जशन-ए-इश्क

  • by

ऑफिस सुटलं.
नेहमीसारखंच सुशील माझी वाट पाहणार होता आणि मी नेहमीसारखच त्याला टाळून पुढे जाऊन टॅक्सी पकडणार होते. पण आज मी ‘ओला’ने जायचं ठरवलं. ड्रॉयव्हरचा कॉल येत नाही तोपर्यंत ऑफिसमध्येच थांबले. वॅलेन्टाईन म्हणून सगळं ऑफिस सामसूम झालं होतं. एकदा खात्री म्हणून मी सुशीलच्या केबिनमध्ये डोकावून बघितलं, तेवढ्यात वेणू म्हणाला ‘जी! वो जल्दी निकल गये ।’ हां ठीके, ठीके म्हणत, मी त्याला वरवर कटवलं.

कारण ‘सुशीलपासून वाचण्यासाठी मी त्याला बघत होते’ हे वेणूला सांगत बसणं म्हणजे सार सांगायला जाऊन गोष्ट सांगत बसण्यासारखं झालं असत आणि ड्रॉयव्हर पोहोचला होता त्यामुळे मला लवकर निघायला हवं होत. पटकन कॉम्पुटर बंद केला, सामान पर्समध्ये टाकलं नि चैन लावत लावतच बाहेर पडले…

ओह्ह्ह्हह्हह्हनोनोsssssss …….
हे मी कस विसरू शकते .? शिट्ट यार…….

समोर अख्खा स्टाफ उभा होता… आणि हातात लाल गुलाबाचं फुल घेऊन सुशील. अगदीच बावळटपणा होता तो ! या मुर्खाला जरा तरी अक्कल नाहि का ? एकवेळेला माझ्या बाजूनेही तीच फीलिंग असती तर गोष्ट वेगळी होती… याने हे असं करणं मला अजिबात पटलं नव्हतं आणि वर सगळ्यांसमोर त्याला नाकारणं माझ्या पुरतं अंगाशी आलं होतं म्हणून मी सगळ्या शक्यता पडताळून बघत होते म्हणजे नक्की काय करू शकते मी ? याला असं पब्लिकली नाकारणं त्याच्यासाठी किती अपमानास्पद असू शकतं वगैरे … पण मग होकार देणं हा तर मी विचारही करू शकत नव्हते…. मी माझ्याच गुंत्यात गुंतले होते. तेव्हाच हा पार कानाजवळ आला नि म्हणाला,

‘चाँद तारोंका तो पता नहीं, लेकिन, रोज तुम्हें उस समंदर किनारे ले जाऊँगा, जहांसे तुम खुद चाँद-तारे तोड़ कर अपने आंखोंमें सहला के, दिल में रख सकती हो ।’
‘मुझे तुम्हारा तो पता नहीं लेकिन, तुम्हारे ख़ुशी का मै कुछ इस कदर ख्याल रखूँगा, की एक वखत पर तुम मुझे छोड़ दोगी लेकिन तुम्हारी खुशिया नहीं।’

मी- ‘खुप विश्वास आहे नं स्वतःवर? हाच विश्वास तुला आज तोंडावर पाडेल बघ ! एकदा पर्सनली विचारलं असत ? बोलला असता तर ? …… जरुरी तों नहीं , तुम्हारे मोहब्बत का समंदर मेरी लेहरोंसे जुड़े ? ‘
आणि मी निघून आले , हो …. निघून आले. ना अपमान केला, ना उत्तर दिलं.
तोपर्यंत टॅक्सी आलीच होती. तो पळत येऊन अजून काही बोलेल , याआधी मी टॅक्सीत बसले.

किशोरदांच्या आवाजातलं ‘पलभर के लिए।’ चालू होतं. पण माझा पारा शंभराच्या घरात होता. मग गाणं ऐकण्याचा प्रश्नच नाही. पण शेजारून एक अस्पष्ट गुणगुणण्याचा आवाज येत होता.
तरी ‘सुश्या आई विल किल यू ……… ईईईईई हेट यू हेट यू हेट यू ……’ मी माझ्याच तंद्रीत बोलत होते .
‘सुशील, प्रपोजल, वॅलेंटाईन्स डे, क्या बात है। आज भी तुम्हारा हुस्न कयामत सा जादू कर रहा हैं ना|’ माझ्या व्यक्तिरिक्त ऐकलेल्या आवाजाकडे मी गौर केलं …
मी – ‘अरेssssss पायल तू? :O ( कॉलेजचा मित्र सचिन. त्याचा क्रश पायल म्हणून पायल )
सचिन – ‘ओह्ह प्लिज शिखा ….. आपण काय कॉलेजमध्ये आहोत का ?’ तो जरासा चिडून म्हणाला.
मी – ‘हाहा sss लुजर …. तू अजूनही तसाचे चंपू, सभ्य नि गंभीर भूsssss’
‘पण एक मिनिट’ ट्यूब पेटल्यासारख्या स्वरात मी म्हटलं, ‘ओला कॅबमध्ये वैयक्तिकपणे एकच व्यक्ती जाऊ शकतो मग तू काय करतोयस इथे …? व्हॉट यू डुईंग हिअर ? किडनॅपिंग वगैरेचा प्लॅन तर नाही ? असेल तर कॅन्सल कर , मी ब्लॅक बेल्ट आहे … ‘ एवढं बोलून मी शांत झाले
सचिन -‘एsssss जॅकी चेन… बास बास … तुला किडनॅप करणं म्हणजे जिवंतपणी वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखंये आणि इन्वेस्टिगेशन वगैरे काय गं लगेच ? एवढ्या वर्षांनी भेटतोय त्याच काय नाही , लगेच पट्टी सुरु …..’
मी- ‘अरे चंप्या कसला हॅंडसम झालास रे तु …. फुल ऑन मटेरिअल हां….
सचिन – अबे ..मला वाटल मोठी झाली, बदलली असशील पण नाही,,, तु बिलकुल नाही बदललीस … मटेरियल , माल सगळ डिक्टो ! ‘
मी- ‘ एक मिनिट हं … सुश्याचा फोने …. बिलकुल बोलु नकोस !’
मी -‘हॅलो ….? ‘
सुश्या- ‘मला तर वाटलं, तु माझा फोनच नाही घेणार. पण मला माझं उत्तर मिळालंय, मघाशी लाजून जाणं आणि आता फोन उचलनं, मला वाईट वाटू नाही याचा एवढा विचार … तु सुद्धा प्रेम करतेस माझ्यावर हो की नाही?’
पायलने सुरुवातीलाच विनापरवानगी फोन स्पीकरवर टाकला होता…
मी -‘सुश्या….’ (प्रेमाने म्हटलं)
सुश्या- (तोही खऱ्या भ्रमात लाजत) ‘ बोल ना शिखा ? ‘
मी – पाण्याचा रंग, आईची माया, भैरवीची पाणीपुरी, ज्ञानाची दाबेली, कोपर्यावरचं शौचालय, शंकरची पाणपोई, टकल्याचा किराणा, ओलाची टॅक्सी, खडकवासल्याचं पाणी, शिवाजीनगरचा बसस्टॉप, डॉमिनोजचा पिझ्झा, पेटूचा वडापाव, मक्डिचे फ्राएज, निसर्गचं चायनीज, गोयलची लायब्ररी, आकाशातला चंद्र, तिथलाच सुर्य, घरातला झाडू, ॲमॅझॉनची शॉपिंग, शंभरचा गोळा, माझा भाई ….. हॅलो ,हॅलो …
फोन कट झाला होता …
सचिन – आई गंssss कस कंट्रोल केलं माझं मलाच माहित… काय होतं हे ? माते चरण कहाँ हैं आपके| मी धन्य झालो बाई….
मी- वत्स ! ट्रृमन्ज थेरी केहती है, ‘इफ यु कान्ट कन्व्हिंन्स देम, कन्फ्यूज देम’ (जर तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट पटवून देण्यास असमर्थ असाल, तर त्यांना गोंधळात टाका ) हे त्याचंच प्रात्यक्षिक होत….
सचिन- हे ….! (मऊ आवाजात एकटक बघत )
मी- ओह्ह्हह्ह्ह गॉशsssss नहीं सच्या नहीं…. तु तसं काहीच करणार नाहियेस …( आगीतून निघुन फुफाट्यात आल्यासारख झालं होतं मला )
सचिन – ‘शूऽऽ’ त्याने मला गप्प करण्यासाठी माझ्या बडबडणार्या ओठांवर बोट ठेवल.
मी- ‘ऐऽऽ सच्या …. वॅलेंटाइन आहे म्हणून रोमॅन्टिक वागायचचं असं नसतं हां….. आताच गाडीतून उतरुन देईल सांगतेय’ (माझी धडधड आसमंत गाठायला लागली)
सचिन -‘ए अगं….. आपण कॉलेजमध्ये एकत्र होतो, एकदा तर टिफिन पण शेअर केलेला…पण आज तु असं वागतेय जसं मला ओळखतच नाही ? .. तुला माहिते कित्ति दिवसांपासून जिवाचा आटापिटा करुन तुला शोधतोय ? पण तुला त्याचं काय ? तुझा गिरणीचा पट्टा सुरुच ! त्यात एवढी हिम्मत करून काहितरी बोलणार, त्यावर पण तु धमकी देतेयस ? …. मान्यये कॉलेजमध्ये तुला टाळलं खुपदा पण म्हणून …. ‘
मी मध्येच थांबवलं त्याला….
मी – हे बघ सच्या, सेंटी नको मारु… मी काय बोळ्यान दूध पीत नाही. मला पण कळतं’ तुझ्या सो कॉल्ड जगात आज मी हॉट आणि बोल्ड दिसते म्हणून तुझा हा अट्टाहास… चार- चौघात मिरवण्यासाठी कोण ? तर ‘मी’ ? काय शो- पिसे ? मी तठस्थ बोलत होते, गरज होती ..
मी- भैय्या रुको ! … मी तावातावाने म्हटलं ..
सच्याऽऽ…. माझा पारा आधीच चढलाय. अजून चढायच्या आत खाली उतर !
सचिन – पण माझं ऐकून …
मी – सच्याऽऽ गेट आऊट राईट नॉव…..

सच्या गेला . पण या दोन तासात एवढं काही घडून गेल की, आता मला मोकळा श्वासही घेता येइना … कधी एकदा ठरल्या ठिकाणी पोहोचतेय, असं झाल होत …
रेडिओवर ‘ ये शाम मस्तानीsss’ लागलं,तेव्हा कुठे बरं वाटलं जरा … तोंडावर पाणी मारून टच- अप केलं…
‘लो पोहोच गये ‘ ड्रायव्हर म्हणाला.
पैसे देउन एक पुष्पगुच्छ घेऊन मी ठरल्या ठिकाणी पोहोचले.
तो … सॉरी ‘ती ‘ आधीच पोहोचली होती ….
तीला सगळं सांगितल, म्हणजे उशिरा येण्याचं कारण वगैरे सर्वच …
तीसुद्धा बाकी लोकांसारखी प्रश्न विचारायला लागली ….
ती- ‘एवढ्या चॉइसेस असून मीच का? हे नवीन- नवीन छान वाटेल, समाज आपल्याला स्वीकारणार नाही, बाळा समज ना ….’
मी – ‘तु प्रेम नाही करत माझ्यावर?’
ती – ‘तुला हा प्रश्न पडूच कसा शकतो ? बाळा मी प्रेम करते पण आपल्याला प्रेम करण्याचा अधिकार नसतो गं. समजुन घे ना, आज हे गुपित आहे उद्या समाजाला कळलं तर ?’
मी- ‘ठिके तर मग झाल …. उद्याच उद्या बघू. चॉईसेसचं म्हणत असशील तर माझी चॉईस माझ्यासमोर उभीये तीही जगावेगळी. आता हे प्रेमाला मर्यादा लावणं बास ना! आज प्रेमाचा दिवस आहे, त्याला राग येईल, जर आपण साजरा नाही केला तर …. चल हसून दाखव पटकन …..!’

तिने मला जवळ घेऊन मला शांत केलं. ती मिठी एकमेकींना दिलेल्या आधाराची होती. प्रेमाची होती. आजचा दिवस खास होता, कारण आज तिने तिच्या बाजूने मला प्रेमाची शाश्वती दिली होती.
मी आता मन घट्ट करुन आधीसारखा मूड बनवला आणि लाजून, आणलेला गुच्छ तिच्यासमोर ठेवला आणि म्हणाले ‘ हा गुच्छ प्रेम करते म्हणून आहेच, पण या गुच्छात असलेलं सगळ्यात वेगळं फुल खास आपल्या नात्यातील आदरासाठी आहे. लोकांचा प्रश्न नंतर येईल आधी तुला हे स्वीकाराव लागेल आणि जेव्हा तु हे स्वीकारशील तेव्हा मी मनापासून हा प्रेमदिवस साजरा करेल ….Happy Valentine’s day my 🌹’
आणि अशाप्रकारे तोडत-मोडत मन सावरत त्यांनी त्यांच्या हक्काचा प्रेमदिवस साजरा केला.

गांगारुन जायला काय झाल ? ती तुमच्या- माझ्यासारख्या लोकांबद्दलच बोलतेय ….का समलिंगी दोघी प्रेम नाही करु शकत ? त्यांनी वॅलेंटाइन नाही मनवायचा ?
किंवा मग शिखाला इतक्या चॉइसेस असुन समलिंगीच का ? हेच प्रश्न तुम्हांलाही पडलेत ना? मुळात याचं उत्तर आपण आपल्या बुद्धीच्या आवाकावरुन ठरवाव, मुळात हा प्रश्न पडतोय हेच मोठ दुर्दैवय ! आणि मी म्हणते त्यांच्या प्रेमात आपलं मत हवंच कशालाये ?
चौकटीत बांधणार प्रेम करु नये म्हणतात, प्रेमात स्वतःला झोकून द्यावं, मनसोक्त ! असं आपण म्हणतो. पण मग जेव्हा तृतीयपंथी, समलैंगिक व्यक्ती प्रेम करतात, तेव्हा त्यांच्या प्रेमाला आपण समाजाच्या बिनबुरुदी चौकटीत का बांधतो ? का त्यांच्या प्रेमाच सांत्वन केलं जातं…. आदर नाही? का?
माझ्या प्रश्नांची उत्तरं सच्या आणि सुशील होते आणि त्यांच उत्तर होती ‘शिखा’ … सलाम शिखा !

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *