नातं ‘नातं’ मानलं जातं जेव्हा तिथे लग्न होतं.
सात फेरे, मंगळसूत्र नि तीच्यावरच्या लाल शालूने इतका का फरक पडतो की लग्नानंतरच नातं नैतिक होतं ते?
कुठून हे सुरु होतं ?
प्रेम हो!
त्याला प्रेम हा एकमेव शेड कधीच नसतो. सगळ्या अभिजात कलांचा संगम प्रेमात असतो. पण त्यांनतर वाढत जातो पसारा नौरसांचा…
माझ्यासाठी हक्काचं कुणी असणं म्हणजे प्रेम !
जगात सगळे सगळ्यात व्यस्त आहे, त्यात कुणीतरी सातत्याने आपली दखल घेणं हे प्रेम !
सगळे मूड्स उधाण येऊन वाहू लागता. पण तरीही, जिथे दोघेजण राजी असता तिकडे दुनियेला प्रेमाचा संताप येत असतो.
मी म्हणते,
“तुम जान उसकी हो, वो तुम पर जान छिड़कता हैं।
बधाई हो दुनिया की नज़रों में बेशरम होकर मोहब्बत करने का जिगरा दिखाया हैं तुमने।”
म्हणून तरीही नातं तेव्हाच का नातं मानलं जातं जेव्हा तिथे लग्न होतं.? सात फेरे, मंगळसूत्र नि तिच्यावरच्या लाल शालूने इतका काय फरक पडतो?
लग्नाआधीही असतो त्यांच्यात मैत्र जपून केलेला संसार, तिथेही पडझड झालेली, हांडे भांडे आपटून नाही पण भर रस्त्यावर उडालेले भांडणाचे फवारे नि हक्काचे नैतिक वाद…
तरीही का फरक पडत राहतो, प्रेमाला तिरस्काराचा वास देऊन सार्वजनिक फिरताना!
आपल्याकडे हे चालतच नाही, श्या!
म्हणून या नजरांची सवय करून मीच नजर चोरून राहतो, त्याची नजर माझ्याशी बोलत राहते.
त्याचे प्रश्न वाढत नाही, त्याची उत्तरे तोच देतो.
किती कशा स्पष्ट होत जाता समाजाच्या नजरा, तेव्हा प्रेम करून काही चूक केल्यासारखं तोही लाजरा बुजरा कातडीच्या आत अनोळखीच वावरू लागतो माझ्याशीही.
स्पर्श केवळ नावाला नाही आमच्यातही होतो आकर्षणाने,
लग्नाआधी उलट तो अधिकच गोजिरवाणा उमलत जातो…
तरीही, कुठे कधी चुकीची नजर बाहेरचीही पडते मजवर, तेव्हा दुनियेला बाजूला ठेऊन शारीरिक प्रेमाच्या मोहाला दूर करून तो दूनियेसमोर मला जवळ घेऊन प्रेमाच्या भावनेची व्याख्या वदतो, तो मला सुरक्षित घराची फिलिंग देतो.
त्यामुळे नैतिक अनैतिक नाही, मैत्र जपून प्रेमाची परिभाषा सांगतो,
मला जवळ घेऊन सुरक्षित घराची फिलिंग देतो.
तेव्हाच अखेरीस तो जवळ घेऊन मला म्हणतो,
मी प्रेम शब्द उच्चारून बोभाटा करावा तरी का?
प्रेम! फक्त म्हणून नात्याच्या सार्वजनिक व्याख्या नि मर्यादा लागतात… म्हणून “माझं प्रेम नाही तुझ्यावर”
छान! एकदम सरळ आणि सोप्या भाषेत प्रेम भावना म्हणजे काय याचं रूपांतरण केलास आपण.