर गेलेल्या आपल्या पुरुषाची वाट पाहणाऱ्या बायकोची नि बाळाची काय हाल होत असेल रात्रीला.?, तेव्हा हेही जाणवते, “मायेची पावलं घराजवळच बांधलेली असतात, पण एखादवेळी पाऊलं बाहेर पडली की ती काळजाचा तुकडा घराबाहेर बांधून ठेवते.”

तिथे वाजते मध्यान्हाची घंटा… चित्रपट अर्ध्यावर येऊन ठेपलेला समजतो पण मुख्य घटनेची हुरहूर थांबत नाही. मध्यान्हाला गडावर तोफ दणाणून सूर्यास्त होऊन दरवाजे बंद झाले आहे. प्रेक्षागृहात चुळबुळ सुरु होते, पण डोकं इतिहासाच्या माहोलमध्ये गुंतून जाते. मनात हुरहूर असते. लहानपणी इतिहासातील रायगडावरील गवळण हिरकणी आणि तिचा बुरुज लक्षात आहे पण चित्रपट अडकून ठेवतो.
पश्चिमेचा कडा आणि हिरकणीची झेप, एवढ्यावर थाटलेला मध्यंतर संपतो.

पश्चिमेचा परिचय करत गडावरचा सांडणारा कडा आणि दीड गाव खोल दरी, केवळ वारा आणि पाणी खाली जाऊ शकते अशा ठिकाणी माणूस वाऱ्यालाही उभा राहणे अशक्य असते सांगत चित्रपट पुन्हा सुरु होतो. गडावर दूध घालायला गेलेल्या हिराला त्या दिवशी दूध विकून गडापर्यंत येण्यास उशीर होतो. सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले कि, ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडत असत. हि महाराजांची आज्ञा तिला ठाऊक असते. तरीही घरी तान्ह बाळ झोपलेलं असल्यामुळे ती गडकऱ्यांना फार विनंती करते, पण दरवाजे उघडत नाही. आईवाचून ते तान्हे बाळ रात्रभर कसे राहील, ह्या विचाराने आईची चिंता वाढतच जाते. ह्या विचारातच हिरा किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेते. गडाखाली बाळाची हाक हिराला रस्ता दाखवत जाते. गडाचे दरवाजे जरी बंद होतात पण आईसाठी दगडाने पेटवलेली आगही रस्ता बनते, हे हिराच्या धडपडीतून दिसत जाते.

असे म्हंटले जायचे की – ‘रायगडाचे दरवाजे बंद झाले की, खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी’. पण ह्या गोष्टीला अपवाद ठरणारं कर्तृत्व म्हणजे ‘हिरकणी’

हिरा तो पश्चिम कडा उतरायला सुरुवात करते… वरतून जेव्हा खालचा व्हिइव दाखवला जातो, तेव्हा गडाच्या खाचखळग्यांचा अंदाज येतो खरा, पण त्या गडावर केलेला फोकस आणि हळूहळू कॅमेरा मागे नेत गडाच्या लांबी रूंदीसह त्याची कठोरता आणि अशक्यपणा अधोरेखित होतो, तेव्हा गिर्यारोहकांसाठी हा कडा म्हणजे थ्रिल असेल, पण एका आईसाठी ते आव्हान पार करणं एवढं पक्क असतं, तिथून एकदा कडा उतरायला सुरुवात केली तर मागे जाण्यासाठी न रास्ता न पुढे जाण्यासाठी जगण्याची आशा… पण जसं अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसतो तसं त्या आईला तिचं मूल दिसत राहते.
वरती चंद्र दिमतीला आणि खाली रात्रीच्या घनघोर अंधारात रणसंग्रामात आईचं स्वतःच्या मुलावर असलेल्या प्रेमासाठी द्वंद्व चालावं, ज्यात जिंकणं नाहीतर मरणं एवढंच उरणार, तसा तिचा संघर्ष सुरू होतो… हळूहळू हिरा कडा उतरू लागते, जिथे अर्ध्या रस्त्यात ती गेली खरं पण जर तिथून परतावं वाटलं असतं तर ? मागे वळण्यासाठी पुन्हा पार केलेल्या दगडांच्या रांगा, एखादा निसरडा दगड नि हिरा म्हणून जन्मलेली माता अदृश्य !

कारण रात्र वैऱ्याची असते म्हणतात… तशी ही कोजागिरी दुधाची पांढरी रात्र तिच्यासाठी काळरात्र ठरत होती… एकीकडे गडावर साजरा होणारा कोजागिरीचा उत्सव तर दुसरीकडे एक एक दगड जपून पाऊलं टाकत चप्पचप्पा सर करणारी ही आई! काय ते सादर केलय… पोटात गोळा, भीतीचं वलय, श्वासांची चालढकल …
तरीही हिरा आधी दगडाला खाली टाकून पाहत नि त्या अंदाजाने हळूहळू पाऊले टाकत जाते… भीतीचा धोका आवंढा साप, मधमशा, विंचू काटे नि अजुन काय पाहताना जीव पुरता मुठीत आलेला असतो, तो अनुभव लिहिण्यापेक्षा पाहण्याचा आहे, अनुभवण्याचा आहे!
तरीही ती जेव्हा एका ठिकाणी विश्रांतीसाठी कड्यावर थांबते तेव्हा पापी मनात शंका येणं थांबत नाही, जसं कि, कडा उतरायलाही पहाटपर्यंतचा वेळ जात होता तर मग सकाळपर्यंत थांबली असती? नाहीतर मग शेजारच्या आजीजवळ ठेवलेल्या बाळाला त्या आजीने एकटं तर टाकलं नसणार मग तरीही ?
पण जवळच बसलेल्या माझ्या आईच्या नजरेत पाहताना कळतं आईचं काळीज जेव्हा स्त्रीत्वाला घडवतं तेव्हा ह्रुदयात केवळ त्याचं पान्हा फुटून रडणं ऐकू येत राहतं… तिच्या कानात, मनात येणारे नकारात्मक विचार शांत बसू देत नाही, कुठलीच शंका आणि कुठलाच निष्काळजीपणा माझ्या बाळाच्या नसण्याचे कारण बनू नये, एवढी माफक निरागस अपेक्षा त्या मनाची असते, तेव्हा होतात असे कडे सर… त्यामुळेच दिग्दर्शक ओक म्हणतो तसे, प्रत्येक आई असतेच हिरकणी!
तेव्हा शेवटाला स्वतःच्या आईचा संघर्ष आठवून कळते, माझ्या आईतही आहेच हिरकणी.!

हिराची हि शूर कहाणी ऐकून त्या शूर मातेचा महाराजांनी साडी-चोळी देऊन सन्मान तर केलाच पण ज्या कड्यावरून ती खाली उतरली त्या कड्यावर आईच्या प्रेमाची साक्ष म्हणून ‘हिरकणी बुरुज’ बांधण्यात आला. त्याचबरोबर ती राहत असलेल्या गावाला तिचे नाव देण्यात आले. ते गाव म्हणजेच रायगडाजवळील ‘हिरकणीवाडी’. सध्या रायगडावर जाण्या-येण्यासाठी बनवण्यात आलेला रोपवे हा त्याच ‘हिरकणीवाडी’तून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Please follow and like us:
error

7 thoughts on “थेटरात हाऊसफुल ऐतिहासिक ‘हिरकणी’”

  1. Hey there! I’ve been following your website for a long time
    now and finally got the bravery to go ahead and give
    you a shout out from Lubbock Texas! Just wanted to mention keep up the good job!

  2. I want to show my gratitude for your generosity in support of women who require guidance on this one subject. Your special dedication to getting the message all around came to be rather informative and have really allowed girls like me to achieve their objectives. Your personal warm and helpful recommendations entails a whole lot to me and even more to my peers. Warm regards; from each one of us.

  3. My wife and i ended up being really peaceful that Edward managed to finish up his researching from your ideas he was given in your weblog. It’s not at all simplistic to simply be offering guidance which usually some other people might have been making money from. And now we fully grasp we have got the blog owner to give thanks to because of that. All the illustrations you have made, the simple website navigation, the relationships you give support to create – it is all awesome, and it’s helping our son and us imagine that that concept is satisfying, which is certainly especially indispensable. Thanks for the whole thing!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *