काही स्वप्नांची किंमत खूप जास्त असते. आकाशाला हात लावण्याचं स्वप्न बघणारी व्यक्ती आणि आपल्या नवरा किंवा बायको बरोबर निवांत फिरायला जाण्याचं स्वप्न बघणारी ती किंवा तो या दोन्ही स्वप्नांत खरंच अंतर आहे का? स्वप्न समाजासाठी की स्वतःसाठी हेही महत्त्वाचं! कुठेच आकाशाला हात लावण्याचं स्वप्न किंवा जोडीदाराबरोबर फिरण्याचं स्वप्न कमी ठरत नाही. स्वप्न पूर्ती होतानाचा क्षण महत्त्वाचा! संपूर्ण वर्दळीत आपण जिंकलेलो असतो! स्वप्नात परिस्थितीला हरवण्याची ताकद आहे!
या दोघांकडे बघितल्यावर वाटलं, बघणं तर रोज होत होतं. भेट मात्र रोज टळत होती. एका घरात असून ती त्याला नि तो तिला भेटत नव्हता.एकाच खोलीत पाच माणसं, एक मोरी… कशी करावी सलगी, कशी करावी नजर चोरी? तिच्या ओळखीत आहे त्याचा कामाला जातानाचा चेहरा,पण त्याने पाहिलाच नाही त्यांच्यातला इश्क गहिरा! किती चालली उलटून वर्षे, आता पाच वर्षे होतील… धूळ बसेल एवढा जुना होईल संसार, तरी कोणी पाहील म्हणून कधी धरणार नाही हात. लग्न होईल, मुल होईल, घर सगळं खुश होईल. इतकं सगळं होताना त्यांचं प्रेम करायचं राहुन जाईल. शोधायचं नाहीये त्यांना घराबाहेर प्रेम, अपेक्षाये मिळेल आपल्याच नैतिक जोडीदाराकडून उघड उघड प्रेम! तू माझा हात धरावा इतकंच स्वप्न राहील खास,”कुणी बघेल” म्हणता म्हणता संपायला नको श्वास!
-पूजा ढेरिंगे
Khup chan 💯🔥🤞🏻
💜💜💜