तुला शोधू कि सापडून खुश होऊ ?
कुठल्या स्वप्नाला आपलं करू ??
थोडा त्रास आपण दोघांनी बघितला,
पण खुश तुमि याच चक्रात आहोत कि,
शेवटी आपण दोघे भेटलो, एखाद्या ऊन सावलीच्या शेडमध्ये मर्ज होऊन सुखी सायंकाळ होण्यात…
तो – “आपण भेटलो कधी ग ?
ती – “नाही हा, ते टिपिकल कपलसारखं माझ्या लक्षात नाही राहत”
तो – आपण दोघे इतकेच वेंधळे कसे रे?
ती – दोघांना एकमेकांचं काही पडलंच नाही का ?
तो – ए एवढं क्लिशे नाही हा, म्हणजे आपल्याला एकमेकांबद्दल जे वाटत ते व्यक्त होत नाही.
ती – ए पण कदाचित आपण सहवासातून जास्त बोलतो…
तो – म्हणजे प्रवास दोघांचे स्वतंत्र आहेत आणि मुळात ते एकत्र यावेत हा आपला कधीच प्रयत्न नसतो.
ती – हो, माझही तेच म्हणणं आहे. किंबहुना बाबू, शोना हे लव्ह आपल्या टाईपचं नाहीचेय.
तो – हो, पण म्हणून ते बाबू, शोनाच लव्ह ‘प्रेम’ नाही असं म्हणू शकत नाहीस हा! लोकं त्यांना कितीही ट्रेंड करो, प्रेम माणसाला बालपण जगायला शिकवतं, फक्त ते बालपण जपून ठेवता आलं पाहिजे, त्यात आयुष्य आहे!
तो – “अग अग जपून” ऐकता ऐकता रपारप पेंडल मारत स्पीड जास्त होऊन ती धपकन पडली. सायकलचा स्पीड वाढवून तिच्याजवळ जाऊन त्याने स्वतःच्या सायकलच्या हॅण्डलवरचा एक हात काढून तिला उठण्यासाठी आधार दिला.
ती – कदाचित यामुळेच आपण भेटलो?
तो – आणि कदाचित यामुळेच एकत्रही आहोत?
दोघांनी दोघांच्या मनातलं स्फुरलेलं प्रेम समोर ठेवलं.
तो – पण तुझ्या मते ते “यामुळेच” म्हणजे नेमकं कशामुळे . ?
ती – मग तुलाही सांगावं लागेल. चालेल ?
तो – ठीके, एक सेकंद घ्यायचा नि सांगायचं कि, आपल्या नात्याच्या आतापर्यंतच्या आयुष्यात तुला ‘तुमि’ म्हणजे आपला असा कोणता क्षण आठवतो, जिथे तुला पुन्हा जाऊन थांबावं वाटेल. तो क्षण आपला ‘त्यामुळेच’वाला क्षण असेल.
ती – हां ठीके, पण आधी मी ….
तो – अरे व्वा ! बडी जल्दी तय भी हुआ?
ती – तो ‘तुमि’ क्षण हा मला नेहमी तुझ्यावर प्रेम करण्याचं कारण देतो. तो माझा निश्चल आहे.
तो – बरं चल सांग पटकन, मी खूप एक्सायटेड झालोय.
ती – तरीही, एक सेकंद हवाच. थोडा प्रेमाला, थोडा भावनेला, त्या माहोलला, त्या जगण्याला न्याय द्यायचाय. तुझ्या अस्तित्वासह तो क्षण मलाही परत जगायचाय.
एक सेकंद दोघांनी सायकलवरून उतरून शांतपणे डोळे मिटले.
ती – “आपण सोबतीने प्रवास केलेला बसमधला दोन तासाचा क्षण. ज्यामध्ये तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन माझ्या हातातल्या बोटांच्या रिकाम्या जागेत तुझी बोटे अडकवून निवांत पहुडला होता. खरंतर ही मुमेंट पहिल्यांदा होती असं नाही.
पण प्रत्येकवेळी अशी गुंतवणूक होत नाही.
ही हातांच्या मधली जागा गेल्या दोन तासापासून माझी आहे. तिथे ज्या आत्मीयतेने तू तो हात पकडला ना तो क्षण अढळ वाटतो. दरवेळी असं आपल्याच व्यक्तीचा हात पकडुन मन स्थिरावत नाही, हे क्षण प्रेमापेक्षा कोमल आहे नि जंजिर्यासारखे घट्ट आहे. मध्येच एखादा खड्डा येतो नि मन दाणकन आदळत तळ अधिकच जंजिर्यासारखा घट्ट होत जातो. मला हवयं सगळचं … तू , तुझी मिठी, तुझी किशी, तुझ्या मिठीच्या ओंजळीत फक्त मी आणि त्यात हा घट्ट गाभा … हाश!” सांगताना कधी सायकलच्या मागच्या सीटवर बसून ती कधी त्याच्या पाठमोऱ्या मिठीत लुप्त झाले कळलंही नाही.
तो – ओह. त्याने तोंड मिटून घेतलं.
ती – आता असं अजिबात म्हणू नको कि माझाही “त्यामुळेच”वाला क्षण हाच. कारण मी सांगितलेल्या क्षणात तू झोपलेला आहेस, कळलं ?
तो – अरे नाही रे, गप्प. त्यामुळे तोंड नाही मिटलं. ते आपल्यात एवढं पाकात विरघळेल असं संभाषण कमीच होतं ना, त्यामुळे मनाचा थोडा पाक झालाय. क्लिशे आहे ना ओळ ? पण आत्ताची माझी फिलिंग तशी काहीशी आहे, ” तुला जिथे प्रेम नासूच शकत असं वाटत ना त्या रिकाम्या जागांमध्ये प्रेम ओतता येतं, तू खास आहेस.! त्यामुळेच तू माझी आहेस.
ती – वाह जनाब, तारीफें तो देखो
कुछ कम बोलना हो तो तारीफें कर देते हो,
इश्क़ में होकर बड़ी गुस्ताखियाँ कर लेते हो।
मी सोडणार नाहीये. चल आता तू सांग…. आई एम एक्साइटेड लाईक हेवन <3
तो – “आत्ताचा क्षण…”
ती – क्काय ? ही चीटिंग आहे.
त्याला मारतच ती त्याच्यामागे सायकल पळवते.
तो – हो, नीट ऐक. तो थांबून बोलु लागला.
“आत्ताचा क्षण…” हे दोन शब्द यासाठी कारण तू जेव्हाही आपल्या प्रेमाला आठवशील, तेव्हा तुला “आत्ताचा क्षण” तुमि वाटेल. जिथे नेहमीच तू असेल तिथे माझा वजुद असेल. कारण मला माहित आहे, माझ्या अनुपस्थितीत तू अर्धा सेकंद का असेना मला आठ्वतेच. त्यामुळे तुझ्या त्या प्रत्येक आत्ताच्या क्षणी तू मला हातचं राखून ठेवायचंय. कारण मला तुझ्या प्रत्येक क्षणात असायचंय! कळलं … ?
ती – हे एवढं पाकात विरघळता तुलाही येतं ? मला याहून अधिक काहीच नकोये आणि हो, यापेक्षा कमीही काहीच नकोये. मला तुला हातचं राखूनच ठेवायचंय, कारण मलाही तुझ्या प्रत्येक क्षणात असायचंय. !