खुऊप फिरावं,
खुऊप जगावं,
खुऊप अनोळखी लोकांशी बोलावं, भेटावं.
या जगातलं प्रत्येक आयुष्य बघावं… एकटेपणा जाणवत नाही किंबहुना तो येतो यामुळे की आपण स्वतःला एका आयुष्यात बांधून ठेवतो … त्यात आनंद असतोच किंवा कदाचित तो रोजच्या जगण्याचा न टाळता येण्यासारखा भाग असतो,म्हणून तिथे आनंदी राहणंच भाग असतं … पण हा भाग रुटीन होतो तेव्हा एकटेपणा कब्जा करतो…
खूप फिलॉसॉफिकल झालं ना …?
पण माझं ना प्रेम जडलं होतं मध्यंतरी….
कुणावर हा प्रश्न आजकाल विचारतच नाही कोणी …..
पण मी सांगते … कदाचित दुखावर ?
नाही दुखावर नाही एकटेपणावर …
यावर कित्येकानी कित्येक फिलॉसोफी झाडल्या .. हो एक काळ होता मीही अशी तत्वज्ञानाची व्याख्यान झाडायचे … कुणी अति तत्वज्ञानी बोललं की ते झाडणंच होत …
एक सांगू , एकटेपणावर प्रेम केलं ना तेव्हा मला हा प्रश्न नाही पडला की माझ्या हातून हा साबण का पडलाय … म्हणजे त्याला अर्थ का असावा ? मी जसं रोज जगायचं म्हणून जगण्यासारखं करत होते, तसं तो साबण त्याचं काम करत होता …
काही दिवसांनी मला माझा श्वासही फील होणं बंद झालं … प्रत्येकाला काम दिलय तो विनातक्रार ते करतोय तसं माझं जगणं हेही कामच झालं होतं …
माझं जगणं फक्त त्याच्या किंवा तिच्याभोवती आणि जास्तीत जास्त घराभोवती फिरत होतं आणि या एकटेपणाला मोठं केलं ते या मोबाईलने … म्हणजे कालांतराने मी इंस्टाग्राम, फेसबुकच्या एखाद्या जोकला लाइक करायचे पण मला हसू यायचं नाही. मी एखाद्या मुलाच्या फोटोलाही लाइक करायचे पण मला तो आवडला ही भावनाच नसायची … आणि काही काळाने तर मला रस्त्यावर भीक मागत असलेल्यांचही काही वाटेनास झालं. ते त्यांच आयुष्य आहे त्यांनी सांभाळावं इतक सहज माझं मन न विरघळता बोलायला लागलं … याचं कारण काय होतं ? जसं माझ्या एकटेपणात माझ्यासोबत कोणी नव्हतं तेव्हा माझं मी सांभाळलं स्वतःला, तसं त्या रस्त्यावरच्या मुलाने सांभाळावं स्वतःला … ज्याला त्याला ज्याचा त्याच्या आयुष्याची चित्र रेखाटायची असतात, माझं चित्र तर तयार होतं पण रंग उरले नव्हते … मी शोधणंही बंद केल किंवा मला तो राखाडी रंग चिकटला होता. कसलाच स्पर्श, भावना फील होत नव्हती …
मग मी हंपी बघितला … खरं सांगू तर हम्पी एक कट्टा आहे, एक जिवंत वास्तू आहे, तिला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे हे याआधी मला खरंच माहिती नव्हतं. .. मी तो चित्रपट पाहिला स्वतःला शांत करण्यासाठी … खुउप कीलकील होती मनात…
‘काहीच फील नाही होत याचा अर्थ काय माहिते…? मी लिटरली डेड जगत होते …’
आणि अशावेळी चित्रपट पाहायला जातोय याचही फारस कौतुक नसतं..रोजचं काम असल्यासारखं मी चित्रपटाला गेले. ते वादळ घेऊन गेले, कसलीच अपेक्षा न करता …
सुरुवातीला इतका इनफॉर्मॅटिव चित्रपट पाहायला आले याची चिड आली…पण मला माहीत नाही मला काय इतकं सुखावून जात होतं, कदाचित तो निसर्ग, ती वास्तू…? त्याच्याशी मी कनेक्ट करत होते ? ते दगड नव्हते जादू होती, अविश्वसनीय होत सगळं … म्हणजे मुळात हे फार काहीसं फिलोसॉफिकल वाटेल, पण नाही, खरच त्या कॅमराअँगलने, त्या चित्रपटाच्या वातावरणाने, आणि बाजूला चालू असलेल्या मेडिटेशनल म्यूजिकने मला हम्पीच्या तिथल्या शिळांच्या, त्या वास्तूंच्या खुऊप जवळ नेलं… म्हणजे ‘एखाद्या ठिकाणचं कुणी चाहता होतं’ ही गोष्ट खोल वाकून बघितली की किती खास आणि आश्चर्याची वाटते …
इतके दिवस मला फक्त माणसांवर प्रेम करता यायचं, पण मी निसर्गाला कधी माणसांना आपलंस करतो तसं आपलंस नव्हतं केलं तशी कल्पनाही नव्हती केली पण हम्पीने मला तीचं चाहता केलं ..
याव्यतिरिक्त चित्रपटाबद्दल सांगावं तर चित्रपटाची कथा इतकी साधी आहे, इतकी साधी की प्रेमाचा द्वेष करणारी मुलगी हिरोच्या प्रेमात पडते, हिरो प्रवासाच्या मध्यातून निघून जातो आणि त्या काळात तिला प्रेमाची किंमत कळते आणि ते पुन्हा एकत्र येतात. चित्रपटाची कथा सहज पुढे सरकत असते पण हम्पीला प्रेमाचा स्पर्श देणं विशेष आहे.
हम्पी म्हणजे आपलं प्रेम जसं आहे त्या जागी आहे ते त्या ठिकाणी आपल्याला भेटतं, तसंच हंपीत घडलेली प्रत्येक घटना तितकीच जिवंत तिथे भेटते …
चित्रपटाच्या शेवटात ते एकमेकांना भेटतात तिथे चित्रपटाची कथा संपते पण यासगळ्यात हंपी मनात घट्ट बसून राहतो माझ्या ‘visit these unexplored places once in a lifetime’च्या बकेट लिस्टमध्ये …
आणि तेव्हा मला फील झालं, प्रत्येक जागी फिरावं आणि ते असं फिरावं कि तो आयुष्यासाठी कट्टा बनून जावा, आपल्या आनंदाचा कट्टा …