माझंही हे असंच होतंय, गेल्या कित्येक दिवसापासून.
‘माणूस इतका विचार का करत असेल बरं? म्हणजे इतकं सुंदर आयुष्य असताना ही ‘काजळी’ का ? स्वच्छ नितळ पाण्याला ‘विषाचा शाप असावा तसं अतिविचाराचं असतं. ‘पण मग या प्रश्नांची उत्तर शोधायची म्हणजे त्यावरही विचारच करायचा.
शेवटी मला कळलंय माणसाने चिंता करावी, पण चिंतेपलीकडे जाऊन चिंतेचं चिंतन करू नये. आयुष्य चितेसारखं जळायला लागतं, मेंदूची राख होते नि मग त्यातून जे विचार जन्म घेतात, तो केवळ एक पोकळ धुराळा बनतो. मी काळजी करायला हवी, चिंता नाही.
पण असं नाहीच झालं तर ……?
नाही , ते शक्य नाही
मला ना ,
“आनंद सापडायचाय किंवा मग तडफडायचं त्या
आनंदासाठी, त्या आनंदातल्या समाधानासाठी.
जिंदगी मुरंबा आहे, मला मुरायचंय तिच्यात.
गोडवा वाढवायचाय स्वतःचा.
नि त्या दोन रेषा आहेत ना ओठांच्या, त्यांना असं आपोआप खुलवायचंय.
वेडं व्हायचंय, खुश व्हायचंय, आनंदी राहायचंय. आनंद जगायचाय,आनंद वाटायचाय, आनंद शिंपडायचाय. बहारदार, डेरेदार, शानदार जगायचंय, कुठल्याही ‘भकास उद्याविना, काळजीविना.” आयुष्य माझ्या समोर स्वत:ला ऑफर करतंंय मी उगाच टेंशन घेते… अरेच्चा कित्ती सोप्पंय हे ! मला उगाचच वाटायचं अवघडै वगैरे ….. 😃😅

आवडला मुरब्बा 🙂