अलबेल वेळ।

वय असं आहे की आपण जे करतोय ते आपल्याही नकळत सवयीचं म्हणून घडलेलं असतं. कदाचित आपण आजपर्यंत आयुष्याला जे वळण लावलं त्यामुळे हे घडत असेल, एक क्षणाचा विचार न करता आयुष्य बदललेलं असतं. मी जेव्हा बॅचलरचे शिक्षण घेत होते तेव्हा मला अशा पंचविशी आणि त्यापुढच्या लोकांचा अतिशय राग यायचा. कारण ते हसायला, बोलायला, रडायला, व्यक्त व्हायला सगळचं करायला विसरले होते, “असं मला वाटायचं”. फील करायला विसरले की त्यांना फील होत नाही माझं हे कोडं सुटायच नाही. पण त्यांच्या जागी आज स्वतःला पाहिलं की कळू लागतं प्रत्येकाचं आयुष्य! मग त्यांच्या वागण्याची कारणं, त्यांच्या जाड-बारीक-डोळ्यांखालच्या काळया डागांची आणि उद्धटपणे चिडण्याची कारणं.

गेल्या काही दिवसांत त्यांचा हा मुका प्रतिकार थोडा लक्षात येतो. पंचविशीनंतर आपण योद्धा बनत जातो, लाईफ कसा ट्विस्ट घेते याचा ताजा अनुभव या वेळी येतो. धडाधड करियर, आयुष्य, भविष्य आणि लग्नापर्यंतचे निर्णय घेऊ लागतो. हा काळ कोणाशी बोलून सोप्पा होणार नाही इतका कठीण असतो. कारण ही वैयक्तिक लढाई असते, इथलं बॅटल निभावून नेलं तर येणाऱ्या आयुष्याची दिशा स्पष्ट होणारी असते.
आयुष्य सोप्प करायचं म्हणून दरदिवशी नव्याने आयुष्याच्या चक्रव्युहात अडकून जातो आपण. मग विचार करतो, कालपर्यंत घट्ट बांधलेल्या तत्वांचा आणि खुशमिसाज जगणाऱ्या स्वतःचा. मी हळूहळू आयुष्याच्या स्पर्धेचा अजाणतेपणी भाग झालोय, ती जाणीव वर्गात पहिला नाही आलो तरी चालेल पण शेवटचा नसायला पाहिजे एवढी प्रखर होते. हा त्रास शारिरीक, मानसिक, भावनिक, डोक्याला झिंग देणारा असतो. मग हे सगळं रीचवायला घेतो सिगारेट, बिडी, दारू… चुकीचं असतं सगळचं. पण आपण ऑलरेडी या सगळ्यात धुंद झालेलो असतो. कुठल्या गोष्टीचं अप्रूप नसतं. कारण जॉब मिळेल एक दिवस, प्रेमाचे दिवस संपलेले आणि येणाऱ्या जबाबदाऱ्यांची चाहूल आलेली असते. पण दारू शिगारेटचा बाऊ केल्यामुळे आपण या व्यसानाबद्दल वेगळं फील करून घेतो. तेवढी मनाला तसल्ली असते सिनेमात, नाटकात पाहून. खोटं खोटं फील करून जगत राहिलो तर निदान जिवंत वाटतो.

असो, पण आता मला हळूहळू समजू लागतात घराघरात होणारे भांडणं आणि त्याने बिघडत जाणारे लोकांचे संतुलन. हा काळ अतिशय बेताचा असतो. अंगावरच्या कपड्यावरच कुठल्याच मोहात न अडकता कुठेतरी दूर निघून जावं न परतण्यासाठी एवढा एक पर्याय तेव्हढा स्पष्ट दिसत असतो. आजूबाजूची लोकं, प्रत्येकाचे विचार, सवयी याचा अतिरेक होऊ लागतो. या अशा आयुष्याला अंत नाही लक्षात येत जातं पण तोपर्यंत आयुष्याने आपल्याला त्याच्या चक्रव्युहात घेरलेलं असतं.
लहानपणी परीक्षेला दहा मार्कांना येणाऱ्या मी पक्षी झालो तर… या निबंधाला खरं करावं वाटतं. ज्याने तो विषय परीक्षेला टाकला असेल त्याच्या मनात याच विचारांचा शिरकाव झाला असेल का? आणि या सगळ्यातून वाचण्यासाठी मग त्याने असा विषय आम्हाला परीक्षेला देऊन स्वतःच्या मनाला भुरळ पाडली असेल. तेवढीच मनाला तसल्ली!

ये जिन्दगी थम जाए लगता हैं,
ठहराव नही मिल पाता कही,
लुभाते रहते हैं सिर्फ लालच में खुद को,
किनारा नही मिलता कहीं।
मेरा खुद से वास्ता नहीं रहा,
कभी किसी चीज का ताल्लुक नहीं समझ आता।
ये सिर्फ मैं हूं या मेरे जैसे सभी हैं इस दुविधा की कोख में।  शायद जिन्दगी को जान गया हूं मैं,
या शायद इस जिन्दगी के बहकावे का सच्चा खिलाड़ी बन गया हूं मैं।
जो भी हो रहा हैं, बचपन के सजावटी सपने के लालच में
बुरा फंस गया हूं मैं।

अलबेल कुछ नहीं होता, अलबेला रहना पड़ता हैं,

जिन्दगी जैसे खेलती हैं, हमे उससे ज्यादा ताकतवर बनन पड़ता हैं।

-पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

3 thoughts on “अलबेल वेळ।”

  1. अभिजित चोथे

    आयुष्याचे टप्पे ठरलेले आहेत. वय वाढणे म्हणजे एका टप्प्यातून दुसऱ्यात प्रवेशने.दोन टप्प्यांमधील संक्रमण काळ डोक्याची शकले उडवणारा असतो. पण जेव्हा सारं सवयीचं होऊन जातं तेव्हा त्या टप्प्याच्या मध्यावर आपण पोहोचलेले असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *