“ए अग्ग,
ऐक ना..
एकदा बघ ना तुझ्या त्या ‘तिळा’ला,न चिडता….
प्लिज…… ?
मी सांगतोय म्हणून ?
तुझा तो मुखडा नि तो ढीम्म ‘तीळ’. एक काम कर,
आरशात नको बघूस …. .
ओंजळीत पाणी घे नि मग बघ …… .
नाहीतर…. माझ्या डोळ्यातच बघ ना स्पष्ट दिसेल. . “खरंच मोहक आहे का रे ?” हा प्रश्न नको विचारूस तेव्हा. कारण “नाही ” हेच उत्तर देईन मी .
पण माझ्या शब्दांच्या झालरीमागील भावना “मोहक नाही, मादक आहे तो. ‘कलेजा खल्लास’ इतका मादक” असं म्हणेल कदाचित.
आणि हेही मान्य नसेलच ना,
तर त्या चंद्रावरचा डागही काढून टाक, नको बघत जाऊ त्याला. कारण , चंद्रावर डाग नाही प्रिये, तो ‘तीळ’च आहे ‘खास’ त्याचा …..
म्हणून सांगतोय प्रिये,एकदा बघ ना तुझ्या त्या ‘तिळा’ला,न चिडता…”
#When_your_lines_matchup_with_your_expression
#some_says_expressive_but_I_found_it_talktive
#Dedication_to_myself
Please follow and like us: